हिंगोली येथील मीरा कदम या शिक्षिका स्वत: पायांनी अधू आहेत. त्यांचे दोन्ही पाय पोलिओमुळे निकामी झाले. त्यांना चालताना कशाना कशाचा आधार घ्यावा लागतो; पण त्यांची वृत्ती मात्र आधार देण्याची आहे ! त्यांनी मुख्यत: आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या मुलांना पोरकेपणाची जाणीव होऊ नये म्हणून ‘सेवासदन’ वसतिगृह चालवले आहे. त्यांच्या या प्रयत्नांची सुरुवात एकोणीस वर्षांपूर्वी झाली. मीरा कदम यांचे वडील वारले, तेव्हा त्यांना वडिलांचे छत्र हरपल्याने निर्माण होणारी पोकळी जाणवली. त्यांनी पाच मुले शिक्षणासाठी दत्तक घेतली. त्यांच्या कार्याला लोकांचा पाठिंबा मिळाला, तेव्हा त्यांनी चाळीसपर्यंत मुलांना शिक्षणासाठी आर्थिक मदत देणे सुरू केले. मीरा यांनी आत्महत्या करू नका असा संदेश देण्याचे ठरवले. गावोगावी जाऊन मंदिरातील ध्वनिवर्धकावरून त्या ‘आत्महत्या करणाऱ्यांच्या घरातील इतरांची कशी परवड होते, तेव्हा आत्महत्या करू नका’ हे हृदयद्रावक वर्णन करून सांगू लागल्या...
एकोणिसावे शतक संपत आले होते. हैदराबाद राज्यातील हिंदू जनतेचे आत्मतेज जागृत करून विविध क्षेत्रात त्यांना कार्य प्रवृत्त करण्याचे महत्त्वाचे काम करणाऱ्या पहिल्या फळीतील एक नेते होते न्यायमूर्ती केशवराव कोरटकर. त्यांच्या सहकार्याने येथे मराठी शाळा सुरू झाली. 'निजाम विजय'सारखे वर्तमानपत्र निघाले. मराठी ग्रंथ संग्रहालयाची स्थापना झाली. त्यांनी विधवा पद्धतीला विरोध करत स्त्री शिक्षणाचा आग्रह धरला. हिंदू समाजाला स्वातंत्र्याचे स्वतःचे भान देणाऱ्या केशवराव कोरटकर यांचा परिचय मात्र हैदराबादमधील मराठी लोकांनाही नाही आणि महाराष्ट्रासाठी तर त्यांचे कार्य अपरिचितच आहे...
साधारणपणे स्मशानभूमी म्हटले की सर्वांच्या डोळ्यांसमोर येते ते चित्र म्हणजे मृतदेहावर अंत्यसंस्कार करण्यासाठी उभारलेले पत्र्याचे शेड आणि त्याच्या आजूबाजूला वाढलेली झाडेझुडपे ! पण मृतदेहावर अंत्यसंस्कार स्वच्छ, सुंदर परिसरात करणारी एक वेगळी स्मशानभूमी परभणी जिल्ह्यातील झरी या गावी आहे. झरीतील त्या स्मशानभूमीला आयएसओ (ISO) मानांकन प्राप्त झाले आहे...
‘दण्डार’ हा नृत्यप्रकार प्राचीन काळापासून चालत आलेला आंध जमातीचा नृत्यप्रकार आहे. निसर्गातील मानवाला जीवन देणाऱ्या महाभूतांविषयीची श्रद्धा हा दंडारणातील विविध कलाविष्कारांचा विषय असतो. आंधांची जीवनपद्धतच त्यांच्या नृत्यातून व्यक्त होते म्हणून त्याला लोकधर्मी संबोधले जाते...
देविदास गुंजकर या शिक्षकांकडे सहा हजार शिक्षकांनी जाऊन त्यांच्याकडून प्रशिक्षण घेतले आहे ! ते कसले? तर पहिलीचे विद्यार्थी दहावीच्या पुस्तकातील शब्द कसे लिहू शकतात ते रहस्य त्यांनी सांगावे याबाबतचे. शिक्षक चांगली शाळा बघण्यासाठी गावोगावी जात असतात, पण सहा हजार शिक्षक दिवसभर थांबून दुसऱ्या शिक्षकाकडून अध्यापन तंत्र जाणून घेत आहेत हे प्रथमच घडत आहे...
शिक्षक विद्यार्थ्यांच्या दारी (ऑनलाईन व ऑफलाईन शिक्षण प्रक्रिया) नावाच्या उपक्रमाची सुरुवात गुंजकर सरांनी लॉकडाऊनच्या आधीपासून केली होती. तो उपक्रम राबवला जातो रविवार व इतर सुट्टीच्या दिवशी...
‘उगम’ ग्रामीण विकास संस्था ही उमरा (तालुका कळमनुरी, जिल्हा हिंगोली) येथील आहे. ती संस्था शाश्वत ग्रामीण विकासासाठी कार्यरत आहे. ग्रामीण व दुर्गम भागातील कुटुंबांना...
हिंगोली जिल्हा-तालुक्यातील कयाधू नदीला पुनरुज्जीवित करण्यासाठी ‘उगम ग्रामीण विकास संस्था’ व तिचे संस्थापक जयाजी पाईकराव यांनी जोरदार प्रयत्न चालवले आहेत. हिंगोली जिल्ह्यात पैनगंगा, पूर्णा...
हिंगोली हा महाराष्ट्राच्या मराठवाड्यातील जिल्हा आहे. परभणी ह्या जिल्ह्यातून विभागून १ मे १९९९ रोजी हिंगोली हा स्वतंत्र जिल्हा तयार झाला आहे. हिंगोली हा त्यापूर्वी...
हिंगोली जिल्ह्यातील कयाधू नदीच्या काठावरील तीनशेसतरा हेक्टर जमीन कुरणक्षेत्र म्हणून संरक्षित केली गेली आहे. ते जवळ जवळ बारा गावे व त्यांतील लोक यांच्या प्रयत्नातून...