थिंक महाराष्ट्र
महाराष्ट्र – भारताचे ‘चौदावे रत्न’ (Maharashtra State is Born – Atre Narrates the story)
महाराष्ट्र राज्याच्या निर्मितीसाठी आचार्य अत्रे यांनी व्यक्तिश: आणि त्यांच्या ‘नवयुग’ साप्ताहिकाने व ‘दैनिक मराठा’ यांनी अतुलनीय कामगिरी केली. अत्रे यांनी ‘नवयुग’मध्ये 1 मे 1960 रोजी लिहिलेला लेख.
दुष्काळाला द्या अर्थ नवा (Famine – may there be new meaning)
‘हिंदुस्थानातील दुष्काळ’ या विषयावर निबंधस्पर्धा निर्णयसागर छापखान्याने 1903 मध्ये (एकशेअठरा वर्षांपूर्वी) आयोजित केली होती, त्यासाठी मोठे पारितोषिक घोषित केले होते.
ओरायन, आर्क्टिक होम : टिळक यांची बौद्धिक झेप (Orion And Arctic Home in The...
स्वातंत्र्यपूर्व भारताच्या खदखदणाऱ्या राजकारणात आत्यंतिक महत्त्वाची भूमिका बजावत असतानाही लोकमान्य बाळ गंगाधर टिळक हे ‘द ओरायन’ आणि ‘द आर्क्टिक होम इन वेदाज्’ या ग्रंथांसाठीचे संशोधन करत होते! ते संशोधन म्हणजे त्यांच्या बुद्धिकौशल्याची चुणूक आहे.
समाजसुधारक काशिनाथ त्र्यंबक तेलंग (Telang, Social Reformer)
काशिनाथ त्र्यंबक तेलंग यांचा जन्म 30 ऑगस्ट 1850 रोजी झाला. ते विविध पदांमुळे व त्यास अनुरूप कार्यामुळे ओळखले जातात - प्राच्यविद्या संशोधक, न्यायमूर्ती, कायदेपंडित, समाजसुधारक, अखिल भारतीय काँग्रेसचे एक संस्थापक,
मोडी लिपी – मराठीचा शॉर्टहँड (Modi – Historical Script of Marathi Language)
मोडी ही लिपी तेराव्या शतकापासून विसाव्या शतकापर्यंत मराठी भाषेच्या लेखनाची प्रमुख लिपी होती. त्या आधीची दोनशे वर्षे ती महाराष्ट्रात असल्याच्या खुणा मिळतात. मोडीमधील सर्वात जुना उपलब्ध लेख सन 1189 सालचा आहे.
कीर्तन परंपरा आणि अपेक्षा (Art Of Keertan – Maharashtra’s Rich Tradition)
कीर्तनपरंपरा म्हणजे महाराष्ट्र संस्कृतीचे वैभव होय. कीर्तन परंपरा म्हणजे रंजन आणि शिक्षण यांचा अपूर्व समन्वय आहे. महाराष्ट्रात नारदीय आणि वारकरी अशा दोन कीर्तन परंपरा आहेत. मात्र अलिकडे नारदीय कीर्तन परंपरा दुर्बल झाली आहे.
धडवईवाले यांचे इंदुरी मराठीकारण (Dhadwaiwale: Cause of Marathi Language In Madhya Pradesh)
अनिलकुमार धडवईवाले हे इंदूर शहरी जन्मापासून राहतात, पण मराठी भाषेचा सन्मान आणि संवर्धन हा त्यांच्या जिव्हाळ्याचा व अभिमानाचा विषय आहे. त्यांनी ‘मराठी रक्षण समिती’ या संस्थेची स्थापना तेथे केली.
मंगळवेढा, भूमी संतांची (Mangalvedha Saintly Land)
मंगळवेढा हे गाव संतभूमी म्हणून महाराष्ट्राला परिचित आहे. ते आहे सोलापूर जिल्ह्यात; पंढरीच्या विठुरायापासून अवघ्या बावीस किलोमीटर अंतरावर, दक्षिणेला. महाराष्ट्र आणि कर्नाटक राज्यांचा समन्वय तेथे साधला जातो. मंगळवेढा तालुक्याची लोकसंख्या दीड लाखाच्या आसपास आहे.
लॉकडाऊन काळात चार लाखांची पुस्तकविक्री (More Marathi Books Sold in Lockdown Period)
भारतात लॉकडाऊन 24 मार्च 2020 रोजी सुरू झाला. लॉकडाऊनला 24 जुलैला चार महिने पूर्ण झाले. त्या चारपैकी एप्रिल आणि मे या दोन महिन्यांत नियमांची फार कडक अंमलबजावणी होती. पोलिसांच्या लाठ्यांचा प्रसाद व्हॉटसअॅपवर व्हायरल होत होता. लोक घराबाहेर पडत नव्हते.
विष्णूचे उपासक – वैष्णव संप्रदाय (Sect of Vaishnav – Vishnu’s Worshippers)
विष्णू आणि त्याचे राम व कृष्ण हे दोन मुख्य अवतार यांची आराधना करणारा तो वैष्णव संप्रदाय. नारायण-विष्णूमधील नारायण या देवाचा उल्लेख प्रथम ‘शतपथ ब्राह्यण’ ग्रंथात आढळतो. तो वैदिक देव नव्हे. विष्णू या देवाचा उल्लेख ऋग्वेदात फक्त पाच सूक्तांत आहे.