अजगर हा शब्द ‘अजागर’ ह्या संस्कृत शब्दावरून तयार झाला आहे. अजागर म्हणजे जो जागत नाही तो, असा त्याचा अर्थ आहे. अजगराला संस्कृतमध्ये अजागर असे म्हणतात. सतत सुस्त असणाऱ्या अजगराला किती समर्पक नाव आहे...
पळस हे रानातील झाड आहे; ते वसंत ऋतूच्या आगमन काळात नेत्रदीपक बनून जाते. इतर वेळी ते सर्वसामान्य झाड असते. वसंत ऋतू आला, की त्याची पाने गळून पडतात आणि संपूर्ण झाड लाल-शेंदरी रंगाच्या फुलांनी बहरून जाते...
एखादी गोष्ट दुसऱ्या गोष्टीशी शंभर टक्के जुळणारी म्हणजेच पूर्णत: मिळती-जुळती असते, तेव्हा त्यांच्यातील साम्य वर्णन करताना ‘तंतोतंत’ हा शब्द वापरला जातो. वैदिक काळात विद्वानांचे...
चौदा ह्या संख्येशी निगडित काही गोष्टी भारतीय संस्कृतीत आणि व्यवहारात आढळतात. उदाहरणार्थ, विद्या एकूण चौदा आहेत. 'हरिविजया’तील
चौदा जणींची ठेव ।
नचले स्वरूप वर्णावया ॥
या...
लहान मूल खेळताना पडले आणि त्याला खरचटले, तर ते मोठ्याने भोकांड पसरते. त्या वेळी मूल त्याच्यासमोर कोणी ‘आला मंतर, केला मंतर, जादूची कांडी छू.’ असे म्हणताच रडायचे थांबते. त्यांपैकी ‘छू’ हा मराठीतील एकाक्षरी शब्द आहे...
मुंबई शहर सखल भागात नैसर्गिक भौगोलिक रचनेमुळे असल्याने काही भागात अतिवृष्टीमुळे पाणी तुंबते. मुंबईत पाणी तुंबण्यामागील ‘भांगी भरती’ या नव्या कारणाची भर पडली आहे....
'पांढरा हत्ती पोसणे' हा वाक्प्रचार आहे. 'पांढरा हत्ती पोसणे' (त्याचे पालन करणे) म्हणजे तोट्याचा व्यवहार. तो फक्त प्रदर्शनासाठी असतो. त्याच्या चारापाण्याचा खर्च इतर पाळीव...
नुकसानीत जाणारे (आणि गेलेले) सरकारी उपक्रम; ज्यापासून काही फायदा होत नाही, उलट, खर्चच अधिक होतो. अशा वस्तूंना ‘पांढरा हत्ती’ असे म्हटले जाते. हिंदुस्थानात 1583-1619...
पारध्यांच्या शिकारीच्या साधनांमध्ये ‘वागुर’ या साधनाचा उल्लेख येतो. वागुर, वागुरा, वागोरा, वागोरे, वागोऱ्या हे सर्व शब्द एकाच अर्थाचे असून पक्ष्यांना पकडण्याचे जाळे, पाश, बंधन...
पु.ल. देशपांडे यांनी ‘माझं खाद्यजीवन’ या लेखात ‘शिकरण’ या पदार्थाबद्दल असे म्हटले आहे, की ‘शिकरण ही तर आयत्या वेळी उपटलेल्या पाहुण्यांची बोळवाबोळव’. पुलंनी असे म्हणण्याचे कारण, स्वयंपाकघरातील करण्याला सर्वात सोपा पदार्थ कोणता असेल, तर तो शिकरण...