हिंगोली : शेतकऱ्यांच्या मीराई !

हिंगोली येथील मीरा कदम या शिक्षिका स्वत: पायांनी अधू आहेत. त्यांचे दोन्ही पाय पोलिओमुळे निकामी झाले. त्यांना चालताना कशाना कशाचा आधार घ्यावा लागतो; पण त्यांची वृत्ती मात्र आधार देण्याची आहे ! त्यांनी मुख्यत: आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या मुलांना पोरकेपणाची जाणीव होऊ नये म्हणून ‘सेवासदन’ वसतिगृह चालवले आहे. त्यांच्या या प्रयत्नांची सुरुवात एकोणीस वर्षांपूर्वी झाली. मीरा कदम यांचे वडील वारले, तेव्हा त्यांना वडिलांचे छत्र हरपल्याने निर्माण होणारी पोकळी जाणवली. त्यांनी पाच मुले शिक्षणासाठी दत्तक घेतली. त्यांच्या कार्याला लोकांचा पाठिंबा मिळाला, तेव्हा त्यांनी चाळीसपर्यंत मुलांना शिक्षणासाठी आर्थिक मदत देणे सुरू केले. मीरा यांनी आत्महत्या करू नका असा संदेश देण्याचे ठरवले. गावोगावी जाऊन मंदिरातील ध्वनिवर्धकावरून त्या ‘आत्महत्या करणाऱ्यांच्या घरातील इतरांची कशी परवड होते, तेव्हा आत्महत्या करू नका’ हे हृदयद्रावक वर्णन करून सांगू लागल्या...

अवनी: मतिमंद मुलांना मायेचे छत्र!

1
‘अवनी मतिमंद मुलांचे निवासी विद्यालय’ गेली दहा वर्षें कल्याणजवळील मुरबाड या ठिकाणी कार्यरत आहे. समाजात मतिमंद मुले ही वेडी म्हणून हिणवली जातात, दुर्लक्षित राहतात....
carasole

विज्ञानदृष्टी देणारी – वसुंधरा

‘वसुंधरा’ हे सिंधुदुर्ग जिल्हा विज्ञान केंद्र आहे. ते कुडाळ तालुक्यातील नेरूरपार या गावी साडेचार एकरांच्या परिसरात आहे. बाबा आमटे यांचे शिष्‍योत्तम सी.बी. नाईक यांनी...

अशी असावी शाळा!

6
शिक्षण व शाळा कशा असाव्यात याबाबत निर्णय करण्याचा अधिकार कोणाचा? सध्या, तो अधिकार विद्यार्थ्यांना व त्यांच्या पालकांना नाही. तो शिक्षक-शाळांचे चालक-शिक्षणतज्ज्ञ व शिक्षण खात्यातील...
-loksankhyavadhivarkahiupayaheka?

लोकसंख्यावाढीवर काही उपाय आहे का?

जगभर 11 जुलै हा लोकसंख्या दिवस म्हणून साजरा केला जातो. जगाची सतत वाढणारी लोकसंख्या हा सगळ्यांसाठीच चिंतेचा विषय होऊन गेला आहे. संयुक्त राष्ट्रसंघाने तो...

वरवंडी तांडा ते मुख्यमंत्र्यांची केबिन!

फेब्रुवारी 2019 मधील एक रात्र, औरंगाबादच्या विमानतळावरून एअर इंडियाचे विमान मुंबईकडे झेपावणार होते. विमानात पहिल्या सीटवर होते- विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे, जलसंपदा मंत्री...

पाबळचा विज्ञानाश्रम

विकास आणि शिक्षण यांची यशस्वी सांगड  आपल्या प्रचलित शिक्षणपध्दतीच्या दुखण्यावर आणि त्यावरच्या रोगापेक्षा जालीम अशा उपाययोजनांवर चर्चा नेहमी होते. मूलगामी बदल व्हायला हवा यावर सर्वत्र...
carasole

कर्णबधिरांसाठी – व्‍हॉईस आफ व्‍हॉईसलेस

5
सोलापूर जिल्ह्याच्या मोहोळ तालुक्यातील शेटफळ गावाच्या योगेश व जयप्रदा भांगे या दाम्पत्याने त्यांच्या कर्णबधिर मुलाला बोलायला तर शिकवलेच; पण इतर कर्णबधिर मुलांना व त्यांच्या...
-yuvraj-ghogre-vithhalwadischool

युवराज घोगरे यांचा एकच ध्यास- शाळेचा सर्वांगीण विकास! (Yuvraj Ghogre)

युवराज घोगरे यांच्या शिक्षक म्हणून नोकरीची सुरुवात 12 मार्च 2005 रोजी जळगाव जिल्ह्यातील विवरे या लहानशा गावी जिल्हा परिषद शाळेत झाली. त्या गावात येण्या-जाण्याची...

अनुभव अमेरिकेत शिकवण्याचा

मी अमेरिकेत ऑस्टिन शहरात माध्यमिक शाळेत गेली दहा वर्षें शिकवत आहे. इतक्या वर्षांनंतर, मला माझ्या तेथील शाळेबद्दल तितकीच माया, प्रेम वाटते जितकी आपुलकीची...