महेश लाडणे : नाणीसंग्रह; अभ्यास अभी बाकी है !
शेवगाव तालुक्यातील अमरापूर गावच्या महेश लाडणे याच्या नाणीसंग्रहाची सुरुवात कुतूहलातून झाली. तो इयत्ता नववीत शिकत असताना घरात जुनी पितळी तांब्याची भांडी, वजनमापे अशा काही वस्तू असल्याचे त्याच्या लक्षात आले. त्यात वजनमापे वाटतील अशा गोलाकार आणि जाडजूड तांबे धातूच्या काही गोष्टी होत्या. तो ते साहित्य जमवत गेला. त्यातून त्याचा नाणेसंग्रह आकारास आला. त्याच्या संग्रहात आठशे नाणी आहेत. ती विविध धातूंची, विविध आकारांची, विविध किंमतीची, विविध लिपींतील आहेत...
ज्ञानेश्वरी (Dnyaneshwari)
‘ज्ञानेश्वरी’ हा संत ज्ञानेश्वरांचा प्रसिद्ध ग्रंथ होय. ज्ञानेश्वरांनी ‘ज्ञानेश्वरी’ असे नाव त्या ग्रंथाला दिलेले नाही. ‘भावार्थदीपिका’ हे ज्ञानेश्वरीचे मूळ नाव होय. ज्ञानेश्वरांच्या ग्रंथाला ‘देशीकार लेणे’ असे संबोधतात. ‘ज्ञानेश्वरी’ ही भगवदगीतेवर लिहिलेली टीका होय. त्या टीकाग्रंथात सुमारे नऊ हजार ओव्या आहेत. भगवदगीतेतील तत्त्वज्ञान त्यात उपमादृष्टांताच्या आधारे सुलभतेने सांगितले आहे. आध्यात्मिक विषयाचे काव्यमय विवेचन या दृष्टीने तो ग्रंथ लोकोत्तर मानावा लागेल...
नईमभाई पठाण – पुरातन वस्तूंचे संग्राहक
नाशिक जिल्ह्याच्या निफाडमध्ये राहणारे नईमभाई पठाण हे हरहुन्नरी व्यक्तिमत्व आहेत. ते ‘नाशिक जिल्हा ग्रंथालय संघा’चे बावीस वर्षांपासून कार्यवाह म्हणून कार्यरत आहेत. त्यांना 2012 साली ग्रंथमित्र पुरस्कारही मिळाला. ते त्यांचे घड्याळदुरुस्ती व विक्री हे परंपरागत दुकान सांभाळून आजुबाजूच्या गावातून, शहरांतून फेरफटका मारतात. तेथील जुने बाजार धुंडाळतात. दुर्मीळ, अनोख्या वस्तूंचा त्यांचा संग्रह पाहण्याजोगा आहे...
ऋतु बरवा : सहा ऋतूंचे सहा सोहळे… ( Rutu Barwa – ...
वातावरणातील ऋतुचक्र सूर्याच्या दक्षिणोत्तर गतीमुळे निर्माण होते. म्हणजे ऋतू सूर्यसंक्रांतीवर अवलंबून असतात. ती वस्तुस्थिती महाभारत काळातदेखील माहीत होती. असे असताना, दुर्गाबाईंनी चांद्रमासांवर आधारित ऋतुचक्र का लिहिले हा मला पडलेला प्रश्न आहे... ऋतुचक्राचा मेळ चैत्र, वैशाख वगैरे चांद्रमासांशी बसत नाही. मी मराठवाड्याच्या रखरखीत पठारावर जन्मलो. अठ्ठावन्न वर्षे तिकडेच काढली. पुण्याला आलो तो येथील झाडांच्या ओढीने. पुणे हे सर्वाधिक वृक्षविविधता असलेले, अतिशय वृक्षसमृद्ध असे शहर आहे हे मला वाचून माहीत होते. येथे सह्याद्री आहे. चार नद्या आणि सात धरणे आहेत...
दौत, टाक आणि टीपकागद
ज्यावेळी माणसाला त्याचे विचार जसेच्या तसे इतरांना कळावेत आणि ते जसेच्या तसे संग्रहित करून ठेवावेत याची गरज निर्माण झाली त्यावेळी लिपीचा शोध लागला. माणूस...
