Tag: व्यक्ती
शेखबाईंच्या सहवासात (In the Company of Sheikh Madam)
ज्येष्ठ आणि साक्षेपी वैयाकरणी, यास्मिन शेख यांनी 21 जून रोजी, वयाच्या शंभराव्या वर्षात पदार्पण केले. त्या तल्लख आणि कार्यमग्न आहेत. व्याकरण आणि भाषाशास्त्र हे त्यांच्या आयुष्यभराच्या ध्यासाचे विषय आहेत. त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचे महत्त्वाचे पैलू म्हणजे परिपूर्णत्वाचा ध्यास आणि स्पष्टवक्तेपणा. त्यांनी सर्वसामान्य वाचक, अभ्यासक, संशोधक, पत्रकार यांच्या सोयीसाठी ‘मराठी शब्दलेखन कोश’ तयार केला. राज्य मराठी विकास संस्थेसाठी ‘मराठी लेखन मार्गदर्शिका’ तयार केली. त्यांनी वृत्तपत्रांमधून भाषाविषयक लेखन केले. शेखबाईंच्या हाताखाली काम करणाऱ्या शिरीन कुलकर्णी यांनी बाईंकडून लाभलेल्या ज्ञानकणांविषयी कृतज्ञतेने आणि जिव्हाळ्याने लिहिले आहे...
आनंद दिनकर कर्वे – समुचित संशोधनाची कास ! (Appropriate Technology Man – Anand Karve)
आनंद दिनकर कर्वे हे भारतीय बहुआयामी संशोधक आहेत. त्यांनी आयुष्यभर समुचित तंत्रज्ञान म्हणजे ‘ॲप्रोप्रिएट टेक्नॉलॉजी’ या विषयावर काम केले. ते पुण्यातील ‘अॅप्रोप्रिएट रूरल टेक्नॉलॉजी इन्स्टिट्यूट’ (आरती) या संस्थेचे प्रवर्तक. त्या संस्थेला ब्रिटनमधून ‘ग्रीन ऑस्कर’ समजला जाणारा ‘अॅश्डेन पुरस्कार’ 2002 आणि 2006 साली, असा दोन वेळा मिळाला आहे. तो पुरस्कार चिरंतन ऊर्जा निर्मितीसाठी प्रयत्न करणाऱ्या जगातील नावीन्यपूर्ण व लोकोपयोगी प्रकल्पांना दिला जातो...
वज्रलेखा सुनिता (Sunita a woman of fortitude!)
मैत्रबन हे आमचे शेतघर. त्याला आम्ही ‘फार्महाऊस’ म्हणत नाही. ती वास्तू म्हणजे पाठीमागे गर्द झाडीचा डोंगर, शेजारी जंगल, पुढे धरण अशा वेगळ्या धाटणीची आणि व्यक्तिमत्त्वाची आहे. ‘मित्रांनी मित्रांसाठी’ असे त्या वास्तूचे बोधवाक्य आहे. या आमच्या घरी सुनिता मदतीला आली आणि आमच्या कुटुंबाचा एक अविभाज्य घटक झाली ! आई नसलेली, लवकर लग्न झालेली, अकाली नवरा गेला अशी अनेक संकटे सोसलेली सुनिता...
महाराष्ट्र भूषण धर्माधिकारी पितापुत्र
प्रसिद्ध निरूपणकार आप्पा धर्माधिकारी यांना ‘महाराष्ट्र भूषण’ पुरस्कार जाहीर झाला. देशपातळीवर जसा ‘भारतरत्न’ हा सर्वोच्च नागरी पुरस्कार आहे तसाच राज्य पातळीवर महाराष्ट्र भूषण हा पुरस्कार आहे. धर्माधिकारी कुटुंबीयांचे प्रेरक आणि समाजोपयोगी कार्य लक्षात घेऊन महाराष्ट्र सरकारने त्याच कुटुंबासाठी पित्यापाठी पुत्राला असा हा दुसऱ्यांदा पुरस्कार दिला आहे...
