Tag: हर्णे बंदर
हर्णे – मानव आणि निसर्ग एकरूप
हर्णे म्हटले, की निळाशार समुद्रकिनारा, नाठाळ वारा, सागरी लाटांची गाज आणि दूरवर गेलेली गलबते ! हर्णे म्हणजे लाल माती, मोहरत असलेला आंबा, फणस आणि डोलणारी माडा-पोफळींची झाडे, चौपाटीवर साठलेल्या माशांच्या राशी आणि त्यांची उस्तवार सांभाळणारे मच्छिमार बांधव व कोळणी ! ‘हर्णे’ रत्नागिरी जिल्ह्याच्या दापोली तालुक्यातील एक गाव. त्याचे रूप आणि थाट तालुक्यासारखेच; तरी डोंगरावरील दापोलीच्या कोर्टकचेऱ्यांच्या अधीन असणारे...
एक सुवर्णदुर्ग – रक्षणा तीन उपदुर्ग !
सुवर्णदुर्ग हा दापोली तालुक्याच्या हर्णे बंदर गावात सागराच्या दिशेने उभा आहे. तो भव्यदिव्य आहे. त्यामुळे तो पर्यटकांना पहिली साद घालतो. सुवर्णदुर्ग किनाऱ्यापासून तीन किलोमीटर अंतरावर आहे. तो किल्ला म्हणजे कोकणच्या सौंदर्यात पडलेली जडजवाहिराची खाणच जणू ! त्याने आठ एकर जागा व्यापली आहे. किल्ल्याच्या तटबंदीची उंची तीस फूट आहे. किल्ला सागर किनाऱ्याचे रक्षण करत ताठ मानेने उभा आहे...
श्री.ना. पेंडसे – कोकणचा कलंदर लेखक
मराठी वाचकांच्या मनावर 1940 ते 1980 अशी चार दशके अधिराज्य गाजवले ते श्री. ना. पेंडसे या कोकणातील लेखकाने ! त्यांनी कोकणच्या तांबड्या मातीतील सर्वसामान्य माणसाच्या चिवट लढाया वैश्विक केल्या. कोकणातील निसर्ग, तेथील सर्वसामान्य माणसे, संस्कृती त्यांच्या साहित्याच्या केंद्रस्थानी होते. त्यांच्या ‘रथचक्र’, ‘तुंबाडचे खोत’, ‘गारंबीचा बापू’ अशा एकापेक्षा एक कादंबऱ्या सरस ठरल्या. त्यांनी सर्वसामान्य माणसाच्या जगण्याचा नि मनाचा शोध त्यांच्या कादंबऱ्यांमधून घेतला...
केळशीच्या रमलखुणा
पूर्वीच्या काळी गाव, गावाकडची संस्कृती, गावची अर्थव्यवस्था कशी होती याचे प्रातिनिधिक रूप म्हणजे केळशी. गावाकडचे निसर्गसौंदर्य, तेथील लोकजीवन आणि त्यातील वेगळेपण हे सगळेच भूरळ घालणारे होते. आज गावे शहरीकरणामुळे सुधारली. पूर्वीच्या गावांबाबत अनभिज्ञ असलेल्या आजच्या पिढीला जुन्या गावची सैर केळशी या गावातून घडेल...