गणित हा साऱ्या तर्कबुद्धीचा पाया असतो. गणिताला सोपे करणारे एन.डी. पाटीलसर आमच्या दहिवडी जिल्हा परिषद शाळेत आहेत. त्यांचे ते कौशल्य आमच्या शाळेपुरते मर्यादित का ठेवावे असा विचार मनात आला आणि 2017 सालापासून सुरू केले- Ajay Kale- Tech Guru या नावाने !!
तेहतिसावे मराठी साहित्य संमेलन मुंबई येथे 1950 साली झाले. त्याचे अध्यक्ष यशवंत दिनकर पेंढारकर ऊर्फ राजकवी यशवंत हे होते. कवी यशवंत यांचा हातभार आधुनिक कवितेला उज्ज्वल आणि कीर्तिवंत करण्यात फार मोठा आहे. त्यांनी कवी केशवसुत, बालकवी, गोविंदाग्रज यांच्यानंतर मराठी कविता अधिक समृद्ध केली...
शालेय मुलांचे ऑनलाईन शिक्षण लॉकडाऊनमुळे 2020 मध्ये सुरू झाले, परंतु स्थलांतरित मुलांच्या शिक्षणाची मोठी अडचण निर्माण झाली. तशा मुलांच्या अनेक झोपड्या नांदूर गावात कोरोनाच्या सर्वेक्षणाच्या निमित्ताने जुलै 2020 महिन्यात दिसून आल्या. परंतु ऊसतोडीला पालकांबरोबर दिवसभर गेलेली ती मुले संध्याकाळीच माघारी येत. त्यांचे सर्वेक्षण करणे कठीण होते...
शाळा प्रगत करण्याच्या असतील तर अगोदर शंभर टक्के विद्यार्थी शाळेत दाखल झाले पाहिजेत, ते शाळा शाळांत टिकले पाहिजेत व शिकले पाहिजेत. लाखो शिक्षकांनी स्वयंस्फूर्तपणे ‘बालरक्षक’ बनून कार्य केले तर मुलांना शाळा शाळांत आणण्यात मोठ्या प्रमाणावर यश येऊ शकेल...
देविदास गुंजकर या शिक्षकांकडे सहा हजार शिक्षकांनी जाऊन त्यांच्याकडून प्रशिक्षण घेतले आहे ! ते कसले? तर पहिलीचे विद्यार्थी दहावीच्या पुस्तकातील शब्द कसे लिहू शकतात ते रहस्य त्यांनी सांगावे याबाबतचे. शिक्षक चांगली शाळा बघण्यासाठी गावोगावी जात असतात, पण सहा हजार शिक्षक दिवसभर थांबून दुसऱ्या शिक्षकाकडून अध्यापन तंत्र जाणून घेत आहेत हे प्रथमच घडत आहे...
शिक्षक विद्यार्थ्यांच्या दारी (ऑनलाईन व ऑफलाईन शिक्षण प्रक्रिया) नावाच्या उपक्रमाची सुरुवात गुंजकर सरांनी लॉकडाऊनच्या आधीपासून केली होती. तो उपक्रम राबवला जातो रविवार व इतर सुट्टीच्या दिवशी...
नानावाडा ही जुना पेशवेकालीन इमारत पुण्यात शनिवार वाड्याला लागून आहे. तेथे ‘नूतन विद्यालय’ नावाची महानगरपालिकेची पहिली ते चौथीपर्यंत शिक्षण असणारी शाळा दुसऱ्या मजल्यावर दोन...
शंकर गुलाबराव माने हे मूळचे सातारा जिल्ह्यातील पाटण गावचे रहिवासी. त्यांनी त्यांच्या विविध छंदांतून एक वेगळा आदर्श उभा केला आहे. ते सध्या रत्नागिरी जिल्ह्याच्या...
‘स्टाफ-रूम’ नावाचा ‘संवादवर्ग’ महाविद्यालयांमधून हरवत चालल्याची विषण्ण जाणीव ज्येष्ठ प्राध्यापकांमध्ये आहे. स्टाफरूममधील प्राध्यापकांची चैतन्यमय उपस्थिती, गप्पांचे अनौपचारिक (शैक्षणिक) फड, वादविवाद, चर्चा या गोष्टी नवोदित...
युवराज घोगरे यांच्या शिक्षक म्हणून नोकरीची सुरुवात 12 मार्च 2005 रोजी जळगाव जिल्ह्यातील विवरे या लहानशा गावी जिल्हा परिषद शाळेत झाली. त्या गावात येण्या-जाण्याची...