Tag: किस्से… किस्से…
नरसिंग महाराजांच्या नाना लीला
अकोला जिल्ह्यातील आकोटजवळच्या जळगाव (नाहाटे) गावात एक ब्राह्मण वतनदार पाटील होता. ही 1720 पूर्वीची गोष्ट. गावात गवळी लोकांची वस्ती जास्त होती. वतनदार पाटलांच्या पूर्वजांनी तेथे एक गढी बांधली होती. त्या गढीच्या उत्तर बाजूला एक दरवाजा होता. गढीत असलेल्या पाटलाच्या वाड्याला ‘चंदनाचा वाडा’ असे म्हणत. त्यापैकी वाडा वगळता गाव, कोट, बुरूज, विहीर व दरवाज्यांचे अवशेष कायम आहेत. त्याच नाहाटे वंशात पुंजाजी पाटील नामक गृहस्थ होते. त्यांना दोन पत्नी होत्या. ज्येष्ठ पत्नी यमाबाई व कनिष्ठ पत्नी राजुबाई. राजुबाईंचे माहेर जळगाव(नाहाटे)पासून तीन मैलांवरील शिरसोली ग्राम हे होते...
बकुळफुलांचा अक्षयगंध… अक्षयरंग… (Blossoming Bakul)
बकुळीचे झाड हे मूळचे भारतीय उपखंडातील झाड आहे. त्याच्या फुलांचा सुगंध मोहक आहे आणि रूप मनोवेधक आहे. हे झाड औषधी वनस्पतीही आहे. पूर्ण वाढलेले बकुळीचे झाड त्याच्या भरगच्च आकारामुळे दिसतेही सुंदर. बारमाही हिरवेगार असणाऱ्या त्या झाडाखाली दाट सावली असते. बकुळीच्या फुलांचे वेड सर्वांना, विशेषत: मुलींना असते. त्या फुले गोळा करत बकुळीच्या झाडाखाली तासचे तास रमू शकतात. या बहुगुणी झाडाविषयी मंजूषा देशपांडे त्यांच्या आठवणी आणि अनुभव सांगत आहेत...
मीर लायक अली फरार ! – सन 1950
भारत स्वतंत्र 15 ऑगस्ट 1947 रोजी झाला, तेव्हा हैदराबादच्या निजामाने हैदराबाद संस्थान हे एक स्वतंत्र राज्य म्हणून घोषित केले. त्या वेळी मीर लायक अली हा निजामाचा पंतप्रधान होता. भारतात सामील न होण्याचा सल्ला निजामाला देणाऱ्यांमध्ये त्याचे नाव अग्रेसर होते. मीर लायक अली हैदराबाद संस्थानात यशस्वी उद्योगपती होता. भारताने ‘ऑपरेशन पोलो’ या पोलिस कारवाईस आरंभ केल्यानंतर निजामाने राज्यात झालेल्या अत्याचारांची आणि पर्यायी युद्धाची सर्व जबाबदारी मीर लायक अली आणि त्याचे मंत्रिमंडळ यांच्यावर टाकली आणि स्वतः नामानिराळा झाला. भारताने मीर लायक अली याला नजरकैदेत टाकले. परंतु तो नजरकैदेतून पसार 1950 मध्ये झाला...
कं चे भा गु बे व – आयुष्याचे गणित
मी माझ्या आयुष्यातील जवळपास एकोणचाळीस वर्षे गणित ह्या विषयाचे अध्यापन केले. माध्यमिक शाळेत असताना पदावली (पॉलिनॉमीयल्) सोडवण्याची उदाहरणे असत. त्यासाठी सूत्र होते ‘कं चे भा गु बे व’ ! तेच आयुष्याचेही सूत्र आहे...
