Tag: शिक्षणसंस्था
आबासाहेब काकडे – झुंजार लोकनेते
आबासाहेब काकडे हे नगर जिल्ह्याच्या शेवगाव तालुक्यातील मोठे व्यक्तिमत्त्व. त्यांच्या जीवनात गेल्या शतकातील सर्व प्रभाव यथार्थ जाणवून जातात हे विशेष होय. त्यांच्या घराण्याचा इतिहास शिवकाळापर्यंत मागे जातो. त्या मंडळींना परिस्थितीवश बीड जिल्ह्यातून स्थलांतर करावे लागले. ब्रिटिश काळातील घराण्याचा आब, त्याबरोबर देश स्वातंत्र्याची आस, शिक्षणाची ओढ आणि घरातून व आधुनिक शिक्षणातून लाभलेले संस्कार - त्यातून उभी राहिलेली आंदोलने व घडलेले शिक्षण प्रसारासारखे विधायक काम... आबासाहेबांचे आयुष्य अनेकविध घटनांनी भरलेले आहे...
आबासाहेब काकडे : प्रेरणा कोल्हापूरची (Abasaheb Kakade : Inspiration from social movements in Kolhapur)
‘काकडे’ घराण्याची झुंजार परंपरा सतत चारशे वर्षे जपली गेली आहे. घराण्याचा आधुनिक काळातील इतिहास सुरू होतो एकोणिसाव्या शतकाच्या अखेरीस कान्होजी महादजी काकडे यांच्यापासून. कान्होजी आणि लक्ष्मीबाई यांना पाचव्यांदा मुलगा झाला तो जगन्नाथ म्हणजेच आबासाहेब. आबासाहेबांच्या विचारांची आणि सामाजिक व राजकीय कार्याची जडणघडण कोल्हापूर संस्थानामधील घटनाक्रमांतून होत गेली. आबासाहेब कोल्हापूरवरून नगर जिल्ह्यात- स्वमुलखात नुसतेच मल्लविद्या घेऊन परतले नाहीत तर मानवतावादी विचार घेऊन आले...
शेवगावचे रमेशसर – विविधांगी कर्तृत्व
शेवगावचे रमेश भारदे यांना शिक्षणसम्राट होणे सहज शक्य होते, तसे राजकीय संबंधही त्यांचे होते; पण ते शिक्षक झाले ! आणि नंतर सेवाभाव, ध्येयनिष्ठ असे शिक्षणसंस्था चालक बनले. त्यांच्या या कर्तबगारीचा केवळ शेवगाव नव्हे तर नगर जिल्ह्यावर एक वेगळा ठसा उमटला आहे. रमेश भारदे यांनी ज्ञानदानाचे व्रत अखंड जपले...
देऊळ, लवासा आणि विकास
गरीब खेड्याच्या जवळ, उजाड माळरानावर, एकाकीपणे उभ्या असलेल्या उंबराच्या झाडाखाली जमिनीवर झोपलेल्या गुराख्याला अचानक दत्त दिसल्याचा भास होतो. बातमी खेड्यात पसरते. दत्ताचे देऊळ बांधायचा निर्णय होतो आणि बघता बघता गाव झपाट्याने बदलते...