Tag: दापोली
मुरुडचे दुर्गादेवीचे विलोभनीय मंदिर (Murud: Beautiful Temple of Goddess Durga)
दुर्गेच्या संरक्षक रूपाची उपासना सर्वत्र केली जाते. मुरुडच्या दुर्गादेवीच्या देवळाची कथा तशीच आहे. मुरुड गाव गंगाधर भट नामक सिद्धपुरुषाने कोकणातील दापोली तालुक्यात वसवले. तशी बखर आहे. गंगाधर भट समुद्रकाठाकाठाने सोळाव्या शतकात सौराष्ट्रातून आले होते. मुरुडमध्ये वसाहत करताना दोन्ही बाजूंना घरे आणि मधोमध रस्ता अशी रचना झाली. मंदिरे स्थापन झाली. तरी एक भय राहिले. कोकण किनारपट्टीमधील गावांवर सागरी चाच्यांच्या आक्रमणाचे सावट असे. गावे लुटली जात. म्हणून रक्षणकर्त्या दैवताचे सान्निध्य गावकऱ्यांना धैर्य देईल या कल्पनेने दुर्गा देवीचे मंदिर गावात मध्यवर्ती ठिकाणी स्थापन केले...
मुरुडचा भूलभुलैया चौक (Murud’s 400 year old Magic Square)
गावात, शहरात चौक असतात. पण एखाद्या गावात चौकटीत किंवा चौकाच्या व्याख्येत न बसणारा असा; तरीही तो चौकच असतो, हे वाचून अचंबा वाटेल. असा चौक आहे दापोली तालुक्यात मुरुड या गावी. मुरुड हे टिंबाएवढे गाव. नकाशात त्याचे अस्तित्व ते काय दिसून येणार ! परंतु त्या गावाची ख्याती ऐतिहासिक, सांस्कृतिक आणि नैसर्गिक वेगळेपणामुळे सर्वदूर पोचली आहे. गावाची रचना विचारपूर्वक करण्यात आली असल्याचे जाणवते. दोन्ही बाजूंना घरे आणि मधोमध रस्ता. सुमारे चारशे वर्षांपूर्वीची ही रचना स्वत:चे रूप अजूनही टिकवून आहे...
बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ, दापोली (Balasaheb Sawant Krushi Vidyapeet, Dapoli)
दापोलीचे ‘बाळासाहेब सावंत कृषी विद्यापीठ’, ही देशातील कृषी संशोधन करणाऱ्या संस्थांमध्ये एक अग्रगण्य संस्था आहे. ह्या विद्यापीठाने विकसित केलेले कृषी तंत्रज्ञान, कोकणातली पिके, फळे,...
दापोलीच्या रेखा बागूल – कर्णबधिरांना आसरा ! (Rekha Bagul works mainly for deaf children...
रेखा बागूल या कर्णबधिर मुलांच्या प्रशिक्षणाकडे अपघाताने वळल्या, पण हळूहळू त्यांच्या कामाचे महत्त्व इतके वाढत गेले, की त्यांचे काम फक्त कर्णबधिरांपर्यंत मर्यादित न राहता गतिमंद आणि त्याही पुढे जाऊन बहुविकलांग मुलांपर्यंत पोचले आहे. त्या सुरुवातीला डोंबिवलीत आणि, आता दापोलीत ‘गतिमंद आणि बहुविकलांग मुलांचे शिक्षण आणि पुनर्वसन केंद्र’ ही निवासी शाळा चालवत आहेत. ‘आनंद फाउंडेशन ही त्यांची मूळ संस्था आहे. त्यांचे काम अन्य संस्था व व्यक्ती यांच्या सहकार्याने वृद्ध निवासापर्यंत पोचले आहे...
दाभोळचे बिनखुर्चीचे डॉक्टर मधुकर लुकतुके (Dabhol’s Doctor Madhukar Luktuke)
डॉ. मधुकर लुकतुके यांचा दाभोळचा दवाखाना गेल्या सहा दशकांपासून चालू आहे. दाभोळ पंचक्रोशीतील रहिवासी वैद्यकीय उपचार आणि सल्ला यांसाठी त्यांच्याकडे एखाद्या पर्यटन स्थळाप्रमाणे सहकुटुंब गर्दी करतात. वैद्यकीय पर्यटन ही संकल्पना बहुदा तेथे जन्माला आली असावी ! डॉक्टर हे माझे आजोबा. आम्ही त्यांना ‘जोजो’ म्हणतो. जोजोंनी मेडिकल ऑफिसर म्हणून ‘पोस्टिंग’ मुद्दाम लहानशा खेड्यात मागून घेतले. असे ते 1960 साली दाभोळला पोचले आणि तेथीलच झाले...
