पाराची भारतीय संकल्पना संपूर्ण गावात आणणारे महाराष्ट्रातल्या जळगाव जिल्ह्यात पारोळा हे छोटे गाव आहे. तिथे चौरस्त्यांमध्ये अथवा कडेला 'पारांच्या ओळी' असल्याने पारओळी असे नाव पडले. पुढे त्याचे पारोळा झाले. गावातले रस्ते काटकोनात शिस्तशीर आहेत. धुळ्याहून जळगावकडे जाणा-या राष्ट्रीय महामार्गावर पारोळा आहे...