छत्रपती शिवाजी महाराज वस्तुसंग्रहालय (Chhatrapati Shivaji Maharaj Vastusangrahalay)
म्युझियम म्हणजेच वस्तुसंग्रहालय हे अनौपचारिक शिक्षणाचे प्रभावी माध्यम आहे. छत्रपती शिवाजी महाराज वस्तुसंग्रहालयाच्या कलादालनात चित्रांचा अभ्यास करणारे विद्यार्थी पाहिले की या विधानाचा प्रत्यय येतो. छत्रपती शिवाजी महाराज वस्तुसंग्रहालय हे मुंबई शहराचा मानबिंदू आहे. देशातील कला-इतिहास-संस्कृतीचा वारसा काळजीपूर्वक जतन करणारे आणि त्याचबरोबर समकालीन कला-संस्कृतीच्या वाढीकडेही तितक्याच डोळसपणे व कृतिशीलतेने पाहणारे ते देशातील एक महत्वाचे सांस्कृतिक केंद्र बनले आहे...
नाण्यांच्या माध्यमातून अर्थसाक्षरता – जयवंत जालगावकर (Jaywant Jalgaonkar – Bankman loves coins and liquor...
दापोलीचे जयवंत जालगावकर हे जवळजवळ गेली तीस वर्षे स्थानिक अर्बन को ऑपरेटिव्ह बँकेचे अध्यक्ष आहेत. त्यांच्यावर जिल्हा बँकेच्या व कधी कधी राज्य बँकेच्या जबाबदाऱ्याही असतात. तरीसुद्धा जयवंत हे केव्हाही दिलखुलास असतात. जयवंत यांना दोन महत्त्वाचे छंद आहेत. पहिला विविध वस्तू, विशेषतः नाणी जमवण्याचा. त्यांच्याकडे सत्तावीस देशांची चलनातील नाणी आहेत. जयवंत यांचा दुसरा छंद अनोखा आहे. ते दारूच्या भरलेल्या बाटल्या जमा करतात. विविध आकारांच्या, विविध शैलींच्या, विविध देशांच्या अशा पाचशेदहा बाटल्या त्यांच्या संग्रही आहेत...
शाहिरी काव्याचा मराठी बाणा (Shahiri Poets)
शाहिरी काव्य हे अस्सल मराठी बाण्याचे आहे. ते बहुजनसमाजाचे आवडते काव्य आहे. काही विद्वानांच्या मते, शाहिरी काव्य हाच मराठी काव्याचा प्रभातकाळ होय. शाहिरी काव्याची...
म्हणी- मराठी भाषेचे अंतरंग (Proverbs – Heart of Marathi Language)
म्हण’ या शब्दाची निर्मिती संस्कृतमधील ‘भण’ या धातूचा अपभ्रंश होऊन झाली आहे. म्हण ही लोकांच्या तोंडी सतत येऊन दृढ होते. न.चिं. केळकर यांनी म्हणीची व्याख्या ‘चिमुकले, चतुरणाचे, चटकदार असे वचन अशी केली आहे. कोशकार वि.वि. भिडे म्हणतात, ‘ज्यात काही अनुभव, उपदेश, माहिती, सार्वकालिक सत्य किंवा ज्ञान गोवलेले आहे, ज्यात काही चटकदारपणा आहे आणि संभाषणात वारंवार योजतात असे वचन म्हणजे म्हण होय.’ दुर्गा भागवत यांनी ‘जनतेने आत्मसात केलेली उक्ती म्हणजे म्हण’ असे म्हटले आहे. वा.म. जोशी म्हणतात, ‘थोडक्यात व मधुर शब्दांत जिथे पुष्कळ बोधप्रद अर्थ गोवला जातो, त्या वाक्यांना म्हणी असे म्हणतात’...
अभीष्टचिंतन (Well Wishing)
पुढारी मंडळींना नेहमी प्रकाशात राहवे लागते. अन्यथा लोक त्यांना विसरून तर जाणार नाहीत ना, अशी चिंता त्यांना सतत लागून राहिलेली असते. त्यामुळे अनेक जण...