Home Authors Posts by प्रकाश खांडगे

प्रकाश खांडगे

3 POSTS 0 COMMENTS
प्रकाश खांडगे ठाणे येथे राहतात. ते शाहीर अमरशेख अध्यासन लोककला अकादमी, मुंबई विद्यापीठाचे समन्वयक आहेत. त्यांनी पस्तीस वर्षे लोकसाहित्य, लोककला क्षेत्रात संशोधनाचे कार्य केले. प्रकाश खांडगे यांना 'खंडोबाचे जागरण' या ग्रंथासाठी महाराष्ट्र शासनाचा 'उत्कृष्ट ग्रंथ संशोधन पुरस्कार' (ग.त्र्यं. माडखोलकर पुरस्कार) प्राप्त झाला आहे. तसेच, त्यांना महाराष्ट्र शासनाचा लोककलेच्या क्षेत्रातील योगदानाबद्दल 'कलादान पुरस्कार' देऊन गौरवण्यात आले. त्यांनी अमेरिका आणि चीन येथील आंतरराष्ट्रीय लोकसाहित्य व लोककला परिषदांमध्ये शोधनिबंध वाचन करून भारताचे प्रतिनिधित्व केले. खांडगे यांनी मुंबई विद्यापीठात लोककला अकादमी स्थापन करण्यासाठी पुढाकार घेतला. ते मुंबई विद्यापीठात अकरा वर्षे सहयोगी प्राध्यापक होते. त्यांची 'चाळ माझ्या पायात', 'खंडोबाचे जागरण', 'भंडार बुका', 'नोहे एकल्याचा खेळ' अशी चार पुस्तके, तर 'गर्जा महाराष्ट्र माझा', 'लोक लेणी' व 'लोकमुद्रा' ही तीन संपादने प्रकाशित आहेत. प्रकाश खांडगे यांनी 'महाराष्ट्र टाइम्स', 'लोकसत्ता', 'लोकमत', 'सकाळ', 'पुण्यनगरी' आदी वृत्तपत्रांतून सदरलेखन केले आहे.

रायरंद आणि बहुरूपी यांची सोंगे (Folk Art of Rairand And Bahuroopi)

रायरंद किंवा बहुरूपी म्हणजे अनेक रूपे घेऊन लोकांचे मनोरंजन करणारा लोककलावंत. रायरंद, रायरंद्र, रार्इंदर हे शब्द मराठी भाषेतील रायविनोदी म्हणजे विदूषक, बहुरूपी, खुशमस्कऱ्या या अर्थाने वापरले जातात...

कला-संस्कृती विचार आजच्या परिस्थितीत आणा!

प्रदीप मोहिते यांनी 'दिवाळी आणि करुणरम्य संस्कृती' या लेखात संस्कृतिरक्षण व संवर्धन या बाबतीतील कारुण्याचा मुद्दा भावस्पर्शी रीतीने मांडला आहे. तो दिवाळीच्या निमित्ताने पुढे आल्यामुळे...
घरोघरी फिरणारी खडीगंमत ही दंडार नावाने ओळखली जाते.

खडीगंमत

'तमाशा 'ला एकेकाळी खडीगंमत म्हटले जायचे. पश्चिम महाराष्ट्र, मराठवाडा, उत्तर महाराष्ट्र आणि कोकणपट्टी या भागांत तमाशा प्रसिद्ध आहे. उत्तर महाराष्ट्रात तखतरावाचा तमाशा आहे. संगीतबारीचा तमाशा...