बिहाग आणि मारु बिहाग

माझी आजी बिहागमधील ‘बालम रे मोरे मनकी’ ही बंदिश गुणगुणत असे. आजी मूलतः ग्वाल्हेरची आणि गाणे शिकलेली ! त्यामुळे ती अनेक पारंपरिक चिजा गात असे. अकरावी-बारावीमध्ये असताना अश्विनी भिडे-देशपांडे यांनी गायलेली ‘लट उलझी सुलझा जा बालम’ ही चीज ऐकली आणि मी बिहागशी पुन्हा जोडला गेलो. त्या चिजेतील नाजूक शृंगार विविध स्वरावली आणि बोल यांच्याशी खेळत फुलवला आहे. साहजिकच, त्याचा परिणाम ऐकणाऱ्यावर होतो; ती अश्विनी भिडे-देशपांडे, किशोरी आमोणकर आणि मोगूबाई कुर्डीकर या सगळ्यांनी त्यांच्या परीने ‘बाजे री मोरी पायल झनन’ हा ख्याल मांडला आहे आणि बिहागचा सुरेख आविष्कार उभा केला आहे...

संधीप्रकाश राग- पूरिया धनाश्री आणि गौरी

मास्टर दीनानाथ यांच्या शिष्याला तो गात असलेल्या पूरिया धनाश्रीच्या ख्यालामध्ये होणारी चूक लहान वयाच्या लता मंगेशकर यांनी समजावून सांगितली. दीनानाथांनी ते पाहिले आणि दुसऱ्या दिवसापासून लता मंगेशकर यांची तालीम सुरू केली. तो राग होता पुरिया धनाश्री ! आणि ख्याल ‘सदारंग नित उठ’ हा तो ! स्वतः लता मंगेशकर यांनी अनेक मुलाखतींमध्ये तो गुणगुणून दाखवला आहे. त्या किश्शामुळे मला पूरिया धनाश्रीबद्दल लहानपणी कुतूहल होते, पण मी तो कधी ऐकला मात्र नव्हता. मी त्या रागाचे सूर पहिल्यांदा जेव्हा शिकलो तेव्हा मात्र मोहित झालो. तोवर शुद्ध स्वरांचे बरेच राग परिचयाचे झाले होते...

सारंगाच्या छायेत

सारंग हे नावच किती मोहक आहे ! जसे नाव तसा राग आहे. त्याचा आवाकाही फार मोठा आहे. ऊन चढल्यावर मध्यान्ह येते; त्या वेळच्या रागांमध्ये सारंगाचा वावर आहे. जेव्हा केवळ ‘सारंग’ असा उल्लेख होतो; तेव्हा त्याचा इशारा हा वृंदावनी सारंग रागाकडे असतो किंवा सारंग या रागांगाकडे असतो. रागांग म्हणजे अशी स्वराकृती की जी सगळ्या सारंग प्रकारांचे ‘सारंग’पण निश्चित करते. अशा एकापेक्षा जास्त स्वराकृतीही असू शकतात. त्या एखाद्या रागाला सारंगाचा प्रकार म्हणता येण्यासाठी कारणीभूत ठरतात. उदाहरणार्थ, सा रे म प नी, म ऽ रे नि ऽ सा, रेम रेसा निसा इत्यादी. सारंगाच्या विस्तीर्ण परिवारातील मुख्य सारंगांचे तीन प्रकार - वृंदावनी सारंग, शुद्ध सारंग आणि मधमाद सारंग ...

गौडमल्हार म्हणजे प्रेमाचा पाऊस ! (Classical Gaud Malhar Is Full of Love !)

गौडमल्हारचा परिचय तसा उशिराच झाला ; पण पहिल्या श्रवणापासून जिवाभावाचा बनलेला तो खास आवडता राग ! किशोरी यांची स्वरचित ‘बरखा बैरी भयो’ ही रचना माझ्या सर्वाधिक प्रिय रचनांपैकी एक ! त्यातील ‘जाने ना देत मोहे पी की नगरिया’ या ओळीतील भाव थेट हृदयाला भिडणारा आहे. त्यामधून प्रत्येकाला त्याच्या स्वत:च्या आयुष्यातील असा क्षण आठवेल, की प्रिय व्यक्तीची भेट होऊ शकली नाही याची हुरहूर मनाला लागून राहील. भावनांचे किती असे नाजूक पदर ...

बहुरंगी, बहुढंगी तोडी

आमच्या शाळेतील काळाची गोष्ट. सोऽहम हर डमरू बाजे | उसके सुर तालोंके | सुखकारक झूले पर | झूम रहे सरिता सर | भुवनत्रय गाजे... चौथीचा वर्ग आणि आमच्या वर्गातील नेहा गुरव हे नाट्यगीत म्हणत होती. मुले भान हरपून ऐकत होती. त्या सुरांची जादूच अशी होती, म्हणा ! नंतर तिने सांगितले की या रागाचे नाव तोडी ! तोडीशी पहिली ओळख झाली ती अशी ! नेहा ही एक व्यावसायिक आणि उदयोन्मुख शास्त्रीय गायिका झाली आहे. तोडीने तेव्हा मनात जागे केलेले कुतूहल आणि आकर्षण माझ्या मनात तसेच आहे; किंबहुना वाढतच चालले आहे ! जसे आकर्षण आहे, तशी थोडी भीतीदेखील ! त्याचे कारण असे की मी तोडीचे सूर जेव्हा पहिल्यांदा लावण्याची वेळ आली तेव्हा ते काही केल्या जमेचना...