इंजिनीयर विजय गोळे – ‘केल्याने प्रवास-पर्यटन मनुजा चातुर्य येतसे फार’
इंजिनीयर विजय गोळे नोकरीउद्योगाच्या निमित्ताने देशभर फिरले, पण अखेरीस स्वगावी, दापोलीला येऊन स्थिरावले. त्यांना परदेशी जायचेच नव्हते, त्यामुळे तो मुद्दा त्यांच्या जीवनात पुढे आला नाही. त्यांचे मूळ गाव हर्णे, दापोलीपासून पंधरा किलोमीटरवर. तेथे त्यांचे दोनशे वर्षांपूर्वीचे जुने घर आहे...
चंदा निंबकर यांचे मेंढीचे नवे वाण
चंदा निंबकर यांनी ‘निंबकर कृषी संशोधन संस्थे’च्या पशू संवर्धन विभागात कामाला 1990 पासून सुरुवात केली. त्यांना मेंढीच्या जातीचा शोध घेत असताना पश्चिम बंगालमधील सुंदरबन भागातील मेंढीची जात ‘गरोळ’ ही सापडली. त्यांनी गरोळ मेंढ्यांचा कळप फलटण येथे आणून त्यांची पैदास व संवर्धन केले. त्यांनी 1998 पासून वीस वर्षे सातत्याने संशोधन करून जुळी कोकरे देणाऱ्या ‘नारी सुवर्णा’ या मेंढीच्या नव्या वाणाची निर्मिती केली आहे...
चाकोरीबाहेरचा पैदासशास्त्रातील मार्ग – चंदा निंबकर
चंदा निंबकर यांनी त्यांची कारकीर्द कशी घडली तो अनुभव लेखाद्वारे मांडला आहे. त्या म्हणतात, माझा विज्ञानातील प्रवेश हा तथाकथित मागच्या दाराने झाला असताना मी ‘लीलावतीची मुलगी’ कशी काय झाले? त्यांनी 1976 मध्ये विज्ञान नव्हे तर वाणिज्य शाखेत प्रवेश घेतला होता. आता मात्र त्या अनुवंश शास्त्राची तत्त्वे ह्या विज्ञानक्षेत्रात आकंठ बुडाल्या आहेत. त्या शास्त्राचा वापर करून तळागाळातील शेळ्या-मेंढ्या पाळणाऱ्यांचे उत्पन्न व जीवनमान सुधारणे हे त्यांच्या आयुष्याचे ध्येय आहे !
देगावच्या विवेकवादी समाजसेविका: स्मिता जोशी
स्मिता जोशी या सर्वसामान्य शिक्षिकेने तळागाळातील वंचित आदिवासी समाजासाठी अठ्ठावीस वर्षे सातत्याने काम केले, ही त्यांची ओळख. त्यांनी 15 ऑगस्ट 1981 रोजी कर्जतजवळील कोंदिवडे या गावी ‘बांधिलकी’ ही सेवाभावी संस्था स्थापन केली. त्यांनी ‘बांधिलकी’चे काम स्त्रीला शिक्षित करणे, तिचे वैचारिक प्रबोधन करणे व तिला आर्थिक दृष्ट्या सक्षम करणे या त्रिसूत्रीवर उभे केले, स्थिर केले व फुलवले...
आसोंडमाळावरील उद्योजक – ज्योती रेडीज (Jyoti Redis-Lady with industry in moorlands of Dapoli)
ज्योती रेडीज या सर्वसामान्य स्त्रीने आसोंडमाळावर बागायती व इतर उद्योगव्यवसाय यांचे नंदनवन उभे केले, त्याची ही कहाणी. आसोंड हे गाव दापोली तालुक्यातील दाभीळ या गावापासून अठरा किलोमीटर दूर आहे...
प्रशासनातील पुरुषोत्तम – पुरुषोत्तम भापकर
पुरुषोत्तम भापकर यांची ख्याती प्रशासनात कर्तव्यकठोर व सर्वसामान्यांच्या कामांसाठी तत्पर अधिकारी अशी आहे. ते विशेषत: तळागाळातील लोकांबद्दल अधिक दक्ष असतात. ते पदाचा बडेजाव मिरवत नाहीत, कामे मार्गी लावतात, स्वाभाविकच आहे ते, कारण ते हळव्या मनाचे संवेदनशील व प्रतिभावंत कवीदेखील आहेत. ती त्यांची ओळख निवडकांनाच माहीत आहे. त्यांचा बाणा शासकीय योजना या सर्वसामान्य जनतेच्या हितासाठी राबवाव्या हा आहे...