Home Search
ग्रामदैवत - search results
If you're not happy with the results, please do another search
ग्रामदैवत खंडेराव महाराज
श्री खंडोबाराय हे लोकदैवत आहे. खंडेराव हे साळी, माळी, कुणबी, कोळी, सुतार, सोनार, महार-मांग, धनगर, ब्राह्मण, मराठा, लोहार, कहार, चांभार, मेहतर या अठरापगड जातींचे...
माढ्याचे ग्रामदैवत – माढेश्वरी देवी
माढा हे सोलापूरच्या माढा येथील तालुक्याचे गाव. तेथील ग्रामदैवत माढेश्वरी हीच्या नावावर त्या गावाचे माढा असे पडले. महाराष्ट्राची कुलस्वामिनी तुळजाभवानी मातेची प्रतिरूपे सोलापूर जिल्ह्यात...
टिक्केवाडीचे ग्रामदैवत – भुजाईदेवी
कोल्हापुरातील भुदरगड तालुक्यात दक्षिणेकडे टिक्केवाडी हे गाव आहे. सह्याद्रीच्या दोन डोंगरांमध्ये वसलेल्या टिक्केडवाडीची लोकसंख्या दोन-अडीच हजारांची. टिक्केवाडी गावाचे ग्रामदैवत म्हणजे भुजाईदेवी.
भुजाईदेवी हे जागृत देवस्थान...
क-हाड नगरीचे ग्रामदैवत: श्री कृष्णाबाई
कृष्णा-कोयनेच्या प्रीतिसंगमाने पुनित झालेल्या कराड नगरीचे नाव भारतात अनेक दृष्टींनी प्रसिद्ध आहे. नगरीला तिन्ही बाजूंनी कृष्णा व कोयना या नद्यांनी वेढलेले आहे. या नद्यांच्यामुळे कराड...
घंटीबाबांची दिग्रस नगरी कापसाची पंढरी
दिग्रस हा यवतमाळ जिल्ह्याच्या सोळा तालुक्यांपैकी एक. दिग्रस हे शहर पूर्वी ‘डिग्रस’ म्हणून ओळखले जात असे. त्याचे दिग्रस हे नाव कसे पडले, याबाबत काही दंतकथा आहेत. त्यांपैकी एक म्हणजे तेथील झाडापासून डिंकाचा रस जास्त मिळत असल्याने त्याचा अपभ्रंश डिग्रस असा झाला. कोणी ‘ग्रेसफुल’ अर्थाने, तर कोणी ‘दि ग्रेट’ अर्थाने दिग्रस या शब्दाचा अर्थ सांगतात. दिग्रस हे शहर यवतमाळपासून बहात्तर, अमरावतीपासून एकशेचौदा, तर नांदेडपासून एकशेअडतीस किलोमीटर अंतरावर आहे. दिग्रसने स्वत:चा वेगळा ठसा कृषी, राजकारण, कला, क्रीडा, अध्यात्म, शिक्षण अशा विविध क्षेत्रांत उमटवला आहे...
वैभवशाली लातूर (Latur’s cultural affluance)
मला लातूर, कानापूर-मोहा आणि मुंबई ही गावे व्यक्तिगत जिव्हाळ्याची वाटतात. लातूर हे माझे जन्मगाव. लातूर सध्या शिक्षणवर्गांसाठी ‘लातूर पॅटर्न’ म्हणून गाजत असते. माझे लातूरशी भावनिक नाते आहे. माझे प्राथमिक व माध्यमिक शिक्षण तेथे झाले. बीड जिल्ह्यातील कानापूर-मोहा हे माझे वडिलोपार्जित गाव. मी उच्च शिक्षण व व्यवसायक्षेत्र म्हणून मुंबई महानगराशी ममत्वाने जोडला गेलो आहे. देश आणि राज्य स्तरावर नोंद घेता येईल असा भौगोलिक वा नैसर्गिक समृद्धीचा वारसा न लाभलेले लातूर गाव ! मात्र ते भूकंपामुळे सर्व जगास परिचयाचे झाले. मी व्यवसायाने आर्किटेक्ट असल्याने लातूर गावाचा वास्तुशास्त्रीय दृष्टिकोन आढावा घेत आहे. लातूर गावास प्रागैतिहासिक पार्श्वभूमी लाभली आहे. ती तेथे प्राप्त झालेल्या शिलालेखांतून सिद्ध होते...
