लासूर नावाचे खेडेगाव अमरावती जिल्ह्याच्या दर्यापूरपासून बारा किलोमीटर अंतरावर आहे. ते प्रसिद्ध आहे तेथील आंनदेश्वर शिव मंदिरासाठी. आकर्षणाची गोष्ट म्हणजे ते शिवमंदिर आठशे वर्षे जुने, बाराव्या शतकात बांधलेले आहे. मंदिर उंचावर आहे. त्याचा परिसर रम्य आहे. मंदिराचे संपूर्ण दगडी बांधकाम. ते मोठमोठ्या शिळांवर कलात्मक रीत्या रचलेले. तो हेमाडपंथी स्थापत्यकलेचा उत्कृष्ट नमुना मानला जातो...
हेलस नावाचे गाव जालना जिल्ह्याच्या मंठा तालुक्यात आहे. ते गाव हेलावंतीनगरी म्हणून पुराणकाळात प्रसिद्ध होते. त्याची ओळख ‘पालथी नगरी’ म्हणूनही आहे. कारण तेथे उत्खननात प्राचीन मूर्ती, वस्तू मिळाल्या, त्या जमिनीखाली उलट्या-सुलट्या कशाही असत! म्हणून ती ‘पालथी नगरी’! मात्र तो इतिहासप्रेमींसाठी खजिना आहे. गावाचा सांस्कृतिक, पौराणिक, ऐतिहासिक वारसा थक्क करणारा आहे...
तेर हे उस्मानाबाद जिल्ह्यातील एक पुरातत्त्वीय स्थळ आहे. ते ठिकाण उस्मानाबादपासून ईशान्येला अठरा किलोमीटर अंतरावर असून तेरणा नदीच्या दक्षिण काठावर वसलेले आहे. त्या नगराला प्राचीन काळी ‘तगर’ या नावाने ओळखले जात होते. तेर हे महत्त्वाचे व्यापारी केंद्र म्हणून सातवाहन काळापासून ख्यातकीर्त होते...
काही नद्या जगाच्या नकाशात पटकन नजरेत भरतात. अमेझॉन, नाईल, गंगा, ब्रह्मपुत्रा या नद्या लांबीला अफाट, त्यांची पात्रे प्रचंड मोठी आणि त्यांच्यावर विसंबून राहणारे लोकही भरपूर. नाईल ही जगातील सर्वांत लांब नदी. ज्येष्ठ कथाकार जी.ए....
गडकिल्ल्यांवरील पाण्याचे महत्त्व रामचंद्रपंत अमात्य (छत्रपती शिवाजी महाराजांनी नेमलेल्या अष्टप्रधान मंडळातील राजनीतीचे प्रधान) यांच्या आज्ञापत्रात दिले आहे - “... तसेच गडावरी आधी उदक पाहून किल्ला बांधावा. पाणी नाही आणि ते स्थल तो आवश्यक बांधणे...
खोपटे हे उरण तालुक्यातील अरबी समुद्रालगतच्या खाडीकिनारी वसलेले, विस्ताराने मोठे गाव. ते गाव सात पाड्यांनी मिळून बनले आहे. गावात इतर गावांसारखाच गणेशोत्सव साजरा होतो, पण तेथील गावकरी त्याच्या जोडीला आणखी एक वैशिष्ट्यपूर्ण उत्सव साजरा...
मेणवली हे वाईपासून तीन किलोमीटरवर असलेले कृष्णा नदीकाठचे लहानसे गाव. त्याची ओळख नाना फडणवीस यांचे गाव अशी आहे. औंधचे भवानराव त्रंबक पंतप्रतिनिधी आणि साताऱ्याचे रघुनाथ घनश्याम मंत्री यांच्याकडून नाना फडणवीसांना मेणवली गाव देणगी म्हणून...
चिमाजी अप्पांनी वसई परिसरातील किल्ले पोर्तुगीजांकडून जिंकून घेतल्यानंतर तेथील वेगवेगळ्या चर्चमधून ज्या घंटा मिळाल्या त्या महाराष्ट्रातील विविध मंदिरांत नेऊन बसवण्यात आल्या आहेत. फादर कोरिया यांनी केलेले ते संशोधन मोठे रसपूर्ण आहे...
चिमाजी अप्पा यांच्या नेतृत्वाखाली...
माणिकगड किल्ला चंद्रपूर जिल्ह्याच्या ‘जिवती’ तालुक्यातील घनदाट जंगल आणि उंच डोंगररांगा आणि त्यातील एका डोंगरावर दाट वनराजीमध्ये भग्न अवस्थेत आहे. तो शहराच्या दक्षिणेला साठ किलोमीटरवर, गडचांदूरपासून जवळ आहे. ‘माना’ जमातीचा नागवंशीय राजा नवव्या शतकात...
पोर्तुगीजांनी इसवी सन 1686-1743 च्या दरम्यान बांधलेली फोर्टमधील वसाहत उंच तटबंदीने घेरलेली होती. फोर्ट परिसरात खासगी वापरासाठी व व्यावसायिक कार्यालयांसाठी जागा कमी पडू लागली; मात्र त्याचा विस्तार करणे शक्य नव्हते. ब्रिटिश राजवट भारतात 1858...