Home Tags Sangli

Tag: Sangli

क्रांतिसिंह नाना पाटील यांचे प्रतिसरकार ! (Revolutionary Nana Patil’s parallel government)

0
साताऱ्याचे नाना पाटील यांचे नाव ‘प्रति सरकार’ वा ‘पत्री सरकार’ या नावाशी जोडले जाते. म्हणून तर त्यांना क्रांतिसिंह म्हणतात. ते स्वातंत्र्य चळवळीतील थोर नेते होत. त्यांनी भूमिगत राहून ‘प्रतिसरकार’ उभारले. त्यांनी केवळ राजकीय स्वातंत्र्यासाठी नव्हे, तर सामाजिक समता, न्याय यांसाठी आणि आर्थिक शोषणांविरुद्ध लढा दिला. त्यांना जनतेने घडवले आणि उलट, त्यांनी जनतेला संघटित करून इतिहास घडवला ! महात्मा फुले, शाहू महाराज आणि बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारधारेतील त्यांच्या पुढील काळातील एक महत्त्वाची कडी म्हणून त्यांचा उल्लेख केला जातो. ते महाराष्ट्राच्या सामाजिक, राजकीय आणि सांस्कृतिक जीवनावर 1928 ते 1976 या काळात प्रभाव टाकणारे महत्त्वाचे व्यक्तिमत्त्व होते...

सांगली कला/वस्तू संग्रहालयात उत्तम चित्रकृती (Sangli Art Museum)

महाराष्ट्रात तेरा शासकीय कला/वस्तू संग्रहालये आहेत. ती शासनाच्या पुरातत्त्व व वस्तू संग्रहालये विभागाच्या अधिपत्याखाली येतात. त्यामध्ये एकट्या कोल्हापुरात दोन संग्रहालये आहेत. बाकी गावे अशी - नागपूर, औरंगाबाद, सिंदखेडराजा, तेर, पैठण, नाशिक, माहूरगड, सातारा, औंध, सांगली, रत्नागिरी. त्याशिवाय खासगी संग्रहालये व संग्राहक यांची संख्या ही वेगळीच आहे. वस्तू संग्रहालयांतील कलावस्तू या महाराष्ट्राच्या गौरवशाली इतिहासाचा, सांस्कृतिक बहुविधतेचा आणि कलासंपन्न जीवनशैलीचा वारसा सांगत असतात. त्यामुळे संग्रहालये जपली जाणे- त्यांचे संवर्धन होणे हे महत्त्वाचे होय. त्यासाठी त्यांना लोकाश्रय मिळाला पाहिजे...

माणदेश : दंडकारण्यातील प्राचीन भूमी (Maharashtra’s land with ancient history)

मध्य भारतातील विस्तृत पठार हा भारताच्या पाच प्राकृतिक विभागांपैकी सर्वात प्राचीन भूभाग आहे. त्या भारतीय पठारात शंभू महादेव ही डोंगररांग आहे. दंडकारण्य हा भूभाग त्या डोंगररांगेमध्ये आहे. ‘माणदेश’ ही मेंढपाळ धनगर जमातीची भूमी त्यातच येते. ती भूमी पुण्य आहे असे ते मानतात. माणदेशाचे एकूण क्षेत्रफळ अठ्ठेचाळीस हजार सातशे चौरस किलोमीटर आहे. माणदेश हा पश्चिम महाराष्ट्रातील सातारा, सांगली आणि सोलापूर या तीन जिल्ह्यांच्या सरहद्दीवर पसरलेला आहे. तो सातत्याने दुष्काळग्रस्त आहे. माण आणि आटपाडी (संपूर्ण तालुके), सांगोला (एक्याऐंशी गावे), मंगळवेढा (बावीस गावे), जत (एकतीस गावे), कवठेमहांकाळ (तेरा गावे) आणि पंढरपूर (बारा गावे) या तालुक्यांचा समावेश माणदेशात होतो...

गेल ऑम्वेट – सहावार साडी, सँडो ब्लाऊझ ! (Gail Omvedt – An American activist...

गेल ऑम्वेट यांच्या निधनाची बातमी (25 जून 2021) आम्हाला वर्तमानपत्र वाचून समजली. लगेच मला आमच्या गावाची आठवण झाली. आमचे गाव म्हणजे यवतमाळ जिल्ह्यातील बोरी अरब. गोष्ट 1975-1976 ची...
carasole

मतिमंद मुलांना ‘नवजीवन’ (शाळा)

‘नवजीवन शाळा’ सांगलीमध्ये मतिमंद मुलांच्या शैक्षणिक विकासासाठी गेली तीस वर्षें कार्यरत आहे. मतिमंदांसाठी शिक्षण असते याबाबत समाज अनभिज्ञ होता. अशा काळात संस्थेची स्थापना झाली....