सोलापूर
Tag: सोलापूर
सोलापूरचे फरारी डॉक्टर कृ.भी. अंत्रोळीकर (Solapur’s freedom fighter Doctor K.B. Antrolikar)
सोलापूरचे स्वातंत्र्यसैनिक डॉ. कृ.भी. अंत्रोळीकर हे राष्ट्रीय चळवळीकडे विद्यार्थिदशेतच ओढले गेले होते. अंत्रोळीकर यांना गांधीजींची धडपड नेमकी भावली होती. गांधीजींचे सारे प्रयत्न सामान्यातील सामान्य माणूस त्या चळवळीत समाविष्ट करावा यासाठी होती. त्यामुळे अंत्रोळीकर यांनी आयुष्यभर तो मार्ग अनुसरला. तोपर्यंत सोलापूरमधील चळवळ ही प्रामुख्याने उच्च शिक्षितांची होती...
सोलापूरचे मार्शल रामकृष्ण गणेशराम जाजू (Ramkrishna Jaju- Solapur’s martial in Freedom Struggle)
‘मार्शल’ हे खरे तर लष्करी संबोधन, परंतु तेच संबोधन महात्माजींना दैवत मानून ज्याने अहिंसेची व अनात्याचाराची शपथ घेतलेली आहे अशा जाजू नावाच्या सोलापूरातील गांधीवादी समाजसेवकाच्या नावापुढे पाहून मोठा विरोधाभास वाटतो. रामकृष्ण गणेशराम जाजू !
वासुदेव बळवंत; नव्हे, हॉटसन-गोगटे ! (The ill famous Hotson-Gogate)
‘सोलापूर मार्शल लॉ’चे प्रकरण, त्याचा निकाल लागून गेल्यानंतरही चिघळत राहिले आणि त्याचे पर्यवसान ‘मार्शल लॉ’चे कर्ते अर्नेस्ट हॉटसन यांच्यावर गोळ्या झाडण्यात झाले. तो इतिहास रोमहर्षक आहे.
सोलापूरचा ‘मार्शल लॉ’ आणि चार हुतात्मे (True Story of British Martial Law in Solapur...
भारतीय स्वातंत्र्यलढ्यात सोलापुरला ‘मार्शल लॉ’चे महाभारत घडून आले. त्याआधी तेथे चक्क चार दिवस स्वराज्य होते. त्याला सोलापूरकर ‘गांधीराज’ म्हणत होते. अर्थात ते अचानक, एकाएकी घडले नाही.
कुर्बान हुसेन – सोलापूरचा हुतात्मा राष्ट्रभक्त तरुण (Martyr Kurban Husain – Solapur’s Young Editor...
सोलापूरचा कुर्बान हुसेन यांच्याएवढी उपेक्षा स्वातंत्र्यलढ्याच्या इतिहासात कोणाच्याच वाट्याला आलेली नसेल ! वीस-एकवीस वर्षांच्या आयुष्यात कुर्बान हुसेन सातत्याने ‘रयतेचे कोतवाल व वकील’ राहिले.
कोल्हापूरचा चालता बोलता ज्ञानकोश (Ram Deshpande : Kolhapur’s Encyclopedia)
"ज्या वेळी संग्रहाचं, जतनाचं हे काम तुमच्या आवाक्याबाहेरचं आहे असं वाटेल तेव्हा मला कळवा." लंडन युनिव्हर्सिटीचे डॉ. ग्रॅहम स्मिथ यांनी मला आश्वासक सुरात पाठिंबा दिला...
देशातील पहिले अशोकचक्र विजेते सैनिक बचित्तर सिंह (Memorial Needed For Marathwada War Hero)
बचित्तर सिंह हे देशातील पहिले अशोकचक्र विजेते सैनिक. निजामाच्या जोखडातून मराठवाडा मुक्त करण्यासाठी कामी आलेल्या शीख रेजिमेंटच्या हवालदार बचित्तर सिंह यांना अशोकचक्र देऊन सन्मानित करण्यात आले.
सोलापूरची उद्योगवर्धिनी: हजारो महिलांचे सक्षम हात! (Udyogvardhini – Power to Solapur’s Women)
सोलापूरच्या उद्योगवर्धिनीच्या प्रमुख आहेत चंद्रिका चौहान. ‘उद्योगवर्धिनी’ हे सोलापूर परिसरातील महिलांच्या अल्पबचत गटांचे मोठे नेटवर्क आहे. चंद्रिका चौहान या देखील सरळ साध्या गृहिणीपासून खूप मोठ्या सामाजिक कार्यकर्त्या होऊन गेल्या आहेत.
मंगळवेढा, भूमी संतांची (Mangalvedha Saintly Land)
मंगळवेढा हे गाव संतभूमी म्हणून महाराष्ट्राला परिचित आहे. ते आहे सोलापूर जिल्ह्यात; पंढरीच्या विठुरायापासून अवघ्या बावीस किलोमीटर अंतरावर, दक्षिणेला. महाराष्ट्र आणि कर्नाटक राज्यांचा समन्वय तेथे साधला जातो. मंगळवेढा तालुक्याची लोकसंख्या दीड लाखाच्या आसपास आहे.
गोंधळी नाटक जपणारे चव्हाण बंधू (Kannad play in border town Wagdari)
गोंधळीसमाजाचे बांधव गोंधळी नाटक दीडशे वर्षांपासून वागदरी येथे करत आले आहेत. वागदरी हे महाराष्ट्र-कर्नाटक सीमेवरील, सोलापूर जिल्ह्याच्या अक्कलकोट तालुक्यातील गाव आहे. तेथे मराठी व कन्नड, दोन्ही भाषांचा वावर आहे. सर्व सण-उत्सवातील सांस्कृतिक व मनोरंजनाच्या कार्यक्रमांत द्विभाषा सूत्र फार जाणवते.