‘अचलपूरचा इतिहास म्हणजेच वऱ्हाडचा इतिहास’! या वचनात गावाचा शहराबद्दलचा अभिमान आहे. मात्र ते अचलपूर (आणि परतवाडा) हे शहर पार बदलून गेले आहे. संपन्नतेची साक्ष पटवणाऱ्या खुणा फक्त शिल्लक आहेत ! शहराच्या गतकाळातील वैभवाची साक्ष ऐतिहासिक वास्तूंमुळे पटते हे मात्र खरे ...
अमरावती जिल्ह्यातील अचलपूर ही धार्मिक आणि सांस्कृतिक वारसा लाभलेली प्राचीन भूमी ! अचलपूर शहरावर मोगल, मराठा आणि निजाम अशा तिघांनी राज्य केले. पूर्वी या शहराचे नाव नौबाग होते. ती नाग देवांची जन्मभूमी, म्हणून नौबाग नाव पडले अशी आख्यायिका आहे...
अचलपूरला समृद्ध नाट्यपरंपरा लाभली आहे. विदर्भातील कालिदास आणि भवभूतींसारख्या नाट्य विभूतींनी नाट्यक्षेत्रात अजरामर कार्य केल्यानंतर तेथे आधुनिक रंगभूमी रुजली. अचलपुरातील बहुतेक नाट्यगृहे ही नाटके सादर करणाऱ्या मंडळांची स्वतःची आहेत. विशेष म्हणजे अचलपूरच्या जुन्या संस्था रंगमंचाची पूजा करताना नाटकांतील स्त्रीपात्रांचीही पूजा करत. कालौघात ती नाट्यगृहे नाहीशी झाली, पण नाट्यगृहांच्या समोरील मंदिरे जोरात चालू आहेत…