महेश लाडणे : नाणीसंग्रह; अभ्यास अभी बाकी है !
शेवगाव तालुक्यातील अमरापूर गावच्या महेश लाडणे याच्या नाणीसंग्रहाची सुरुवात कुतूहलातून झाली. तो इयत्ता नववीत शिकत असताना घरात जुनी पितळी तांब्याची भांडी, वजनमापे अशा काही वस्तू असल्याचे त्याच्या लक्षात आले. त्यात वजनमापे वाटतील अशा गोलाकार आणि जाडजूड तांबे धातूच्या काही गोष्टी होत्या. तो ते साहित्य जमवत गेला. त्यातून त्याचा नाणेसंग्रह आकारास आला. त्याच्या संग्रहात आठशे नाणी आहेत. ती विविध धातूंची, विविध आकारांची, विविध किंमतीची, विविध लिपींतील आहेत...
ज्ञानेश्वरी (Dnyaneshwari)
‘ज्ञानेश्वरी’ हा संत ज्ञानेश्वरांचा प्रसिद्ध ग्रंथ होय. ज्ञानेश्वरांनी ‘ज्ञानेश्वरी’ असे नाव त्या ग्रंथाला दिलेले नाही. ‘भावार्थदीपिका’ हे ज्ञानेश्वरीचे मूळ नाव होय. ज्ञानेश्वरांच्या ग्रंथाला ‘देशीकार...
नईमभाई पठाण – पुरातन वस्तूंचे संग्राहक
नाशिक जिल्ह्याच्या निफाडमध्ये राहणारे नईमभाई पठाण हे हरहुन्नरी व्यक्तिमत्व आहेत. ते ‘नाशिक जिल्हा ग्रंथालय संघा’चे बावीस वर्षांपासून कार्यवाह म्हणून कार्यरत आहेत. त्यांना 2012 साली ग्रंथमित्र पुरस्कारही मिळाला. ते त्यांचे घड्याळदुरुस्ती व विक्री हे परंपरागत दुकान सांभाळून आजुबाजूच्या गावातून, शहरांतून फेरफटका मारतात. तेथील जुने बाजार धुंडाळतात. दुर्मीळ, अनोख्या वस्तूंचा त्यांचा संग्रह पाहण्याजोगा आहे...
नाण्यांच्या माध्यमातून अर्थसाक्षरता – जयवंत जालगावकर (Jaywant Jalgaonkar – Bankman loves coins and liquor...
दापोलीचे जयवंत जालगावकर हे जवळजवळ गेली तीस वर्षे स्थानिक अर्बन को ऑपरेटिव्ह बँकेचे अध्यक्ष आहेत. त्यांच्यावर जिल्हा बँकेच्या व कधी कधी राज्य बँकेच्या जबाबदाऱ्याही असतात. तरीसुद्धा जयवंत हे केव्हाही दिलखुलास असतात. जयवंत यांना दोन महत्त्वाचे छंद आहेत. पहिला विविध वस्तू, विशेषतः नाणी जमवण्याचा. त्यांच्याकडे सत्तावीस देशांची चलनातील नाणी आहेत. जयवंत यांचा दुसरा छंद अनोखा आहे. ते दारूच्या भरलेल्या बाटल्या जमा करतात. विविध आकारांच्या, विविध शैलींच्या, विविध देशांच्या अशा पाचशेदहा बाटल्या त्यांच्या संग्रही आहेत...
दौत, टाक आणि टीपकागद
ज्यावेळी माणसाला त्याचे विचार जसेच्या तसे इतरांना कळावेत आणि ते जसेच्या तसे संग्रहित करून ठेवावेत याची गरज निर्माण झाली त्यावेळी लिपीचा शोध लागला. माणूस...
अभीष्टचिंतन (Well Wishing)
पुढारी मंडळींना नेहमी प्रकाशात राहवे लागते. अन्यथा लोक त्यांना विसरून तर जाणार नाहीत ना, अशी चिंता त्यांना सतत लागून राहिलेली असते. त्यामुळे अनेक जण...
पंढरपूरचा कैकाडी महाराज मठ
कुठल्याही एका देवाची अथवा महाराजांची प्रामुख्याने उपासना करणारे मठ असतात. कैकाडी महाराजांचा मठ त्या परंपरेला अपवाद आहे. कैकाडी महाराजांनी अनेक वर्षे जमिनीला पाठ न...
शंकराचार्यांचा विवेकचूडामणि ग्रंथ
शंकराचार्य हे भारतीय संस्कृतीतील धर्मविचारांचे आद्यगुरू. शिवगुरु भट्ट व आर्याम्बा यांच्या पोटी शंकराचा प्रसाद म्हणून त्यांचा जन्म झाल्याची भावना मनी बाळगून त्यांचे नाव शंकर असे ठेवण्यात आले. शंकर मेधावी होते. ते प्रकांडपंडित म्हणून वयाच्या सहाव्या वर्षीच ओळखले जाऊ लागले. त्यांना वयाच्या आठव्या वर्षी गुरू गोविंदांकडून संन्यास प्राप्त झाला. त्यांना आयुष्य केवळ बत्तीस वर्षांचे लाभले. त्यांनी जवळपास चाळीस ग्रंथांची निर्मिती केली आहे...
सट्टा-मटका बाजाराची मराठी भाषा
बसस्थानकांवरील वर्तमानपत्रे व पुस्तके यांच्या विक्रेत्यांकडे गुलाबी-पिवळे कागद असतात आणि त्यावर काही आकडे... ते कागद ‘आकडा लावतात त्यासाठी असतात’ त्याला ‘पॅनल चार्ट’ म्हणतात. मटकेबाजाराची...
तेरचा प्राचीन वारसा
तेर हे उस्मानाबाद जिल्ह्यातील एक पुरातत्त्वीय स्थळ आहे. ते ठिकाण उस्मानाबादपासून ईशान्येला अठरा किलोमीटर अंतरावर असून तेरणा नदीच्या दक्षिण काठावर वसलेले आहे. त्या नगराला प्राचीन काळी ‘तगर’ या नावाने ओळखले जात होते. तेर हे महत्त्वाचे व्यापारी केंद्र म्हणून सातवाहन काळापासून ख्यातकीर्त होते...