आगोम : निरामय सूक्ष्म औषधांचा वसा (Story of ‘Agom’ medicines)
ही गोष्ट आहे 1994 सालची. ‘गुटिका केशरंजना’ची धून आकाशवाणीवरून सकाळी सहा वाजता महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात गुंजू लागली आणि ‘आगोम’ हे नाव महाराष्ट्राच्या घराघरात पोचले ! ‘आगोम’चे गूढ त्याच्या नावापासून सुरू होते, पण लोक आकृष्ट झाले ते त्या गुटिकेमुळे, ‘डोक्याचे केस शाबूत राहतात’ या प्रभावाने. ‘आगोम’ हे औषधालय रत्नागिरी जिल्ह्यात समुद्रकिनारी एका छोट्याशा खेड्यात वसले आहे. दापोली तालुक्यातील कोळथरे हे ते गाव. ते सध्या कासव महोत्सवामुळेही गाजत आहे...
दापोलीचे केशवराज मंदिर (Dapoli’s unique Keshavraj Temple)
केशवराज मंदिर हे दापोलीचे मोठे आकर्षण आहे. त्याला धार्मिक व भाविक असे महात्म्य लाभले आहेच; त्याबरोबर, पर्यटनाच्या दृष्टीनेही ते ठिकाण विलोभनीय वाटते. मंदिरातील विष्णुमूर्ती सुंदर आहे. त्या विष्णुमूर्तीच्या हाती शंख, चक्र, गदा, पद्म या आयुधांच्या धारण करण्याच्या क्रमावरुन चोवीस प्रकार पुराणात (अग्नी, पद्म, स्कंद) सांगितलेले आहेत...
दापोलीचे लोकनेते : बाबुराव बेलोसे (Baburao Belose – The man who shaped Dapoli’s tourism...
कोकणच्या सर्वांगीण प्रगतीचा पाया ज्यांनी रचला, अशा महनीय व्यक्तींमध्ये रामचंद्र विठ्ठल तथा बाबुराव बेलोसे यांचे नाव अग्रक्रमाने घेतले जाते. ते लोकनेते म्हणूनच गणले जातात- लोकांमध्ये मिसळून गेलेला असा पुढारी विरळाच. कोकणच्या समस्या बाबुरावांनी धाडसाने व तडफदारपणे विधानसभेत मांडल्या – त्यांचा पाठपुरावा केला. म्हणून त्यांना त्यांचे सहकारी ‘कोकणची सिंहगर्जना’, ‘कोकणची धडाडणारी तोफ’ असे म्हणत असत...
त्यागमूर्ती – रमाई आंबेडकर
रमाई आंबेडकर या बाबासाहेबांच्या पत्नी. त्यांचा जन्म दापोली तालुक्यात वणंदगाव (जिल्हा रत्नागिरी) येथे 7 फेब्रुवारी 1898 ला झाला. रमाई यांची साथ होती म्हणून बाबासाहेबांनी आयुष्याची लढाई जिंकली अशीच सर्वसाधारण भावना आहे. रमाई या त्याग, कष्ट, सहनशीलता या गुणांच्या प्रतीक झाल्या. त्यांनी त्यांच्या फक्त सदतीस वर्षांच्या आयुष्यात दु:ख आणि फक्त दु:ख सहन केले. रमाई ही तशी अनाथ पोर. रमाई यांचे भीमरावांसोबत लग्न झाले तेव्हा त्यांचे वय होते नऊ वर्षे. बालिकाच ती...
मंडलीक ट्रस्ट – पंचायत राज प्रबोधनाचे कार्य (Mandalik Trust For Decentralised Democracy)
डॉ. पी.व्ही. मंडलीक ट्रस्टची स्थापना 31 मार्च 1971 रोजी झाली. ट्रस्टचा सुवर्ण महोत्सवदेखील होऊन गेला. मात्र कोरोनामुळे त्या दोन वर्षांत ट्रस्टच्या प्रत्यक्ष क्षेत्रीय कामास अनेक मर्यादा आल्या. परंतु ट्रस्टने गेल्या पाच दशकांत समाजजागृतीचे विशेषत: पंचायत राज संकल्पना जनमानसात मुरवण्याचे खूप मोठे कार्य केले आहे. पी.व्ही. मंडलीक यांनी स्वत:च तो ट्रस्ट सामाजिक ऋणाच्या जाणिवेतून निर्माण केला...