Home Authors Posts by इंदुमती जोंधळे

इंदुमती जोंधळे

1 POSTS 0 COMMENTS
इंदुमती महावीर जोंधळे या औरंगाबाद येथील सरस्वती भुवन हायस्कूल येथून मुख्याध्यापक म्हणून निवृत्त 2012 साली झाल्या. त्यांचे ‘बिनपटाची चौकट’ हे आत्मकथनपर पुस्तक गाजले. त्या पुस्तकाचा पाच भाषांत अनुवाद झाला आहे. त्यांची एकूण दहा पुस्तके प्रकाशित झाली आहेत. त्यांनी ‘लेखक तुमच्या भेटीला’ या उपक्रमात राज्यभरातील शाळा व विद्यार्थी यांच्याशी संवाद साधला आहे. त्यांना महाराष्ट्र शासनाचा उत्कृष्ट वाङ्मयनिर्मिती पुरस्कार आणि असे आणखीही पुरस्कार मिळाले आहेत. त्यांचे वास्तव्य पुणे येथे आहे.

ताराबेन मश्रुवाला – माधानच्या दीपशिखा (Taraben Mashruwala changed the face of Madhan village)

ताराबेन मश्रुवाला या नाजुक-किरकोळ प्रकृतीच्या, व्रतस्थ ब्रह्मचारी स्त्रीने त्यांचे पूर्ण आयुष्य लोककल्याणासाठी खर्ची घातले. त्यांनी विदर्भातील अमरावती जिल्ह्यात आडमार्गावर असलेल्या माधान या लहानशा खेड्याचा कायापालट केला. तेथे त्या आधी कोणत्याही प्रकारच्या सोयीसुविधा नव्हत्या. ताराबेन यांनी महात्मा गांधी यांचे ग्रामसुधारणेचे स्वप्न तेथे प्रत्यक्षात आणण्याचा प्रयत्न केला. माधान हे सातपुडा डोंगर पायथ्याशी वसलेले ओसाड असे खेडेगाव आहे. ते महाराष्ट्रात ‘आदर्श ग्राम’ रूपात आणि सामाजिक कार्याच्या रूपात नावाजले गेले...