Home Tags शेवगाव

Tag: शेवगाव

मंदार भारदे यांची झेप विमानाची !

मंदार अनंत भारदे नावाचा शेवगावकर तरुण विमाने आणि हेलिकॉप्टर्स भाड्याने देतो; त्याच्या स्वत:च्या मालकीची विमाने आणि विमान उड्डाण कंपनी आहे. त्याने ‘मंदार अनंत भारदे’ या त्याच्या नावातील आद्याक्षरे घेऊन कंपनी स्थापन केली आहे - Mab एव्हिएशन !

मंदार भारदे – जिद्दीचा उत्तुंग प्रवास !

मंदार भारदे हा तरुण व्यवसायिक आहे. तो चित्रपटनिर्मिती संस्थांना हवाई चित्रिकरणासाठी चार्टर विमानसेवा देतो. ‘मॅब एव्हिएशन प्रायव्हेट लिमिटेड’ 2012 साली रजिस्टर झाली. त्याने ‘एव्हिएशन वॉर रूम’ ही संकल्पना सार्वत्रिक निवडणुकीच्या वेळी पहिल्यांदा, 2014 साली भारतात आणली. ती राष्ट्रीय स्तरावर नावाजली गेली...

शेवगावच्या साहित्य चळवळीचा मानबिंदू – महात्मा सार्वजनिक वाचनालय

न्या. महादेव गोविंद रानडे यांनी 1885 साली स्थापन केलेले महात्मा सार्वजनिक वाचनालय हे शेवगावच्या साहित्य आणि सांस्कृतिक चळवळीचा मानबिंदू ठरले आहे. बाळासाहेब भारदे यांनी वाचनालयाच्या अध्यक्षपदाची धुरा सांभाळताना त्यास वैभव प्राप्त करून दिले. वाचनालयात पन्नास हजारांहून अधिक ग्रंथ तर तीस दैनिके, सोळा साप्ताहिके, सहा पाक्षिके आणि वीस मासिके अशी संपदा आहे...

ऐतिहासिक वारसा असणारे मुंगी गाव

गोदावरी नदीकाठी गोदा संस्कृतीचा उदय झाला व तेथे अनेक गावे वसली. त्या गावांना धार्मिक, ऐतिहासिक, सामाजिक, राजकीय, आर्थिक महत्त्व आहे. मुंगी गाव त्यापैकी एक. त्याच्या एका बाजूला शांतिब्रह्म एकनाथ महाराजांचे पैठण, तर दुसऱ्या बाजूला संत शिरोमणी ज्ञानेश्वरांचे जन्मस्थान आपेगाव आहे. मुंगी गावाला पूर्वीच्या काळी पैठण शहरासारखे महत्त्व होते...

तिफण फाउंडेशनचा समाज माध्यमातून ‘कृषी विस्तार’

समाज माध्यमांच्या वापरातून कृषी विस्तार अधिक व्यापकपणे व्हावा या उद्देशाने तिफण फाउंडेशनची स्थापना करण्यात आली. शेतकऱ्यांपर्यंत नवनव्या शेती पद्धतींची माहिती, आधुनिक शेतकीचे ज्ञान व कौशल्ये पोचावी याकरता सहाय्यक कृषी अधिकारी हे फेसबुक पेज व द फार्म बुक या युट्यूब चॅनलचा वापर केला जातो...

खो-खो खेळासाठी शेवगाव स्पोर्ट्स क्लब

0
क्रिकेट, बॅटमिंटन, टेनिस, स्केटिंग अशा खेळांसाठी प्रसिद्ध असलेले महाराष्ट्रातील विविध क्लब आपल्याला माहिती आहेत. पण आपल्या मातीतल्या खेळांना प्रोत्साहन देणारे क्लब विरळच! असाच एक वेगळ्या वाटेवरुन यशोदायी प्रवास करणारा महाराष्ट्रातील एक क्लब म्हणजे ‘शेवगाव स्पोर्ट्स क्लब’. या क्लबने शालेय पातळीवर असणारा खो-खो हा खेळ राष्ट्रीय पातळीवर पोहचवला…

फकिराच्या निर्मितीमागील शेतकरी हात!

प्रतिभावंत लेखक, शाहीर आणि समाजसुधारक अवलिया म्हणजे अण्णाभाऊ साठे होत. अण्णाभाऊ यांचे स्वलिखित ‘फकिरा’ कादंबरीवर चित्रपटनिर्मिती करावी हे स्वप्न होते. अण्णाभाऊ यांच्या स्वप्नपूर्तीसाठी शेवगाव तालुक्यातील सामनगाव येथील चार-पाच शेतकरी एकत्र आले आणि स्वत:च्या जमिनी तारण ठेवून त्यांनी ‘फकिरा’ या चित्रपटाची निर्मिती केली. पण त्याचा शेवट मात्र शोकाकुल झाला...

बाळासाहेब भारदे यांची काँग्रेसनिष्ठा…

बाळासाहेब भारदे यांची कुशल राजकारणी, गांधीवादी नेता अशी ओळख आहे. त्यांना इंदिरा गांधी यांनी यशवंतराव चव्हाण यांची साथ सोडून मुख्यमंत्री व्हावे असा निरोप दिला. बाळासाहेबांनी काळाची पावले ओळखून पदत्याग केला, परंतु निष्ठा सोडली नाही...

बाबुराव भारस्कर यांचा निवडणूक चमत्कार!

बाबुराव भारस्कर यांच्यावर गांधीवादाचे संस्कार झाले. ते मातंग समाजातून कॅबिनेट मंत्रीपदापर्यंत पोचलेले साठच्या दशकातील पहिले नेते. बाबुराव यांनी वंचित घटकांच्या विकासासाठी मोलाचे योगदान दिले...

हिंदु-मुस्लिम ऐक्याचे प्रतीक – साध्वी बन्नोमाँ जत्रा

0
बोधेगाव येथे भरणारी साध्वी बन्नोमाँ जत्रा हिंदु-मुस्लिम लोक एकत्र येऊन साजरी करतात. दोन्ही समुदायांचे ते श्रद्धास्थान आहे. ती जत्रा १८९८ सालापासून नियमितपणे भरत आहे. अठरापगड जातीच्या लोकांमुळे अनेक प्रकारचे वैविध्य त्या एकाच जत्रेत एकवटलेले आढळते...