Home Search

व्यक्ती - search results

If you're not happy with the results, please do another search

व्यक्ती

सर्वसामान्य माणसे त्यांच्या कर्तृत्वाने समाज घडवत असतात. परंतु अशा माणसांकडे दुर्लक्ष होते आणि लता मंगेशकर, शरद पवार, माधुरी दीक्षित, सचिन तेंडुलकर अशा सेलिब्रिटींची नावे समाजाचे कर्तृत्ववान प्रतिनिधी म्हणून...

गोपाळकृष्ण गोखले- व्यक्ती व संस्थापक (Gopal Krishna Gokhale – Thinker among freedom fighters)

गोपाळकृष्ण गोखले यांचे भारतीय स्वातंत्र्य चळवळीतील योगदान बहुमुल्य आहे. ते बहुविध गुणांनी नावाजले गेले होते - भारतीय स्वातंत्र्य आंदोलनाचे नेमस्तवादी पुढारी, उत्कृष्ट संसदपटू, देशभक्त राजकारणी, तर्कशुद्ध मांडणी शांतपणे करणारे अभ्यासू अर्थतज्ञ,

वसईतील मराठी भाषक ख्रिस्ती व्यक्तींची चरित्रे आणि आत्मचरित्रे (Biographies and Autobiographies of Marathi Speaking...

मराठी भाषक ख्रिस्ती समाजात चरित्र आणि आत्मचरित्र यांचे प्रमाण अगदी कमी होते. कॅथॉलिक पंथीय ख्रिस्ती समाजात तर संत चरित्र आणि अनुवादित (इंग्रजीतून) अशी धर्मगुरुंची आत्मचरित्रे लिहिण्यावरच भर अधिक होता.

जन्मशताब्दी साजरी होत असलेल्या व्यक्ती (Janmashatabdi Sajari Hot Asalelya Vyakti)

मी, माझा सहकारी राजेंद्र शिंदे आणि विनय नेवाळकर, आम्ही त्या तिघांच्या जन्मशताब्दीचा विचार करताना वेगळीच कल्पना लढवली. गेल्या शतकातील व या शतकाच्या पहिल्या काही दशकांत सामाजिक-सांस्कृतिक जीवन घडले गेले ते ढोबळपणे 1900 ते 1930 या काळात जन्मलेल्या महनीय व्यक्तींच्या संस्कारांतून. त्यांच्याच जन्माची शंभर वर्षे विद्यमान ज्येष्ठ जनांना महत्त्वाची वाटत आहेत व तो वारसा पुढील पिढ्यांपर्यंत जावा असेही वाटत आहे.

अभिव्यक्ती स्वातंत्र्याला प्राईस टॅग असतोच!

प्रशांत भूषण यांनी काश्मीर प्रश्नावर सार्वमत घ्यावे असे म्हणून देशात खळबळ  उडवून दिली आहे. श्रीराम सेनेनेही आपले अभिव्यक्ती स्वातंत्र्य वापरून भूषण यांना मारहाण केली, ते...

मोर्णाकाठची अकोलानगरी ( Akola on the banks of Morna )

0
 अकोला हे शहर मोर्णा नदीच्या तीरावर वसलेले आहे. नदीचा उपयोग आक्रमण करणाऱ्या शत्रूविरुद्ध नैसर्गिक संरक्षणाची फळी असा होई, त्या काळची ही गोष्ट आहे. म्हणूनच मोर्णा नदीच्या पश्चिमेला आसदगडाची निर्मिती  होऊन, त्याला...

एकसरचे वीरगळ (Hero Stones of Eksar)

दहिसर बोरिवलीच्या दरम्यान एकसर नावाचे खेडे होते. आजही त्याला एकसर व्हिलेज अशे म्हणतातपण त्यात खेडे असण्याच्या  कुठल्याही खूणा दिसत नाहीत. अशा या ठिकाणी सहा...

थिंक महाराष्ट्र च्या वर्धापन दिनी तीन पुस्तकांचे प्रकाशन

लेखनावर अथवा कलाविष्कारावर सद्यकाळात कोणतेही बंधन जाणवत नाही असा स्पष्ट निर्वाळा लेखक-अभिनेते अभिराम भडकमकर आणि नाट्यदिग्दर्शक कुमार सोहोनी यांनी व्यक्त केला. ते ‘थिंक महाराष्ट्र डॉट कॉम’च्या वर्धापनदिन कार्यक्रमातील परिसंवादात बोलत होते. ‘व्हिजन महाराष्ट्र फाउंडेशन’संचालित ‘थिंक महाराष्ट्र डॉट कॉम’ या वेब पोर्टलचा चौदावा वर्धापनदिन अर्थात ‘सद्भावना दिवस 2024’, ठाण्यातील बाळासाहेब ठाकरे स्मारक सभागृहात झाला. महाराष्ट्रातील मराठी माणसाचा चांगुलपणा आणि त्याची प्रज्ञा-प्रतिभा ह्या ‘नेटवर्क’मध्ये नव्या-जुन्या पिढीतील सर्वांनी त्यांच्या लेखणीने, विचारांनी आणि प्रत्यक्ष कार्यक्रमांतूनही योगदान द्यावे असे आवाहन ह्या वेळी करण्यात आले...

गुढीपूर – काल आणि आज

मुंबई गोवा महामार्गावरून प्रवास करताना कुडाळमध्ये पिंगुळी हे छोटे कलाग्राम आहे. या पिंगुळी गावात गुढीपूर नावाची ठाकर लोककलाकारांचीची वाडी आहे. ठाकर लोककलाकारांमध्ये पिंगळी, पांगुळ, गोंधळी व बावलेकर असे लोककलाकार आहेत. ते सगळे एकाच समूहाचा भाग असले तरी लोककलेच्या सादरीकरणामधली त्यांची कामे आणि साधने वेगवेगळी आहेत. गुढीपूर वाडीविषयी, तेथील लोककलाकारांविषयी, कलेविषयी आणि जगण्याच्या धडपडीविषयी आत्मियतेने सांगताहेत पिंगुळी, चित्रकथी या लोककलेच्या अभ्यासक माणिक वालावालकर...

नाटककार-संपादक विद्याधर गोखले

1
विद्याधर गोखले यांच्या जन्मशताब्दीचे 2024 हे वर्ष आहे. 1960 ते 1980 ही दोन दशके मराठी संगीत नाटक म्हणजे विद्याधर गोखले असे जणू समीकरणच होते. मराठी संगीत नाटक ही मराठी संस्कृतीलाच नव्हे तर जागतिक रंगभूमीला असलेली देणगी आहे. गोखले यांनी पदवी शिक्षण पूर्ण झाल्यावर अध्यापन काही वर्षे केले. त्यानंतर त्यांनी ‘दैनिक लोकसत्ता’मध्ये नोकरी पत्करली. अनेक वर्षे ‘लोकसत्ता’मध्ये काम करून पत्रकारितेमधील कारकीर्द गाजवली. त्यांनी ‘लोकसत्ता’मध्ये संपादक म्हणूनही जवळजवळ पाच वर्षे काम केले...