अमरावती व भोगावती या दोन नद्यांच्या डाच्यात वसलेले गाव, म्हणून माझ्या गावाचे नाव ‘दोंडाचा’. त्याचा अपभ्रंश ‘दोंडाईचा’. ते माझे माहेर, म्हणजे माझी जन्मभूमी व कर्मभूमीसुद्धा, म्हणून मला माझ्या गावाचा अभिमान खूपच वाटतो. ते ठिकाण शिंदखेडा तालुका आणि धुळे जिल्हा येथील, गजबजलेले व अनेक अंगांनी बहरलेले आहे. सामाजिक, शैक्षणिक, धार्मिक, आध्यात्मिक, साहित्यिक, कलात्मक उत्कृष्टता, समाजोपयोगी राजकारण, विशेष वैद्यकीय सुविधा, महानगरपालिका, आर्थिक उलाढाल -उत्तम बाजारपेठ -विविध उद्योग कारखानदारी, मका फॅक्टरी, शेती व्यवसाय, दुग्धव्यवसाय, मिरची उत्पादन अशा विविध बाबींनी समृद्ध असे माझे दोंडाईचा गाव...