ज्ञानेश्वरांकडून ज्ञानेश्वरी या ग्रंथाच्या निर्मितीनंतर वेदांतावर स्वतंत्र ग्रंथ लिहिण्याच्या उद्देशाने अमृतानुभावाची निर्मिती झाली. त्या ग्रंथात दहा प्रकरणे असून आठशेचार ओव्या आहेत. ज्ञानेश्वरांनी त्यांचा आवडता चिदविलासवाद त्या ग्रंथात सांगण्याचा प्रयत्न केला आहे.
ग्रंथ ज्ञानेश्वरांच्या स्वानुभवावर आधारलेला असल्याने त्या ग्रंथाचे नामकरण अमृतानुभव असे केले असावे. ज्ञानेश्वरांनी त्यांच्या या ग्रंथाला ‘अनुभवामृत’ असे म्हटले आहे. अमृतानुभवाच्या पहिल्या पाच श्लोकांत अक्षर, आनंद, अव्यय अशी परब्रम्हाची विशेषणे सांगून त्यांच्या गुरूची (निवृत्ती) ओळख करून दिली आहे. शिवशक्ती प्रकृती-पुरुष यांच्या ऐक्याचे वर्णन पती-पत्नीच्या रूपकातून काव्यमय असे केले आहे.
-नितेश शिंदे