Home संगीत

संगीत

कारी कारी बादरिया – मल्हार ! (Monsoon clouds and Raga Malhar)

यावर्षी पावसाने कृपा केली आहे. येणाऱ्या सुगीचे स्वप्न पहायला हरकत नाही असा माहोल आहे. ढग दाटून आले आहेत आणि पावसाच्या धारा कोसळत आहेत. या कोसळणाऱ्या धारांचे संगीत म्हणजे राग मल्हार. त्यात पावसाचे सगळे विभ्रम साठलेले आहेत. भीमसेन जोशींचा मल्हार ऐकताना गडगडणाऱ्या ढगांची आणि कोसळणाऱ्या धारांची आठवण येते. मोगरा फुलला या सदरामध्ये सौमित्र कुलकर्णी मल्हार रागाचा परिचय करून देत आहेत. रागाचे स्वरूप स्पष्ट व्हावे आणि अलौकिक गाण्याचा आनंदही मिळावा या दृष्टीने त्यांनी युट्यूब लिंक्स सोबत दिल्या आहेत. अभिजात व आधुनिक संगीताचा मेळ घालून सादर केलेली 'मल्हार जॅम' ही त्यातील एक आगळीवेगळी प्रस्तुती. स्वत: सौमित्र कुलकर्णी यांनीही एक बंदीश गायली आहे. मल्हाराच्या या धारा खचितच आनंददायी ठरतील...

स्वरांची मोहिनी (Mesmerising Music)

4
संगीताची मोहिनी अवीट आहे. प्रत्येकापाशी गाण्यांच्या आठवणी असतात. एखादं गाण पहिल्यांदा ऐकलं तेव्हाच्या किंवा एखादं गाणं ऐकत असताना घडलेल्या प्रसंगांच्या... ते गाणं आणि त्या आठवणी हातात हात घालूनच येतात. या विषयावर प्रत्येकजण स्वत:चा असा ललित लेख लिहू शकेल. भरून आलेल्या आभाळातून कोसळणाऱ्या सरींचे धारानृत्य सुरू असताना मनाला आपसूकच हुरहुर लागते. अशा वेळी गाणं आणि गाण्यांच्या आठवणी साथ देतात. मनाला सुकून देतात. या लेखात गाण्यांच्या आठवणी सांगत आहेत, इतर वेळी गणिताविषयी लिहिणारे मुकेश थळी. त्यांच्या मते, गाण्यातही गणित आहे आणि गणितातही गाणे आहे...

नादसागर मालकंस (Melodic Malkansa)

शास्त्रीय संगीतातील रागांचा परिचय करून देणाऱ्या लेखमालेत डॉ. सौमित्र कुलकर्णी ‘मालकंस’ या लोकप्रिय आणि कलाकारप्रिय रागाविषयी माहिती देत आहेत. हा राग गाण्याची वेळ मध्यरात्र ही आहे. मध्यरात्रीच्या महासागरासारखा, प्रशांत आणि धीरगंभीर असलेला हा राग माहीत नसतानाही त्यावर आधारित संगीतरचना मनाला मोहिनी घालतात. थोडासा परिचय झाला तर त्या आनंदात भरच पडेल. दिग्गज कलाकारांनी गायलेल्या या रागातल्या बंदिशींच्या यू-ट्युब लिंक सोबत दिल्या आहेत, रागाचा परिचय होण्यासाठी त्यांची मदत होईल...

अनाहत शंकरा (Raga Shankara)

अनाहत या शब्दाचा शब्दकोशातला अर्थ आहे, स्वयंभू, ज्याच्यावर कसलाही आघात झालेला नाही असा. हिंदुस्थानी शास्त्रीय संगीतातला शंकरा हा राग हा असाच एखाद्या स्वयंभू, बलदंड खडकाप्रमाणे आहे. या रागाची माहिती करून देत आहेत डॉ. सौमित्र कुलकर्णी. शास्त्रीय संगीताविषयीच्या त्यांच्या लेखमालिकेतला हा चौथा लेख...

