धाराशिवजवळ दहा-पंधरा किलोमीटर अंतरावर गड देवधरी नावाचे लहानसे खेडे आहे. डोंगराच्या खाली, अगदी दरीत असावे असे. त्या ठिकाणी नव्याने निर्माण झालेला दर्गा होता. आधी तेथे काही नव्हते, पण एका हुशार माणसाने त्याची वार्षिक जत्रा सुरू केली. त्याला गावच्या जत्रेचे स्वरूप मिळाले. म्हणायला तो देव कुणाचा तर मुस्लिमांचा आणि कंदुरी कोणाची तर वरिष्ठ हिंदूंची ! भारतीय समाज असा संमिश्र कौतुकाचा, भाविकतेने भारलेला आहे ! दर्ग्याला नवस बोलून कंदुरी करणारी हजारो कुटुंबे आहेत. त्यांच्या मनात, डोक्यात कोणताही धर्म नसतो. मजा अशी की देव, धर्म, इच्छा, नवस, बकरे, श्रद्धा यांचे अफलातून संयुग तयार झाले आहे...
राज्याच्या सोळा जिल्ह्यांत बावन्न तालुके ऊसतोड व्यवसायात आहेत. ऊसशेती गेल्या सत्तर वर्षांत महाराष्ट्रात बहरली, त्यासोबत साखर कारखाने निघाले. शेतांतील ऊस तोडून त्या कारखान्यांना पुरवणारा ऊसतोड कामगार म्हणजे स्थलांतरित मजुरांचा एक मोठा समुदाय. मात्र तो समुदाय म्हणजे असे मजूर की जे जी जागा मिळेल, जसे खाणेपिणे असेल, जशी परिस्थिती असेल तशा परिस्थितीत राहतात. त्यांचा स्वत:चा पसारा असा काहीच नसतो, पण जो आहे त्यावर त्यांना ऊसतोडणीच्या हंगामाचे पाच-सहा महिने काढायचे असतात. त्यांच्या अडचणी मात्र सुटताना दिसत नाहीत...
अशोक ढवण हे सर्वसामान्य शेतकऱ्याच्या कुटुंबातून विद्यापीठाचे कुलुगुरू झाले. त्यामुळे त्यांनी शैक्षणिक व शेती क्षेत्रांत संशोधनापासून उपयोजनापर्यंतची अनेकविध कामगिरी करत असताना माणसामाणसातील जिव्हाळा जपला, साहित्याचे प्रेम राखले आणि सभोवतालच्या समाजजीवनाचा एकूण स्तर उंचावला...
मराठवाड्यातील दिवाळी खास आहे ती काही परंपरांमुळे. रेड्यांच्या टकरी, शेणापासून बनवलेले गोकुळ, म्हशींची मिरवणूक, गाई-म्हशींना ओवाळणे हे सारे कृषिसंस्कृतीतून, लोकसंस्कृतीतून झिरपलेले टिकून आहे...
बचित्तर सिंह हे देशातील पहिले अशोकचक्र विजेते सैनिक. निजामाच्या जोखडातून मराठवाडा मुक्त करण्यासाठी कामी आलेल्या शीख रेजिमेंटच्या हवालदार बचित्तर सिंह यांना अशोकचक्र देऊन सन्मानित करण्यात आले.
तेरगावातील त्रिविक्रम मंदिराची वास्तू विटांनी बांधलेली आहे. ती गावाच्या मध्यभागी आहे. ती वास्तू म्हणजे बौद्धधर्मीयांचा चैत्य असावा असे एक मत आहे. विटांनी बांधलेल्या चैत्याच्या ज्या दोन वास्तू ज्ञात आहेत त्यांपैकी एक तेरची मानली जाते...
उस्मानाबाद जिल्ह्याची ओळख दोन नावांत सामावलेली आहे. एक म्हणजे महाराष्ट्राची कुलस्वामिनी जगदंबा तुळजाभवानी आणि दुसरे नाव म्हणजे तेर गावचे ‘वैराग्यमहामेरु संत गोरोबाकाका'. गोरोबांच्या अभंगाशिवाय संतवाङ्मय पूर्ण होत नाही...
शंकराची मंदिरे ही गावातील वस्तीपासून लांब, वर्दळीपासून दूर, निवांत अशी निसर्गरम्य ठिकाणी असतात. ती दऱ्याखोऱ्यांत, डोंगरमाथ्यांवर, पर्वतांच्या पायथ्यांशी, नद्यांच्या उगमांजवळ, नद्यांच्या संगमांजवळ, समुद्रांनजिक, घनदाट अरण्यांत दिसून येतात. जुन्या शिवमंदिरांत हमखास आढळणारी नक्षी म्हणजे ‘चौकटची नक्षी’ होय.
कोरोना व्हायरसमुळे लोकांची घरवापसी/स्थलांतर मोठ्या प्रमाणावार होत आहे. तो फार मोठा प्रश्न होणार आहे. मी त्या प्रश्नाकडे एक संधी म्हणून पाहत आहे. त्यामुळे स्थलांतरित होणाऱ्यांच्या आयुष्याला कलाटणी मिळण्याची शक्यता आहे. वास्तवात इट्स रिस्टोरेशन इन रिअॅलिटी. मला मराठवाड्याच्या परभणी, उस्मानाबाद, लातूर आणि बीड जिल्ह्यांची माहिती आहे.
साहित्य संमेलनाच्या संयोजनाचा सुवर्णमध्य गाठण्याची जरूरी आहे असा निष्कर्ष चर्चेअखेरीस निघाला. चर्चा उस्मानाबादमधील संमेलनानिमित्ताने ‘थिंक महाराष्ट्र डॉट कॉम’ व ‘ग्रंथाली’ यांनी योजली होती. मुंबई मराठी साहित्य संघाच्या कार्याध्यक्ष, लेखक उषा तांबे आणि कवी-लेखक-पत्रकार विजय चोरमारे हे चर्चेच्या केंद्रस्थानी होते.