चित्रे दाखवून कथाकथन करणारे ते चित्रकथी. हरदास, गोंधळी जशी कथा सादर करतो व रात्र जागवतो अथवा हरदासी कीर्तनकार जसे उत्तररंगात आख्यान लावतात तसाच पूर्वी...
पोवाडा हा मराठी काव्यप्रकार आहे. त्याला पवाडा असेही म्हणतात. वीरांच्या पराक्रमांचे, विद्वानांच्या बुद्धिमत्तेचे, तसेच एखाद्याच्या सामर्थ्य, चातुर्य, कौशल्य इत्यादी गुणांचे काव्यात्मक वर्णन, प्रशस्ती किंवा...
मुखवट्यांचे नृत्यनाट्य म्हणजे बोहाडा. बोहाड म्हणजे मुखवटेधारी सोंगे, परंतु ती सोंगे नसून स्व +अंग, स्वांग. कलाकार स्वत:च ते व्यक्तिमत्त्व आहोत असे मानून अवतार घेत...
संबळ हे डमरूचे प्रगत रूप होय. कालिकापुराणात, शिवाने पार्वतीच्या आनंदासाठी हे वाद्य निर्माण केले अशी समजूत आहे. संबळ हे वाद्य कुलधर्म, कुलाचार, परंपरा म्हणून...
नमन-खेळे हा उत्तर कोकणातील लोककला प्रकार आहे. त्याकडे धार्मिक विधी म्हणून पाहिले जाते. खेळे लग्नकार्य, सत्यनारायण, नामविधी अशा प्रसंगी केले जातात. खेळे पेशवाई काळापासून...
खडीगंमत हे लोकनाट्य विदर्भातील नागपूर , बुलढाणा जिल्ह्यांपासून पूर्वेकडील गोंदिया जिल्ह्यापर्यंत सादर केले जाते. विदर्भाच्या प्राचीन लोककलांमध्ये ‘खडीगंमत’ याप्रकाराचा समावेश होतो. दंडार हादेखील लोकनाट्याचा प्रकार आहे. डफगाणे हे मूळ...
'तमाशा 'ला एकेकाळी खडीगंमत म्हटले जायचे. पश्चिम महाराष्ट्र, मराठवाडा, उत्तर महाराष्ट्र आणि कोकणपट्टी या भागांत तमाशा प्रसिद्ध आहे. उत्तर महाराष्ट्रात तखतरावाचा तमाशा आहे. संगीतबारीचा तमाशा...
कोकण प्रांतातील निसर्गसौंदर्याप्रमाणे तेथील लोककलाही मनमोहक आहेत. त्यापैकी एक म्हणजे ‘जाखडी नृत्य’. ‘जाखडी’ मधील खडी म्हणजे उभे राहणे. हा नाच उभ्याने केला जातो, म्हणून त्यास ‘जाखडी’ असे म्हटले जाते. जाखडीचा आणखी एक अर्थ होतो - ‘जखडणे’. ‘जाखडी’मध्ये नृत्य करणार्यांची शृंखला तयार केली जाते. जाखडी नृत्यास ‘बाल्या नाच’ असेही म्हटले जाते. मुंबई त ग्रामीण भागातील शेतकरी घरगड्याचे काम करत असत. त्यांच्या कानात बाली हे आभूषण असे. त्या आभूषणावरुन ते करीत असलेल्या नृत्याला, ‘बाल्या नाच’ असे नाव पडले...