नाटक, दशावतार, भारूड, कीर्तन असे कोणतेही नवनवे कलाप्रकार एकाएकी जन्माला आलेले नाहीत. त्यांना पूर्व परंपरा आहे. ते घटक आणि काळाबरोबर विकसित होत असलेल्या नवनवीन कल्पना यांच्या एकत्रीकरणातून नवे ताजे काही जन्माला येते...
सुलभा सावंत ‘महाराष्ट्रातील पहिल्या संबळवादक म्हणून ओळखल्या जातात. पहिल्याच का, तर त्या एकमेव स्त्री संबळवादक आहेत. त्यामुळे ‘सुलभा सावंत आणि संबळ हे समीकरणच होऊनच गेले आहे. त्यांचा स्वभाव लहानपणापासून धाडसी.
संबळ हे डमरूचे प्रगत रूप होय. कालिकापुराणात, शिवाने पार्वतीच्या आनंदासाठी हे वाद्य निर्माण केले अशी समजूत आहे. संबळ हे वाद्य कुलधर्म, कुलाचार, परंपरा म्हणून...