भैरवाचे विस्तीर्ण अंगण !

महादेवाचे नाव असलेला भैरव हा राग महादेवासारखाच अनादी अनंत आहे. त्याला आदिरागही म्हटले जाते; कारण मूळ सहा रागांपैकी सर्वात आधी भैरव निर्माण झाला, असेही म्हणतात. त्यामुळेच की काय, गाणे शिकणाऱ्यांकडून सुरुवातीला गळ्याच्या तयारीचा रियाज हा भैरव रागाचे तान, पलटे व अलंकार घोटून घेऊन करवला जातो. अनेक गुरु-शिष्य परंपरांमध्ये पहिला राग किंवा पहिली शिकवलेली बंदिश ही भैरव रागात असते. इतका प्रचलित, सर्वश्रुत राग असूनदेखील मैफलीतील सादरीकरणात भैरवाचे प्रमाण इतर रागांच्या मानाने कमी आढळते...

कारी कारी बादरिया – मल्हार ! (Monsoon clouds and Raga Malhar)

यावर्षी पावसाने कृपा केली आहे. येणाऱ्या सुगीचे स्वप्न पहायला हरकत नाही असा माहोल आहे. ढग दाटून आले आहेत आणि पावसाच्या धारा कोसळत आहेत. या कोसळणाऱ्या धारांचे संगीत म्हणजे राग मल्हार. त्यात पावसाचे सगळे विभ्रम साठलेले आहेत. भीमसेन जोशींचा मल्हार ऐकताना गडगडणाऱ्या ढगांची आणि कोसळणाऱ्या धारांची आठवण येते. मोगरा फुलला या सदरामध्ये सौमित्र कुलकर्णी मल्हार रागाचा परिचय करून देत आहेत. रागाचे स्वरूप स्पष्ट व्हावे आणि अलौकिक गाण्याचा आनंदही मिळावा या दृष्टीने त्यांनी युट्यूब लिंक्स सोबत दिल्या आहेत. अभिजात व आधुनिक संगीताचा मेळ घालून सादर केलेली 'मल्हार जॅम' ही त्यातील एक आगळीवेगळी प्रस्तुती. स्वत: सौमित्र कुलकर्णी यांनीही एक बंदीश गायली आहे. मल्हाराच्या या धारा खचितच आनंददायी ठरतील...

स्वरांची मोहिनी (Mesmerising Music)

4
संगीताची मोहिनी अवीट आहे. प्रत्येकापाशी गाण्यांच्या आठवणी असतात. एखादं गाण पहिल्यांदा ऐकलं तेव्हाच्या किंवा एखादं गाणं ऐकत असताना घडलेल्या प्रसंगांच्या... ते गाणं आणि त्या आठवणी हातात हात घालूनच येतात. या विषयावर प्रत्येकजण स्वत:चा असा ललित लेख लिहू शकेल. भरून आलेल्या आभाळातून कोसळणाऱ्या सरींचे धारानृत्य सुरू असताना मनाला आपसूकच हुरहुर लागते. अशा वेळी गाणं आणि गाण्यांच्या आठवणी साथ देतात. मनाला सुकून देतात. या लेखात गाण्यांच्या आठवणी सांगत आहेत, इतर वेळी गणिताविषयी लिहिणारे मुकेश थळी. त्यांच्या मते, गाण्यातही गणित आहे आणि गणितातही गाणे आहे...

नादसागर मालकंस (Melodic Malkansa)

शास्त्रीय संगीतातील रागांचा परिचय करून देणाऱ्या लेखमालेत डॉ. सौमित्र कुलकर्णी ‘मालकंस’ या लोकप्रिय आणि कलाकारप्रिय रागाविषयी माहिती देत आहेत. हा राग गाण्याची वेळ मध्यरात्र ही आहे. मध्यरात्रीच्या महासागरासारखा, प्रशांत आणि धीरगंभीर असलेला हा राग माहीत नसतानाही त्यावर आधारित संगीतरचना मनाला मोहिनी घालतात. थोडासा परिचय झाला तर त्या आनंदात भरच पडेल. दिग्गज कलाकारांनी गायलेल्या या रागातल्या बंदिशींच्या यू-ट्युब लिंक सोबत दिल्या आहेत, रागाचा परिचय होण्यासाठी त्यांची मदत होईल...

अनाहत शंकरा (Raga Shankara)

अनाहत या शब्दाचा शब्दकोशातला अर्थ आहे, स्वयंभू, ज्याच्यावर कसलाही आघात झालेला नाही असा. हिंदुस्थानी शास्त्रीय संगीतातला शंकरा हा राग हा असाच एखाद्या स्वयंभू, बलदंड खडकाप्रमाणे आहे. या रागाची माहिती करून देत आहेत डॉ. सौमित्र कुलकर्णी. शास्त्रीय संगीताविषयीच्या त्यांच्या लेखमालिकेतला हा चौथा लेख...