योगीराज बागूल यांनी ‘डॉ.बाबासाहेब आंबेडकर आणि त्यांचे दलितेतर सहकारी’ हे पुस्तक लिहिले. त्या पुस्तकाच्या प्रकाशनानंतर हर्षदीप कांबळे (आय ए एस) आणि दंतवैद्य विजय कदम यांनी ‘डॉ.बाबासाहेब विचार मंचा’च्या माध्यमातून बाबासाहेबांच्या त्या शिलेदारां
योगीराज बागूल यांच्या ‘डॉ.बाबासाहेब आंबेडकर आणि त्यांचे दलितेतर सहकारी’ या पुस्तकाचे दोन खंड आहेत. पहिल्या खंडाची पहिली आवृत्ती प्रसिद्ध झाली ती 16 ऑक्टोबर 2015 रोजी. दुसऱ्या खंडाची पहिली आवृत्ती 3 ऑक्टोबर 2021 रोजी. दोन्ही खंड ‘ग्रंथाली’ने प्रसिद्ध केले. त्या दोन पुस्तकांनी एक वेगळीच खळबळ वाचकांच्या विचारविश्वात आणि आंबेडकरी चळवळीत उडवून दिली आहे. तो महत्त्वाचा असा दस्तऐवज योगीराज बागूल या ऊसतोड कामगाराच्या मुलाने परिश्रमपूर्वक तयार करून ठेवला आहे. मी त्या दोन्ही पुस्तकांच्या निर्मितीचा साक्षीदार आहे. त्या पुस्तकांची निर्मिती सहजच्या चर्चेतून घडून आली आहे. पण ती काळाची गरज होती आणि ऐतिहासिक दस्तऐवज म्हणून त्या पुस्तकांचे मोल करता येणार नाही असे आहे !
दिनकर गांगल यांचा आणि माझा जुना परिचय आहे. मी सुब्रमणीय भारती-भारतीयार या तमिळ कवीच्या ‘कण्णन पाट्टु’ या खंडकाव्यातील काही कविता भाषांतरीत केल्या होत्या. त्या संबंधात गांगल यांच्याशी बोलणे होई. त्यांना अशा घटनांत औत्सुक्य असते. त्यामुळे तो परिचय स्नेहात रूपांतरित झाला. मी तशा तेरा कवितांचे भाषांतर केले आहे. मी मुंबईत आलो, की त्यांच्या घरी जाणे होई. मी 2008 मध्ये एकदा त्यांच्याकडे चेंबूरला ‘कण्णन पाट्टु’च्या भा
बागूल यांची ती दोन पुस्तके वाचत असताना त्यांनी गेली पंधरा वर्षे केलेले किती परिश्रम, किती प्रवास, भेटीगाठी, मान-अपमान-धु
आंबेडकर यांचे दलितेतर सहकारी शोधावे कसे त्याचा एक संदर्भ म्हणून मी आमच्या घरी असलेला एक फोटो बागूल यांना आरंभीच दाखवला होता. बाबासाहेब महाडला 1946 मध्ये आलेले असताना काढलेल्या त्या फोटोत अकरा दलितेतर सहकारी एकत्र असल्याचे दिसतात. तेथून सुरुवात झाली आणि योगीराज यांनी त्या विस्मृतीत जात असलेल्या चोवीस सहकारी शिलेदारांची दुर्मीळ माहिती संकलित केली. परंतु असे एक पुस्तक काय प्रकारचे भावविश्व व विचारविश्व उभे करू शकते त्याचा अनुभव आम्ही घेतला. योगीराज यांच्या पुस्तकाचा पहिला भाग केंद्रीय मंत्री सुशिलकुमार शिंदे यांच्या हस्ते प्रकाशित झाला आणि काही दिवसांतच हर्षदीप कांबळे (आय ए एस) आणि दंतवैद्य विजय कदम यांनी त्यांच्या ‘डॉ.बाबासाहेब विचार मंचा’च्या माध्यमातून बाबासाहेबांच्या त्या शिलेदारांचे एकवीस जिवंत वारस शोधून काढून त्यांचा मालाड येथे 2017 साली भव्य सत्कार घडवून आणला ! त्यावेळी तेथे आलेल्या त्या सत्कारमूर्तींच्या चेहऱ्यावरील कृतज्ञतेची भावना ही योगीराज यांच्या त्या अथक परिश्रमांची पावती होती ! काहींचे मन सद्गदित झाले तर काहींच्या डोळ्यांच्या पापण्या ओलावल्या. प्रत्येकाच्या मनात त्याच्या/तिच्या पूर्वजांप्रती कृतज्ञतेची व कृतार्थतेची भावना होती.
‘डॉ.बाबासाहेब आंबेडकर आणि त्यांचे दलितेतर सहकारी’ या ग्रंथाला सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचा ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर उत्कृष्ट संशोधन असा पुरस्कार मिळाला. तो ब्रुमिंग्टन येथील इंडियाना विद्यापीठाचे वरिष्ठ अभ्यासक आणि संशोधक प्रा. केव्हीन ब्राऊन यांच्या हस्ते आणि विद्यापीठाचे कुलगुरू नितीन करमळकर यांच्या उपस्थितीत विद्यापीठाच्या ज्ञानेश्वर सभागृहात 21 एप्रिल 2022 रोजी प्रदान करण्यात आला.
बाबासाहेब आंबेडकर यांची चळवळ ही केवळ दलित आणि नवबौद्ध किंवा पूर्वाश्रमीचे महार यांच्या उद्धाराची चळवळ नव्हती; तर ती चळवळ काळाच्या एका टप्प्यापर्यंत समाजाच्या वैचारिक उत्थानाची होती याची जाणीव ती दोन पुस्तके वाचून होते. त्यामुळेच ती चळवळ सर्व जातिधर्मांतील सहिष्णू विचारांच्या मंडळींत रुजली गेली याचे दर्शन पुस्तकांतून घडते व प्रश्न पडतो, की ती चळवळ पुढे, आंबेडकर यांच्या हयातीतच दलितांमध्ये का पसरली व फोफावली आणि दलितेतर सहकारी चळवळीपासून दूर होत गेले? हर्षदीप कांबळे व विजय कदम यांच्या प्रयत्नांनी एका समारंभापुरता का होईना तो दुवा सांधला गेला !
– श्रीप्रकाश अधिकारी 9423806792/9273047889 shriprakashadhikari@gmail.com
——————————
लेख आवडला, दलितेतर सहकारी चळवळी पासून दूर होत गेले ही दुर्दैवी बाब!
हा लेख खूप आवडला . व्हिडीओ पण पहिला व ऐकला
अतिशय चांगला लेख.. श्रीयुत अधिकारी आणि योगिराज बागुल यांचे अभिनंदन.