इतिहासात अनेक मराठा पराक्रमी घराणी होऊन गेली. मध्ययुगातील इतिहासप्रसिद्ध म्हणजे यादव राजघराणे. ते देवगिरी येथून राज्य करत होते. यादव राजवंशाची नाणी मुख्यतः सोने या धातूमध्ये आढळून येतात. यादवकालीन नाण्यांचे धातूची शुद्धता हे वैशिष्ट्य दिसून येते. त्यांनी चांदी व काही प्रमाणात तांबे या धातूंमध्येही नाणी पाडली...
भवानीगड हा भुईकोट ह्या प्रकारात येणारा किल्ला आहे. किल्ले भवानीगड हा शिवकाळात टेहळणी गड म्हणून महत्त्वाचा होता. त्या गडाच्या आसपास किल्ले महिपतगड आणि किल्ले प्रचीतगड हे दोन महत्त्वाचे किल्ले येतात. तसेच, राणी येसुबार्इंचे माहेर असलेले शृंगारपूर गाव आणि संभाजी राजांच्या कारकिर्दीत सरसेनापती असलेले म्हाळोजी घोरपडे यांचे कारभाटले ही गावेही हाकेच्या अंतरावर आहेत. त्यामुळे किल्ले भवानीगड त्या सगळ्या परिसरावर लक्ष ठेवण्यासाठी उपयोगात येत असे...
कसबा हे रत्नागिरी जिल्ह्याच्या संगमेश्वर तालुक्यातील इतिहासप्रसिद्ध गाव. त्या गावाला संभाजी महाराजांचा इतिहास जसा आहे तसाच देवालयांचाही. भग्न देवालयांचे गाव म्हणून त्या परिसराची ओळख...
रामशेज किल्ला नाशिकजवळ दिंडोरीपासून दहा मैलाच्या अंतरावर आहे. छत्रपती संभाजी महाराजांनी त्यांच्या कारकिर्दीत हा किल्ला सतत साडेपाच वर्षे (पासष्ट महिने) मोगलांशी झुंजत ठेवला. रामशेजच्या...
रत्नागिरी हे धार्मिक, ऐतिहासिक आणि सांस्कृतिक वारसा असलेले शहर म्हणून ओळखले जाते. लोकमान्य टिळक यांचे जन्मस्थान, सावरकर स्मारक, ऐतिहासिक पतितपावन मंदिर, विठ्ठल मंदिर, भाट्येचा...