अस्वलाला मराठीत भालू, रीस, नडघ, भल्ल, रिछ, तिसळ अशी नावे आहेत. संस्कृतमध्ये ऋक्ष म्हणजे अस्वल. त्याशिवाय अस्वल चालताना मागे वळून पाहते, म्हणून पृष्ठदृष्टिक; चिडले, की भयंकर ओरडते म्हणून दुर्घोष; तर त्याचे केस लांब व दाट असतात म्हणून दीर्घकेश अशीही नावे आहेत...