परतवाडयाचे सव्वाशे वर्षांची परंपरा असलेले श्री विठ्ठल मंदिर

0
297

अमरावती जिल्ह्यातील अचलपूर-परतवाडा ही ऐतिहासिक वारसा लाभलेली जुळी शहरे होत. परतवाडयात आधी लष्करी छावणी होती. त्यानंतर कालांतराने तेथे गाव वसले. त्या परतवाडयाच्या वकील लाईन या परिसरात शहरातील सर्वात जुने अशी ओळख असलेले श्री विठ्ठल मंदिर आहे.

त्या मंदिराची स्थापना 1896 साली झाली. परतवाडयाजवळील गौरखेडा कुंभी येथील रहिवासी झ्यागोजी काठोळे यांनी त्यांना पुत्ररत्न व्हावे, असा नवस करून त्या मंदिराची स्थापना केली. ती करताना बडनेरा (जिल्हा अमरावती) येथील रहिवासी व धर्माधिकारी पदवी असलेले रघुनाथ मोरेश्वर भवाळकर यांना आमंत्रित केले गेले. त्यांच्याकडून काठोळे यांनी श्री गणेशाची, विठ्ठल रखुमाई, महादेव आणि हनुमान या देवतांची प्रतिष्ठापना मंदिरात करवून घेतली आणि मुख्य पुजारी म्हणून रघुनाथ भवाळकर यांची नेमणूक केली. त्यासाठी मंदिराच्या बाजूच्या जागेवर त्यांना खोली बांधण्याची परवानगी देऊन त्यांच्या निवासाची व्यवस्था केली. सध्या तेथे भवाळकर यांची चौथी पिढी वास्तव्य करत आहे.

विठ्ठल मंदिराची स्थापना झाल्यावर, तेथे मंदिरात परमहंस शंकरगुरु महाराज आले. त्यांनी मंदिराच्या मागील बाजूस असलेल्या खोलीत बारा वर्षे तर अमरावती येथे दोन वर्षे वास्तव्य केले. शंकर गुरु महाराज व त्यांचे पट्टशिष्य असलेले नारायण गुरु महाराज यांची समाधी अमरावती येथे आहे. तसेच, शंकर गुरु महाराज यांची समाधी विठ्ठल मंदिराच्या मागच्या बाजूस आहे. शंकर गुरु महाराजांच्या चरित्रात या श्री विठ्ठल मंदिराचा उल्लेख केलेला आढळतो.

सद्यकाळातही शंकरगुरु महाराज व नारायण गुरु महाराज यांचे शिष्यगण दर्शनासाठी विठ्ठल मंदिरात येतात. मंदिर 2010 मध्ये क्षतिग्रस्त झाले होते. त्यामुळे ते अचानक कोसळले. मंदिराच्या जीर्णोद्धाराचे काम प्रशासनाने वामनराव भवाळकर यांच्या अध्यक्षतेखाली करण्यास घेतले आहे. सभामंडप पूर्ण झाला असून बाकी भागाचे काम सुरू आहे.

विठ्ठल मंदिरात अनेक उत्सव साजरे होतात. त्यातील सर्वात मोठा उत्सव म्हणजे रामनवमी. त्या उत्सवाला रामजन्माचे कीर्तन होऊन रामजन्म साजरा केला जातो. रामजन्म झाल्यावर रामाचा पाळणा म्हटला जातो. तो पाळणा राजाभाऊ गुप्ते यांनी स्वातंत्र्यपूर्व काळात लिहिलेला आहे. विशेष बाब अशी, की तो पाळणा श्रीरामाला उठवण्यासाठी म्हटला जातो. तो पाळणा पुढील प्रमाणे –

घननिळा घननिळा हे परात्परा मनमोहन जगपाळा उठ रे उठ घननिळा ॥ धृ ॥

– माधुरी भवाळकर 9822051241

——————————————————————————————————

About Post Author

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here