Home Tags कवी

Tag: कवी

हायकूकार मनोहर तोडणकर

दाभोळचे कवी मनोहर रामचंद्र तोडणकर हे आयुष्याच्या शेवटपर्यंत रसिकांच्या शोधात असत. शिरीष पै यांनी ‘हायकू’ मराठीत आणला; तोडणकर शिरीष पै यांना गुरुभगिनी मानत. तोडणकर यांनी ‘हायकू’ या जपानी काव्यप्रकारावर नंतरच्या आयुष्यात बराच भर दिला. त्यांच्या नावावर ‘हायकूंची हाक’ आणि ‘समाधीचे क्षण’ हे दोन हायकूसंग्रह आहेत. त्यांपैकी ‘समाधीचे क्षण’ हा संग्रह त्यांच्या पहिल्या स्मृतिदिनी आमच्यापर्यंत आला ! तोडणकर यांच्या अंगणात हायकू जणू फुलांसारखे आपले आपण उमलत गेले...

ग.ह. पाटील यांचे कवितेचे सुंदर आकाश …

0
ग.ह. पाटील हे खेड्यातील निसर्ग- वातावरण यांचा दृढ संस्कार असलेले, सश्रद्ध, हळव्या-कोवळ्या मनाचे, जुन्या पिढीतील कवी. कवी, बालसाहित्यकार, शिक्षणतज्ज्ञ ही त्यांची ओळख. ग.ह. पाटील यांच्यापाशी मन लहान मुलांच्या निरागस वृत्तीशी, कुतूहलाशी, उत्कट-सुंदर भावविभोरतेशी नाते सांगणारे होते...

उमर खय्यामची फिर्याद

‘उमर खय्यामची फिर्याद’ हे श्रीकृष्ण केशव क्षीरसागर ऊर्फ ‘श्रीकेक्षी’ यांचे गाजलेले पुस्तक. त्या पुस्तकाचे वैशिष्ट्य म्हणजे त्यातील लेख महाराष्ट्राबाहेरील ग्रंथकार व त्यांचे ग्रंथ यासंबंधित आहेत. पुस्तकात एकूण बारा लेख असून सर्व लेख दीर्घ आहेत. ते लेख एवढे सखोल चिंतन करून लिहिले आहेत, की टीकात्मक लेखन कसे करावे याचा वस्तुपाठच ते पुस्तक वाचकांना देते…

निलेश उजाळ यांना ओढ कविता-गीतांची

निलेश उजाळ यांनी ते चौथीत असताना काटकर वाडीच्या जाखडी नृत्यामधून गायकी सुरू केली. छोटा कलाकार गात आहे म्हणून पंचक्रोशीतील लोक त्यांचा कार्यक्रम पाहण्यासाठी गर्दी करत. गुरूंनी लिहिलेली गाणी गाणारा निलेश, पुढे स्वतः गाणी लिहू लागला. तेच निलेश उजाळ कवी, गीतकार म्हणून टीव्ही माध्यमातून प्रसिद्ध झाले आहेत...

कल्याण इनामदार यांच्या बहुविध कविता (Pune Poet Kalyan Inamdar)

कल्याण इनामदार आकाशवाणी आणि दूरदर्शन यांचे मान्यताप्राप्त कवी होते. त्यांच्या कवितेतून रचना, अभिव्यक्ती, आशय-विषय यांची विविधता आणि नादमयता यांचा सुखद प्रत्यय येतो. इनामदार यांची पाऊणशे पुस्तके प्रकाशित आहेत. त्यांना ‘कवितेचा ध्यास आणि कविताच त्यांची श्वास’ बनली...

माझे जीवन गाणे (My Life Story- Principal Vishwas Patil)

माझा जन्म एका शेतकरी परिवारात झाला. माझे वडील इयत्ता चौथीपर्यंत शिकलेले. आईने तर शाळेचा उंबरठाही ओलांडलेला नव्हता. तरीही माझे बालपण एका भावसमृद्ध वातावरणात गेले. मला माझे बालपणीचे चित्र आठवते... लहानगा मी बाबांचे बोट मुठीत धरून चालत आहे. रस्त्याने त्यांना अक्षरश: दुतर्फा लोक अभिवादन करत आहेत. ते कधी माझी मूठ उंचावल्यासारखे करत, तर कधी डावा हात उंचावून, कधी भुवया उंचावून तर कधी स्मिताने अभिवादन स्वीकारत आहेत. कधी थांबून चौकशी करत आहेत. कधी काळजी व्यक्त करत आहेत. कधी मदतीचा हात पुढे करत आहेत ...

माकडं मजा बघतायत ! (Mahesh Keluskar’s poem symbolizes the present social circumstances)

0
जे न देखे रवी, ते देखे कवी. खरंच आहे ते. कधी कधी कवी जे लिहितो त्यातील दाहक वास्तवदर्शनाने डोळ्यांपुढे सूर्य, चंद्र तारे चमकू लागतात ! प्रसिद्ध कवी महेश केळुस्कर यांनी एक कविता लिहिली आहे, ‘माकडं मजा बघत आहेत !’ समाजात जे विचित्र वातावरण तयार झालं आहे त्याचं अतिशय भेदक वर्णन त्या कवितेत आहे...
_fandi

फंदी, अनंत कवनाचा सागर! (Fandi, Sea of ​​Infinite Kavana)

अनंत फंदी हे संगमनेरचे. त्यांच्या पूर्वजांचा धंदा सराफीचा, गोंधळीपणाचा; भवानीबाबा नामक साधूने फंदीला धोंडा मारला, तेव्हापासून त्याला कवित्वस्फूर्ती झाली! शाहीर होनाजीने ‘फंदी, अनंत कवनाचा...
_marathi_pandit_kavi

मराठी पंडिती (आख्यानपर कविता) (Marathi Pandit Poet)

3
मराठी काव्य मध्ययुगात पंडिती अंगाने प्रकट झाले. ते अभ्यासून कविता लिहीत. त्यात काव्याचा उत्स्फूर्त आविष्कार नसे. पंडित कवींनी रामायण, महाभारत, भागवत पुराणे, रघुवंश, कुमारसंभव,...
_baramati_moropanta

कविश्रेष्ठ मोरोपंत बारामतीचे

मोरोपंत पराडकर हे महाराष्ट्रातील प्रसिद्ध जुने कवी. त्यांचा जन्म 1729 साली पन्हाळगडावर झाला. पराडकर हे मूळचे रत्नागिरीतील राजापूर प्रांतांतील सौंदल घराणे. पराडकरांचे वास्तव्य तेथे...