अक्षता हा शब्द सर्वांच्या अगदी चांगला परिचयाचा! लग्नाच्या वयाचा तरुण मुलगा किंवा मुलगी घरात असेल तर त्यांच्या डोक्यावर कधी एकदा अक्षता पडतात, अशी काळजी...
मेहनत म्हणजे कष्ट, श्रम; त्याचबरोबर मजुरी, कामधंदा असेही अर्थ त्या शब्दाचे आहेत. मेहनत हा शब्द खूप प्रयत्न, अभ्यास, रियाझ या अर्थाने वापरला जातो. उदाहरणार्थ,...
‘ज्ञानेश्वरी’ हा संत ज्ञानेश्वरांचा प्रसिद्ध ग्रंथ होय. ज्ञानेश्वरांनी ‘ज्ञानेश्वरी’ असे नाव त्या ग्रंथाला दिलेले नाही. ‘भावार्थदीपिका’ हे ज्ञानेश्वरीचे मूळ नाव होय. ज्ञानेश्वरांच्या ग्रंथाला ‘देशीकार लेणे’ असे संबोधतात. ‘ज्ञानेश्वरी’ ही भगवदगीतेवर लिहिलेली टीका होय. त्या टीकाग्रंथात सुमारे नऊ हजार ओव्या आहेत. भगवदगीतेतील तत्त्वज्ञान त्यात उपमादृष्टांताच्या आधारे सुलभतेने सांगितले आहे. आध्यात्मिक विषयाचे काव्यमय विवेचन या दृष्टीने तो ग्रंथ लोकोत्तर मानावा लागेल...
इतिहासाचार्य विश्वनाथ काशीनाथ राजवाडे हे महाराष्ट्रीय विद्वान होते. त्यांनी संशोधन व लेखन इतिहास, भाषाशास्त्र, व्युत्पत्ती, व्याकरण अशा बहुविध विषयांसंबंधी केले. तसेच, त्यांनी त्यांचे लेखन...
भाद्रपद महिन्याचा कृष्णपक्ष म्हणजे प्रतिपदा ते अमावास्या हा काळ. हिंदू धर्म-परंपरेत पितृ पंधरवडा म्हणून ओळखला जातो. पितृपक्ष म्हणजे भारतीयांचे दिवंगत पूर्वज/ पितर या काळात पितृलोकातून पृथ्वीवर येतात असा समज आहे. म्हणून त्यांची पूजा त्या दिवसांत केली जाते, म्हणूनच तो काल शुभ मानला जात नाही. त्या काळात सर्वसामान्यपणे शुभकार्य करत नाहीत; त्याविषयी बोलणी करत नाहीत आणि मोठी खरेदीही करत नाहीत. मध्य प्रदेश आदी हिंदी भाषी प्रदेशांत पौर्णिमान्त महिने पाळले जातात. तो तेथील आश्विन महिन्यातील पहिला पंधररवडा असतो...
मुरुडवरून म्हसळा येथे जाताना चार किलोमीटरवर एका टेकडीवर खोकरी नावाचे ठिकाण आहे. त्या ठिकाणी त्यांचा भास मशिदी असल्यासारखा होतो. त्या वास्तू आपले लक्ष्य वेधून...
थोरल्या माधवराव पेशव्यांनी पानिपत युद्धोत्तर मराठी साम्राज्याचा जणू जीर्णोद्धारच केला! ते श्रीमंत पहिले माधवराव पेशवे, ते पंतप्रधान माधवराव बल्लाळ पेशवे किंवा थोरले माधवराव पेशवे...
माणिकगड किल्ला चंद्रपूर जिल्ह्याच्या ‘जिवती’ तालुक्यातील घनदाट जंगल आणि उंच डोंगररांगा आणि त्यातील एका डोंगरावर दाट वनराजीमध्ये भग्न अवस्थेत आहे. तो शहराच्या दक्षिणेला साठ...
मराठी ग्रंथकारांचे पहिले संमेलन 11 मे 1878 या दिवशी पुण्यात भरले होते. आधुनिक महाराष्ट्रातील अनेक उपक्रमांचे प्रणेते न्यायमूर्ती महादेव गोविंद रानडे हे होते. पहिल्या ग्रंथकार संमेलनाची प्रेरणा ही न्यायमूर्ती रानडे आणि रावबहादूर गोपाळराव हरी देशमुख यांची होती. ते दोघे पहिल्या संमेलनाचे आणि पर्यायाने भविष्यकाळातील साहित्य संमेलनांचे शिल्पकार होते...