मैफल रागसंगीताची !(Classical Music Consort)

डॉ. सौमित्र कुलकर्णी यांची शास्त्रीय संगीताविषयीची लेखमाला सुरू करण्याचा उद्देश श्रोत्यांना शास्त्रीय संगीतातल्या काही संकल्पना सांगाव्या, शास्त्रीय संगीताचा आस्वाद घ्यायला साहाय्य करता आले तर करावे हा आहे. या लेखात ते सांगत आहेत, शास्त्रीय संगीताच्या मैफिलीची मांडणी कशी असते, मैफिलीत गायल्या जाणाऱ्या रचनांचे स्वरूप कसे असते याविषयी. काही संज्ञा, शब्द; जे वारंवार शास्त्रीय संगीताच्या संदर्भात कानावरून जातात त्या संज्ञांचे, शब्दांचे अर्थही त्यांनी उलगडून सांगितले आहेत. या माहितीचा उपयोग मैफिलीचा आनंद घेताना होईल...

राग संगीत हेच भावसंगीत

सर्वसामान्य माणसांच्या मनात गणिताविषयी जशी एक भीती किंवा हवेतर अढी म्हणू तशीच शास्त्रीय संगीताविषयीही असते. हे आपल्याला समजणार नाही अशी एक समजूत असते. अनेकांना ते ऐकायला आवडते पण ‘समजत’ नाही. शास्त्रीय संगीतातले बारकावे समजले तर ते ऐकताना त्याचा आस्वाद अधिक समृद्ध करणारा असेल अशा विचाराने या क्षेत्रातल्या विविध संकल्पना, राग, त्यांचे स्वरूप याविषयी लिहित आहेत तरूण गायक डॉ. सौमित्र कुलकर्णी...

हार्मोनियम बनवण्याची चाळीस वर्षांची परंपरा

0
पांचाळ कुटुंबीयांचा पिढीजात व्यवसाय हा सुतारकामाचा. दत्ताराम पांचाळ यांनी त्यांचे भाऊ विश्वनाथ यांच्याकडून हार्मोनियम तयार करण्याचे कौशल्य संपादन केले. त्यांनी हरिभाऊ विश्वनाथ ह्या वाद्य निर्मिती कंपनीत नोकरीदरम्यान तंतुवाद्याच्या दुरुस्तीतील आठ वर्षांच्या अनुभवानंतर स्वत:चा हार्मोनियम बनवण्याचा व्यवसाय सुरू केला...

माझा संगीत सत्संग

0
संगीत हे क्षेत्र व्यापक, विस्तीर्ण आहे, ते मानवनिर्मित आहे; त्यात साक्षात्कारी क्षण/अनुभव असले तरी ते माणसांनी अनुभवलेले असतात आणि त्यांनीच ते आत्मसात करून गळ्यातून/वाद्यांमधून प्रथमतः स्वतःच्या आनंदासाठी आणि परिणामस्वरूप म्हणून श्रोत्यांशी तो आनंद वाटून घेण्यासाठी साकारलेले असतात...

विदुर महाजन – सुस्वर संगीतातील स्वत:ची वाट

विदुर महाजन हा त्याची सतार आणि त्याचे संगीत याबद्दल बोलतो तेव्हा त्याची स्वभाववैशिष्ट्येही कळत जातात. तो म्हणतो, “मी वयाच्या एकोणिसाव्या वर्षी सतार शिकण्यास सुरुवात केली होती. पण व्यवसाय, गृहस्थाश्रमातील जबाबदाऱ्या यांमुळे सतारवादन ही मनापासूनची...

विद्याधर ओक यांचे श्रुती संशोधन ! (Shruti research by Vidyadhar Oak)

विद्याधर ओक हे पदवीने औषधांचे एम डी डॉक्टर. ते ठाण्यात प्रॅक्टिस करतात. ते संगीत तज्ज्ञ म्हणूनही ओळखले जातात. ओक यांनी केलेल्या संशोधनात संगीतातील हिंदुस्थानी श्रुती या वैज्ञानिक दृष्ट्या अचूक कशा आहेत ते सिद्ध झाले आणि अनेक गैरसमजही दूर झाले...