संतनगरी आकोट (Akot- City of Saints from Vidarbha)
आकोट हे गाव विदर्भाच्या अकोला जिल्ह्यातील तालुक्याचे ठिकाण आहे. ते संतनगरी म्हणूनच ओळखले जाते. तेथे श्री नरसिंग महाराज यांचे वास्तव्य होते. ते शेगावचे गजानन महाराज यांचे समकालीन संत व गुरुबंधू होते. त्या दोघांमध्ये स्नेहबंध घट्ट होता. गजानन महाराज नरसिंग महाराजांना भेटण्यास आकोट येथील त्यांच्या ‘झोपडी’त येत असत; त्या दोघांच्या आध्यात्मिक चर्चा चालत असत. त्या संबंधात विविध दंतकथा आहेत. गजानन महाराजांनी मनकर्णिका व दुसरी अकोलखेडची विहीर, या दोन विहिरींना पाणी आणून आकोट परिसरात सुबत्ता निर्माण केली अशीही कहाणी आहे...
मुरुडचा भूलभुलैया चौक (Murud’s 400 year old Magic Square)
गावात, शहरात चौक असतात. पण एखाद्या गावात चौकटीत किंवा चौकाच्या व्याख्येत न बसणारा असा; तरीही तो चौकच असतो, हे वाचून अचंबा वाटेल. असा चौक आहे दापोली तालुक्यात मुरुड या गावी. मुरुड हे टिंबाएवढे गाव. नकाशात त्याचे अस्तित्व ते काय दिसून येणार ! परंतु त्या गावाची ख्याती ऐतिहासिक, सांस्कृतिक आणि नैसर्गिक वेगळेपणामुळे सर्वदूर पोचली आहे. गावाची रचना विचारपूर्वक करण्यात आली असल्याचे जाणवते. दोन्ही बाजूंना घरे आणि मधोमध रस्ता. सुमारे चारशे वर्षांपूर्वीची ही रचना स्वत:चे रूप अजूनही टिकवून आहे...
दशावतार : एक समृद्ध कलावारसा (Folk Theater of Konkan –Dashavtar)
महाराष्ट्रात लोकरंगभूमीचे विविध प्रकार अस्तित्वात आहेत. त्यातलाच एक प्रकार म्हणजे दशावतार. नागर रंगभूमीच्या आधीपासून दशावतारी नाटक अस्तित्वात होते असे मानले जाते आणि आजही ते जोमदार पद्धतीने सादर होत आहे. नव्या स्वरूपात ते व्यावसायिक रंगभूमीवरही कमालीचे यशस्वी झाले आहे. अत्यंत लवचिक असा हा नाट्यप्रकार कोठल्याही काळात लोकभावनेला नाट्यरूप देऊ शकतो...
अग्रोली गाव आणि बेलापूर (Agroli Village and Belapur, Navi Mumbai)
नवी मुंबई महानगरपालिका स्थापन झाल्यावर त्यात दिघा ते बेलापूर दरम्यानच्या एकोणतीस गावांचा समावेश करण्यात आला. त्यानंतर शहरात मोठ्या प्रमाणात होत असलेल्या नागरीकरणामुळे गावांचा नकाशा बदलला. पण या सगळ्या गावांना मनोरंजक इतिहास आहे. तेथे झालेल्या आंदोलनांचा, सामाजिक चळवळींचा, मंदिरांचा आणि गडकिल्ल्यांचा वारसा आहे.
यातल्या आग्रोली आणि बेलापूर या वैशिष्ट्यपूर्ण गावांविषयी लिहित आहेत शुभांगी पाटील-गुरव...