जुळे हनुमान, हिंदू-मुस्लिमांना प्रिय !

0
271

जुळे हनुमान मंदिर अमरावती जिल्ह्याच्या अचलपूर तालुक्यात येते. मंदिरातील जुळ्या हनुमान मूर्ती हिंदू व मुस्लिमदोन्ही संस्कृतींत श्रद्धेने पूजल्या जातात ! आश्चर्याची गोष्ट म्हणजे या भागातील मुस्लिम बंधू हनुमान’ ही त्यांच्या जातीतील देवता आहे असे म्हणतात. त्यामुळे जुळे हनुमान मंदिर मुस्लिम बांधवांनाही हिंदूंएवढेच वंदनीय आहे…

जुळे हनुमान मंदिर नागरवाडी व तोंडगाव यांच्या मध्य भागातील परतवाडा ते कविठा बुद्रुक मार्गावर स्थित आहे. ते ठिकाण अमरावती जिल्ह्याच्या अचलपूर तालुक्यात येते. मंदिरातील जुळे हनुमान मूर्ती हिंदू व मुस्लिमदोन्ही संस्कृतींत श्रद्धेने पूजल्या जातात ! हनुमान ही देवता हिंदूंना रामायण ते महाभारत या काळातील पूजनीयवंदनीय आहे; श्री हनुमान हे शक्तीचे व बुद्धीचे प्रतीकही मानले जाते. त्यामुळे हनुमान हे हिंदू देव-देवतांच्या यादीत अग्रक्रमावर आहेत. आश्चर्याची गोष्ट म्हणजे नागरवाडी-तोंडगाव भागातील मुस्लिम बंधू हनुमान ही त्यांच्या जातीतील देवता आहे असे म्हणतात. तशीच नावे त्यांच्या जातीत असतात असे ते म्हणतात. सुलेमानरहमान, अरमान, सलमान तसे हनुमान त्यामुळे जुळे हनुमान मंदिर मुस्लिम बांधवांनाही हिंदूंएवढेच वंदनीय आहे. तेथे शियापंथी मुस्लिमांची वस्ती आहे. त्यांचा उदरनिर्वाह हा त्यांच्याकडे शेती असल्यामुळे त्यावर होतो.

नागरवाडीच्या आसपासच्या जंगलात नाग-सर्प यांचे वास्तव्य आहे. परंतु तेथील वैशिष्ट्य असेकी तेथे कधीही कोणीही सर्पदंशाने दगावलेला नाही. हनुमान देवतेच्या जुळ्या दोन मूर्तींत एक लहान व एक मोठी आहे. त्या मूर्ती तेथे गत चारशे-पाचशे वर्षांपासून उघड्यावरच आहेत. त्या हनुमान मूर्तींविषयी वदंता स्थानिकांमध्ये प्रचलित आहेती अशी – परतवाडा येथील साबू हे किराणा वस्तूंचे व्यापारी एक दिवस कविठा मार्गावरून परतवाड्यात येत असताना, मला टेका दे’ असे शब्द त्यांच्या कानी पडले. त्यांनी सभोवताली पाहिल्यावर, त्यांना टेका नसलेली हनुमान मूर्ती दिसली. त्यांना आश्चर्य वाटले ! त्यांनी त्या मूर्तीस ताबडतोब टेकवून ठेवले.

नागरवाडीतील लोक सांगतात, की परतवाड्यातील अनेकांनी मूर्तीसाठी भव्य मंदिराचे रूप देण्याचा प्रयत्न केला. पण ज्या दिवशी ते त्यासाठी सुरुवात करणार त्याच्या आदल्या रात्री ‘हे मंदिर बांधू नका’ म्हणून त्यांना संकेत मिळतात ! जय नारायण राधाकिसन वर्मा हे तेथेच राहत. ते आता मुंबई निवासी आहेत. त्यांनी उघड्यावर असलेल्या त्या मूर्ती पाहिल्या. त्यांनी हनुमानाचा अभिषेक करणारे पुजारी व भाविक उन्हात उभे असलेले पाहिले. त्यांनी तेथील जोशी-पुजाऱ्यांचा विरोध पत्करून स्वतः पहिले अकराशे रुपये देऊन एक मोठे मंदिर बांधण्याचा संकल्प सोडला. त्यातून तेथे मोठे मंदिर झाले आहे. ते जवळपासच्या पंचक्रोशीत प्रसिद्धीस पावले आहे. भाविक मंदिरात नवस फेडण्यासाठी येतात. हिंदू आणि मुस्लिम या दोन्ही धर्माचे लोक या जुळ्या हनुमानाचा त्यांच्याच जातिधर्माचा म्हणून भक्तिभावाने पूजन करतात.

जय हनुमान ज्ञान गुन सागर | जय कपीस तिहु लोक उजागर |
रामदूत अतुलित बल धामा | अंजनी पुत्र पवनसुत नामा  ||

– धनंजय भारती 8999196039

—————————————————————————————————————————————-

About Post Author

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here