Home Search

कराड - search results

If you're not happy with the results, please do another search
_vidnyanveda_pujari

कराडचा विज्ञानवेडा ‘पुजारी’

2
यशवंतराव चव्हाण यांचा कराडमधील ‘विरंगुळा’ बंगला हे तीर्थस्थान बनून गेले आहे. त्यांनी महाराष्ट्र राज्याची स्थापना व त्याचा विकास यांसाठी केलेले कार्य स्मरून लोक ‘विरंगुळा’...
-heading

मी कराडची होऊन गेले – सुलभा ब्रम्हनाळकर

‘डॉक्टर म्हणून जगताना-जगवताना’ या पुस्तकाच्या दुसऱ्या आवृत्तीच्या प्रकाशन कार्यक्रमात आदिती परांजपे-दामले यांनी सुलभा ब्रम्हनाळकर यांची घेतलेली मुलाखत त्यातील काही भाग. अदिती : मी तुमच्या वाचकांच्या...
carasole

प्रल्हाद पाटील-कराड – प्रगतशील शेतकरी

प्रल्हाददादांची ओळख ही ‘एक प्रगतशील शेतकरी’ म्हणून आहे. प्रल्हाददादांचा (प्रल्हाद नामदेव पाटील) जन्म २७ फेब्रुवारी १९३० रोजी जळगाव, तालुका निफाड येथे शेतकरी कुटुंबात झाला....

माणदेश : दंडकारण्यातील प्राचीन भूमी (Maharashtra’s land with ancient history)

मध्य भारतातील विस्तृत पठार हा भारताच्या पाच प्राकृतिक विभागांपैकी सर्वात प्राचीन भूभाग आहे. त्या भारतीय पठारात शंभू महादेव ही डोंगररांग आहे. दंडकारण्य हा भूभाग त्या डोंगररांगेमध्ये आहे. ‘माणदेश’ ही मेंढपाळ धनगर जमातीची भूमी त्यातच येते. ती भूमी पुण्य आहे असे ते मानतात. माणदेशाचे एकूण क्षेत्रफळ अठ्ठेचाळीस हजार सातशे चौरस किलोमीटर आहे. माणदेश हा पश्चिम महाराष्ट्रातील सातारा, सांगली आणि सोलापूर या तीन जिल्ह्यांच्या सरहद्दीवर पसरलेला आहे. तो सातत्याने दुष्काळग्रस्त आहे. माण आणि आटपाडी (संपूर्ण तालुके), सांगोला (एक्याऐंशी गावे), मंगळवेढा (बावीस गावे), जत (एकतीस गावे), कवठेमहांकाळ (तेरा गावे) आणि पंढरपूर (बारा गावे) या तालुक्यांचा समावेश माणदेशात होतो...

अंगण (Courtyard)

एखाद्या शब्दासरशी आपल्या मनात रूप, रंग, गंध, नाद; अशा अनेक संवेदना जाग्या होतात. ओल्या फुलाचे परागकण हाताला चिकटून यावेत तशा आठवणी जाग्या होतात. ‘मातीचा वास आला!’ या गद्य शब्दात किती सुगंध, उल्हास साठला आहे. सध्याच्या दिवसात किती असोशीने आपण त्या वासाची वाट पहात आहोत. अशाच संवेदना वेगवेगळ्या जागांशी, घरांशी संबधित असतात. आजच्या लेखात मंजूषा देशपांडे यांनी त्यांनी पाहिलेल्या आणि त्यांच्या मनातल्या अंगणांविषयी लिहिले आहे...

सरसेनापती हंबीरराव मोहिते आणि त्यांचे तळबीड (Hambirrao Mohite – Shivaji’s Military Chief and his...

छत्रपतींच्या सहकाऱ्यांमध्ये अभिमानाने नाव घ्यावे लागेल, ते सरसेनापती हंबीरराव मोहिते यांचे ! त्यांचा जन्म सातारा जिल्ह्यातील कराड शहरापासून जवळ असलेल्या तळबीड गावी 1630 मध्ये झाला. ‘हंबीरराव’ हा त्यांना त्यांच्या कर्तृत्वाबद्दल मिळालेला किताब आहे. तळबीड गावात हंबीरराव मोहिते यांचे स्मारक गावात समोरच पूर्वेकडे तोंड करून उभारलेले आहे. ती वास्तू कलात्मक आहे...

ऊसतोड कामगार आणि त्यांची गाथा

4
राज्याच्या सोळा जिल्ह्यांत बावन्न तालुके ऊसतोड व्यवसायात आहेत. ऊसशेती गेल्या सत्तर वर्षांत महाराष्ट्रात बहरली, त्यासोबत साखर कारखाने निघाले. शेतांतील ऊस तोडून त्या कारखान्यांना पुरवणारा ऊसतोड कामगार म्हणजे स्थलांतरित मजुरांचा एक मोठा समुदाय. मात्र तो समुदाय म्हणजे असे मजूर की जे जी जागा मिळेल, जसे खाणेपिणे असेल, जशी परिस्थिती असेल तशा परिस्थितीत राहतात. त्यांचा स्वत:चा पसारा असा काहीच नसतो, पण जो आहे त्यावर त्यांना ऊसतोडणीच्या हंगामाचे पाच-सहा महिने काढायचे असतात. त्यांच्या अडचणी मात्र सुटताना दिसत नाहीत...

शेवगावची वीस गावे पाण्यासाठी तहानलेली !

शेवगाव तालुक्यातील वीस गावांची पाणी योजना पंचवीस वर्षे झाली तरी प्रत्यक्षात आलेली नाही; मात्र वीस गावांसाठी पाणी आंदोलन झाले. जायकवाडी धरण बांधताना सरकारने शेवगाव तालुक्याकरता धरणातील 3.8 टी.एम.सी. पाणी राखून ठेवले जाईल असे आश्वासन दिले होते. त्यासाठी पंप ‘ताजनापूर’ या गावी बसवला जाणार होता, म्हणून त्या योजनेला ‘ताजनापूर लिफ्ट योजना’ हे नाव पडले. त्यासाठी आंदोलने, चळवळी, संघर्ष सुरू झाला आणि अद्यापही सुरूच आहे...

शिवसंदेशकार हरिभाऊ निंबाळकर

कॉ.हरिभाऊ निंबाळकर हे फलटण नगरपालिकेपासून राज्याच्या विधानसभेपर्यंत, कामगारांच्या विविध प्रश्नांपासून अनेक क्षेत्रातील कष्टकऱ्यांसाठी लढणारे झुंजार व्यक्तिमत्त्व होते. ते अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषदेचे अध्यक्ष तथा आमदार होते...

गोविंद वल्लभ पंत यांचे ओंड (Ond of G.V. Pant)

भारताचे पहिले गृहमंत्री पंडित गोविंद वल्लभ पंत व नामवंत साहित्यिक कृ.पां. कुलकर्णी हे ओंड या गावचे सुपुत्र. या गावाची पदवीधरांचे गाव म्हणून ओळख आहे...