चर्मवाद्ये
महाराष्ट्रात ढोलकी, मृदंग, संबळ, नगारा, हलगी अशी चर्मवाद्ये लोकप्रिय आहेत. वाद्ये लोकांमध्ये नऊ रस निर्माण करू शकतात. महाराष्ट्रात ढोलकी आणि मृदंग दोन्ही एकाच...
केकावली (Kekavali)
‘केकावली’ ही मोरोपंताची रचना प्रसिद्ध व लोकप्रिय आहे. मोरोपंत हे पंडित कवी. त्यांनी ‘श्लोक केकावली’ लिहिण्यापूर्वी ‘आर्या केकावली’ नावाची रचना केली होती. त्यातील आर्या...
हलगी नावाचे चर्मवाद्य
हलगी हे पारंपरिक वाद्य आहे. त्याचा समावेश चर्मवाद्यात होतो. हलगी वादकाला वाजवण्यास आणि वागवण्यास सोपी वाटते. ‘हलकारा देणे’ हा शब्दप्रयोग मराठीत ग्रामीण भागात आहे....
शाहिरी काव्याचा मराठी बाणा (Shahiri Poets)
शाहिरी काव्य हे अस्सल मराठी बाण्याचे आहे. ते बहुजनसमाजाचे आवडते काव्य आहे. काही विद्वानांच्या मते, शाहिरी काव्य हाच मराठी काव्याचा प्रभातकाळ होय. शाहिरी काव्याची...
जाखडी नृत्य (बाल्या नाच)
कोकण प्रांतातील निसर्गसौंदर्याप्रमाणे तेथील लोककलाही मनमोहक आहेत. त्यापैकी एक म्हणजे ‘जाखडी नृत्य’. ‘जाखडी’ मधील खडी म्हणजे उभे राहणे. हा नाच उभ्याने केला जातो, म्हणून त्यास ‘जाखडी’ असे म्हटले जाते. जाखडीचा आणखी एक अर्थ होतो - ‘जखडणे’. ‘जाखडी’मध्ये नृत्य करणार्यांची शृंखला तयार केली जाते. जाखडी नृत्यास ‘बाल्या नाच’ असेही म्हटले जाते. मुंबई त ग्रामीण भागातील शेतकरी घरगड्याचे काम करत असत. त्यांच्या कानात बाली हे आभूषण असे. त्या आभूषणावरुन ते करीत असलेल्या नृत्याला, ‘बाल्या नाच’ असे नाव पडले...
कलगी तुरा (Kalagi Tura)
(Kalagi Tura)
ग्रामीण महाराष्ट्रात, कलगी तुरा हा लोककलेचा एक लोकप्रिय प्रकार आहे. वैचारिक मुकाबला असावा असा सवाल-जबाबाचा खेळ असतो. तमाशाचा फड असावा तसाच फड पण...
भारूड (Bharud)
भारूड या लोककलेचे ग्रामीण महाराष्ट्रात तमाशाखालोखाल आकर्षण आहे. भारूडाचे आयोजन स्वतंत्रपणे वार्षिक ज्ञानेश्वरी पारायण, तुकाराम गाथा पारायण, यात्रा आणि तशा इतर उत्सवांमध्ये केले जाते. त्या कलेत लोकमानस जिंकण्याची ताकद आहे, तेवढी ती रंगतदारही आहे. प्रबोधन हा त्या कलेचा गाभा आहे. भारूड नाट्य, वक्तृत्व आणि संगीत यांच्या मिलाफातून रंगत जाते. ते अध्यात्माच्या प्रसाराचे महत्त्वाचे माध्यम आहे. संत एकनाथ हे या कलाप्रकाराचे जनक मानले जातात...
कोकणातील नवान्न पौर्णिमा
कोकणात घराघरातून साजरा होणारा एक सण म्हणजे ‘नवान्न पौर्णिमा’. नव्याची पौर्णिमा. ‘नवान्न’ म्हणजे नवीन अन्न. त्या दिवसाला नावाप्रमाणेच महत्त्व आहे. नवान्न म्हणजे नवीन तयार...
अनंत फंदी (Anant Fandi)
अनंत फंदी हे संगमनेरचे. पूर्वजांचा धंदा सफारीचा, गोंधळीपणाचा, भवानीबाबा नामक साधूने फंदीला धोंडा मारला. तेव्हापासून त्याला कवित्वस्फूर्ती झाली! ‘फंदी अनंत कवनाचा सागर’ असे त्या...
कोकणची जाखडी, मॉरिशसची झाकरी (Konkan’s Jakhadi becomes Zhakari in Mauritius)
जाखडी म्हणजेच बाल्या नाच. ती कोकणातील लोककला आहे. त्याला ‘शक्ती-तुरा’ असे म्हणूनही ओळखले जाते. ‘जाखडी नृत्य’ रत्नागिरी व रायगड या दोन जिल्ह्यांत विशेष प्रसिद्ध आहे. ते गौरीगणपतीच्या सणाला केले जाते. आश्चर्याचा भाग असा, की कोकणातून मॉरिशसला गेलेल्या व तेथे स्थिरावलेल्या मराठी लोकांनीही ती लोककला जपलेली आढळली. कोकणी लोक मॉरिशसमध्ये कामानिमित्त गेले, त्यास पावणेदोनशे वर्षे झाली. कोकणातील जाखडी नृत्य हे मॉरिशसमध्ये ‘झाकरी’ या नावाने ओळखले जाते...