सोलापूर शहरात 8 मे 1930 रोजी इंग्रजी हत्यारी पोलिसांकडून जालियनवाला बागेची छोटी आवृत्ती घडली होती. सोलापुरात जे हत्याकांड सरकारने घडवले होते, त्याची खबर जगाला नव्हती. पंचवीसाहून अधिक बळी त्यात गेले होते. सोलापूरचे ते गाऱ्हाणे जगाच्या वेशीवर टांगले रामचंद्र शंकर उपाख्य रामभाऊ राजवाडे यांनी. त्यांचे वृत्तपत्र होते ‘कर्मयोगी’ या नावाचे...