बाबा आमटे-रमेश गुप्ता – कवितांचे शब्दांकन
दत्तप्रसाद दाभोलकर यांनी ‘अन्वयाची अक्षरलिपी’ या कवितासंग्रहाचे परीक्षण करत असताना एक किस्सा कथन केला आहे. बाबा आमटे यांच्या ‘माती जागवील त्याला मत’ या गाजलेल्या कवितासंग्रहावर ‘शब्दांकन- रमेश गुप्ता’ असे आहे. आता, कवितांचे शब्दांकन म्हणजे काय? मग ही कवितानिर्मितीची प्रक्रिया कोणती? कविता बाबा आमटे यांची की रमेश गुप्ता यांची?...
जॉन स्मिथ की वॉल्टर स्पिंक? (John Smith or Walter Spink)
भवताल व अभ्युदय या दोन संस्थांनी अजिंठा येथे शिबिरे आयोजित केली होती. शिबीर चालू असताना, शिबिरात सांगत असलेल्या संकल्पनांमुळे एक लहान शिबिरार्थी भांबावून गेला. त्याला बाहेर आलेला पाहून शिबीर संयोजक शुभा खांडेकर यांनी त्याला काही प्रश्न विचारले. त्यावर सृजन शाहू पाटोळे या विद्यार्थ्याने गंमतीशीर उत्तर दिले...
पां.वा. काणे यांच्या नावे टपाल तिकिट
मकरंद करंदीकर हे टपाल तिकिटे व अन्य संबंधित कागदपत्रे यांचे संग्राहक पंचावन्न वर्षांपासून आहेत. त्यांना एक प्रश्न सतत टोचत असे. इतर भारतरत्नांवर टपाल तिकिटे अनेकदा प्रसिद्ध करणाऱ्या भारतीय टपाल खात्याने, डॉ.पां.वा. काणे यांच्यावर टपाल तिकिट एकदासुद्धा न काढण्याचे कारण काय ?...
राष्ट्रपतीपदाचे कलंदर उमेदवार कर्तारसिंग
काही वर्षांपूर्वी राष्ट्रपतीपदाची निवडणूक जाहीर झाली, की वर्तमानपत्रांत कर्तारसिंग यांचे नाव गाजत असे. कारण राष्ट्रपतीपदाच्या पहिल्या निवडणुकीपासून पुढील अनेक निवडणुकांपर्यंत इच्छुक उमेदवारांत कर्तारसिंग थत्ते आघाडीवर असत. त्यांचे नाव कर्तारसिंग असे असले तरी ते होते महाराष्ट्रीयन... मराठी व्यक्ती... लक्ष्मण गणेश थत्ते !
जवाहरलाल नेहरू आणि सोलापूरचा मि. वेडी
जवाहरलाल नेहरू यांनी ‘भारताला संपूर्ण स्वातंत्र्य हवे’ अशी मागणी करणारा ठराव मांडला, तो लाहोर काँग्रेसमध्ये एकमताने मंजूर झाला. तेव्हा एकीकडे सविनय कायदेभंगाच्या चळवळीने उग्ररूप धारण केले, तर दुसरीकडे जवाहरलाल यांना अटक झाली. जवाहरलाल कैदेत सापडल्याने देशभरातील तरुण वर्ग प्रक्षुब्ध झाला. त्यातूनच सोलापूरच्या हाजूभाई चौकात कलेक्टरला खुनाची धमकी देणारे पत्र चिकटवलेले सापडले. त्या पत्राखाली पत्रलेखक म्हणून ‘मि. वेडी’ अशी सही होती…
कोकणातील जलव्यवस्था
कोकणामध्ये कणकवली येथे भरलेल्या सिंचन विकास परिषदेतून गावाच्या परिसरात पूर्वी पाण्याच्या काय व्यवस्था असत ते स्पष्ट झाले. पूर्वी रत्नागिरी जिल्ह्यामध्ये तीन हजार पाणवठे होते. काही ठिकाणी बोगदे काढून पलीकडच्या घळीमधील पाणी वळवले गेले होते. त्या सर्व पाण्याच्या व्यवस्था उद्ध्वस्त झाल्या आहेत. पण त्यांच्या अवशेषांमधून एकंदर भारताच्या विविध भागांत समाजजीवनाची पाण्याच्या संदर्भातील व्यवस्था कशी होती याचे संकेत मिळतात...