Tag: शंकराचार्य
विवेकचूडामणि – मराठी अनुवाद घडला हे खरे !
मी कवी किंवा साहित्यिक म्हणून आद्य शंकराचार्य यांच्या वाङ्मयाशी जोडला जावा असे ‘पुण्य’ घडल्याचे आठवत नाही. पण खरोखरीच, आले देवाजीच्या मना... तसे घडले आणि माझ्या हातून ‘विवेकचुडामणि’ या महान संस्कृत ग्रंथाचा मराठी अनुवाद होऊन गेला ! एकदा गंमत घडली ! माझी गजल ‘दैनिक सकाळ’मध्ये प्रसिद्ध झाली. ती वाचून गझल गायक भीमराव पांचाळे यांनी लिहिले, की ती कविता ‘व्योमगंगा वृत्ता’त आहे. तोपर्यंत त्या नावाचे वृत्त आहे, हे माझ्या गावीही नव्हते ...
शंकराचार्यांचा विवेकचूडामणि ग्रंथ
शंकराचार्य हे भारतीय संस्कृतीतील धर्मविचारांचे आद्यगुरू. शिवगुरु भट्ट व आर्याम्बा यांच्या पोटी शंकराचा प्रसाद म्हणून त्यांचा जन्म झाल्याची भावना मनी बाळगून त्यांचे नाव शंकर असे ठेवण्यात आले. शंकर मेधावी होते. ते प्रकांडपंडित म्हणून वयाच्या सहाव्या वर्षीच ओळखले जाऊ लागले. त्यांना वयाच्या आठव्या वर्षी गुरू गोविंदांकडून संन्यास प्राप्त झाला. त्यांना आयुष्य केवळ बत्तीस वर्षांचे लाभले. त्यांनी जवळपास चाळीस ग्रंथांची निर्मिती केली आहे...
मंदिर प्रवेशाचे महाभारत – संजयाच्या भूमिकेत
साने गुरुजी यांच्या नेतृत्वाखाली अस्पृश्यता निवारणाच्या चळवळीतील अखेरचा आणि निर्णायक लढा पंढरपूरमध्ये लढला गेला. देवतांची मंदिरे म्हणजे सनातन्यांचे बालेकिल्ले. त्या चळवळीत ते बालेकिल्ले काबीज करून, त्यांचे दरवाजे अस्पृश्यांना खुले करण्यास महत्त्वाचे स्थान मिळाले. साने गुरुजी यांनी त्यासाठी प्राणांतिक उपोषण केले. त्यातून पंढरपूरच्या विठ्ठल मंदिर प्रवेशाचे महाभारत घडले व त्याची परिणती हरिजनांना मंदिर प्रवेश मिळण्यात झाली...
कोल्हापूरची शतमानपत्रे : शतकभराचा इतिहास
जी.पी. माळी यांचे ‘कोल्हापूरची शतपत्रे’ हे पुस्तक म्हणजे एक ऐतिहासिक ठेवा आहे. गेल्या शतकभरातील 101 मानपत्रे ‘जशी होती तशी’ दिल्याने त्या त्या काळची शब्दकळ व मानपत्रांतील बदलत गेलेली भाषा लक्षात येते. ती मानपत्रे तो सगळा काळ वाचकापुढे उभा करतील. अभ्यासकांना तो फारच मोठा फायदा आहे...
आद्य शंकराचार्य
वेदांताचे तत्त्वस्वरूप समजावून देणा-या तत्त्ववेत्त्यांमध्ये आद्य शंकराचार्य यांची योग्यता सर्वश्रेष्ठ दर्जाची मानली जाते. त्यांना अवघे बत्तीस वर्षें (इ.स. 788 ते 820) आयुष्य लाभले. त्यांनी...