‘वावटळ’ हा प्राध्यापक द.के. गंधारे यांचा पहिला काव्यसंग्रह कवितेच्या दालनात आत्मविश्वासाने प्रवेश करतो. ‘वावटळ’मधील कविता ग्रामीण वास्तवाला साक्षात करते. काटेवनाची मोठी अरण्ये जागतिकीकरणानंतर झाली आहेत. त्यांतील अडचणींच्या वावटळींनी अक्राळविक्राळ रूप धारण केले आहे. तीच वावटळ गंधारे यांच्या कवितेतून साकार झाली आहे. कवी बालपणापासून ग्रामीण जीवनाशी एकरूप झालेला आहे. त्यामुळे त्याच्या अनुभवांनी त्याच्या कवितांत प्रातिनिधिक रूप धारण केले आहे...
‘ज्यावेळी, मरणारा माणूस उपासमारीनंतर येणाऱ्या अतिसाराच्या विकाराने दगावतो, तेव्हा अतिसाराच्या जंतूंपेक्षा, अन्नाचा अभाव हे त्या मृत्यूचे कारण असते. ----’ हे पुस्तक म्हणजे वेदनेचा चित्कार, करुणेचे आर्जव, अश्रूंची आणखी एक लाट याहून काहीतरी अधिक आहे...
भार्गवराम विठ्ठल ऊर्फ मामा वरेरकर हे धुळे येथे 1944 साली झालेल्या एकोणतिसाव्या साहित्य संमेलनाचे अध्यक्ष होते. त्यांचा लौकिक श्रेष्ठ नाटककार, बंगाली साहित्याचे भाषांतरकार आणि कादंबरीकार असा होता. त्यांचा जन्म चिपळूण येथे 27 एप्रिल 1883 रोजी झाला.
श्रीपाद महादेव माटे हे सांगली येथे 1943साली भरलेल्या अठ्ठाविसाव्या साहित्य संमेलनाचे अध्यक्ष होते. श्री. म. माटे यांचे नाव उच्चारता क्षणीच, त्यांनी त्यांचे आयुष्य पूर्वाश्रमीच्या अस्पृश्यांसाठी झोकून दिले होते त्याची आठवण होते. जणू ह्या दलितेतर माणसाने दलित चळवळीची सुरूवातच केली !
मराठी भाषेत ‘पोळी’ व ‘चपाती’ हे पर्यायशब्द म्हणून जवळजवळ वापरले जातात. उच्चभ्रू समाजात ‘पोळी’ व तदितर समाजात ‘चपाती’ हा शब्द वापरला जातो असे ढोबळपणे म्हणता येते.
मुंबई येथे भरलेल्या तेविसाव्या साहित्य संमेलनाचे अध्यक्ष स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर होते. विज्ञाननिष्ठ, प्रखर बुद्धिवादी आणि तरीही कविहृदयाचे ते प्रचंड ताकदीचे लेखक. त्यांनी संपूर्ण आयुष्य देशसेवेत अर्पण केले.
वसईतील ख्रिस्ती समाज हा पोर्तुगीज राजवटीत धर्मांतरीत झाला. त्यांची नावे आणि आडनावे पोर्तुगीज धाटणीची. तेव्हाच्या धार्मिक पुरोहितांनी ती बाप्तिस्मा संस्कार करताना (नामविधी सोहळा) दिली.
समाजमाध्यमांमध्ये विनोदी, गोड दिसणाऱ्या इमोजींचा वापर सहज आणि नित्याचे झाले आहे. विविध हृदये, रडके-दुःखी चेहरे, 'ब्लोईंग किसेस'... आणि अशा अडीचशेहून अधिक भावचिन्हांच्या मदतीने भावना व्यक्त करता येतात. मात्र ती पद्धत साचेबंद होत आहे का? उलट या चेहेऱ्यांमुळे खऱ्या भावना व्यक्त होणे नाहीसे झाले आहे...
'पागडी' हा मुंबईकरांच्या जिव्हाळ्याचा शब्द. तो पुनर्विकास आणि त्यातून मिळणारी ओनरशिप घरे या काळात विस्मृतीत गेला आहे. एकेकाळी मुंबईत घर पागडीनेच मिळायचे. 'पागडी'ची घरे म्हणजे भाड्याने घेतलेली घरे. घरमालक किंवा चाळमालक त्याच्या मालकीच्या जागेवरील किंवा चाळीतील घरे गरजूंना भाड्याने देई...
इंटरनेटची जोडणी जगातील तीन अब्ज वीस कोटी लोकांकडे आहे आणि इमोजींचा वापर त्यांतील ब्याण्णव टक्क्यांपेक्षा जास्त लोक नियमितपणे करतात. इंग्रजी ही जगाची भाषा समजली जाते. इमोजीभाषकांची संख्या इंग्रजीभाषकांच्या तिप्पट आहे.