Home व्यक्ती निलेश उजाळ यांना ओढ कविता-गीतांची

निलेश उजाळ यांना ओढ कविता-गीतांची

0

निलेश उजाळ यांनी ते चौथीत असताना काटकर वाडीच्या जाखडी नृत्यामधून गायकी सुरू केली. छोटा कलाकार गात आहे म्हणून पंचक्रोशीतील लोक त्यांचा कार्यक्रम पाहण्यासाठी गर्दी करत. गुरूंनी लिहिलेली गाणी गाणारा निलेश, पुढे स्वतः गाणी लिहू लागला. तेच निलेश उजाळ कवी, गीतकार म्हणून टीव्ही माध्यमातून प्रसिद्ध झाले आहेत…

निलेश उजाळ यांना लोककलेचा वारसा त्यांच्या आजोबांकडून मिळाला आहे. त्यांनी गायकी ते चौथीत असताना काटकर वाडीच्या जाखडी नृत्यामध्ये सुरू केली. छोटा कलाकार गात आहे म्हणून पंचक्रोशीतील लोक त्यांचा कार्यक्रम पाहण्यासाठी गर्दी करत. गुरूंनी लिहिलेली गाणी गाणारा निलेश, पुढे स्वतः गाणी लिहू लागला. तेच निलेश उजाळ महाराष्ट्रभर कवीगीतकार म्हणून टीव्ही माध्यमातून प्रसिद्ध झाले आहेत.

निलेश उजाळ यांनी अनेक सामाजिकधार्मिक गीते विषयानुरूप गरजेप्रमाणे लिहिली आहेत. त्यांनी कोकणातील अनेक शाहिरांसाठी गीतलेखन केले आहे. त्याच अवलिया कवीने स्टार प्रवाह, बिग 92.7 FM, कलर्स मराठी या वाहिन्यांसाठी गीतलेखन केले. ‘मोगरा फुलला’ या चित्रपटासाठी गाणी लिहिली.

निलेश उजाळ यांचा ‘सुसंगती सदा घडो’ हा लघुनिबंध दिल्ली बोर्डाच्या अभ्यासक्रमात सातवीच्या पुस्तकात घेण्यात आला आहे. ती पिसईकरांना आणि संबंध दापोलीकरांनाही मोठ्या अभिमानाची गोष्ट वाटते. निलेश उजाळ हे झी टेलिव्हिजनच्या झी- 5 या ॲपसाठी कॉपी, प्रोमो, कंटेंट रायटिंग करत आहेत. त्यांचा ‘जगुया पुन्हा नव्यात’ हा काव्यसंग्रह, ‘सुरंगी फुले’ हा बाल कवितासंग्रह प्रकाशित झालेला आहे. एका सर्वसामान्य शेतकरी कुटुंबातील मुलगा साहित्य क्षेत्रात त्याचे पाय रोवतोय ही गोष्ट प्रेरणादायी आहे. निलेश यांचे सरळसाधे राहणीमान पाहणाऱ्याला भावते.

प्रतिनिधी

———————————————————————————————————————————————

About Post Author

NO COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Exit mobile version