Tag: व्यक्ती
तुम्हां तो शंकर सुखकर हो…
पंडित शंकर अभ्यंकर हे साताऱ्याचे. त्यांचा जन्म झाला तेव्हा वडिलांनी गडू आणि पळी वाजवली. तो जन्मनाद ही शंकरराव यांच्या पुढील ‘संगीत आयुष्या’ची नांदी ठरली ! त्यांच्याच शब्दात सांगायचे तर ," गुरुकृपेने संगीतात एवढे शिकलो की त्यावेळी मनात सुरू झालेली आनंदाची मैफल सुरूच आहे. या मैफलीला भैरवी नाही...”
सुंदरबाई पवार – ब्रिटिशांच्या अफू धोरणाविरूद्ध लढा
ब्रिटिशांच्या अफूधोरणाच्या विरूद्ध लढा सुंदरबाई एच पवार या एका हिंदू - ख्रिस्ती महिलेने दिला. ब्रिटिशांनी अफूच्या व्यापाराला भारतात उत्तेजन देण्याचे जे धोरण स्वीकारले होते त्या विरूद्ध सुंदरबाईंनी खुद्द इंग्लंडात जाऊन तब्बल एकशेसोळा भाषणे दिली होती !
पिनकोडचे जनक : श्रीराम वेलणकर (Shriram Velankar – Father of Pincode System)
श्रीराम भिकाजी वेलणकर हे ‘पिनकोड’चे जनक म्हणून ओळखले जातात. ‘पिनकोड’शी प्रत्येक भारतीयाचे नाते घट्ट जोडलेलेआहे. त्याच्या नावासमोर नुसता पिनकोड नंबर लिहिला, तरी ती व्यक्ती देशाच्या कोणत्या भागात राहते हे कळून येते.
मीरा कुलकर्णी झाल्या आसामच्या मीराबायदेव! (Meera Kulkarni Turned To Meera Baydev)
मीराबायदेव नावाच्या मूळ मराठी महिला कार्यकर्त्या आसाममधील चहाच्या मळ्यांच्या प्रदेशात लोकप्रिय आहेत. त्या तेथील कामगारांच्या कुटुंबीयांचे जीवनमान सुधारावे, त्यांना चांगल्या सवयी लागाव्या, त्यांचे शिक्षणाने भले व्हावे यासाठी कळकळीने प्रचार करत असतात.
शंकरदेव आसाममधील वैष्णव चळवळीचा प्रणेता (Shakardev – Vaishnav Saint In Assam)
विष्णूच्या भक्तीचे कार्य ईशान्येकडील राज्यांत करणारे महापुरुष म्हणजे श्री शंकरदेव. त्यांची वैष्णव चळवळ आसाम राज्यात ‘महापुरुषीय धर्म' या नावाने प्रसारित झाली. विष्णुभक्ती भारताच्या विविध प्रांतांत चैतन्य महाप्रभु, संत कबीर, बसवेश्वर, रामानंद यांनी नेली;
सुरेश लोटलीकर याची अर्कचित्रे (Caricaturist Suresh Lotlikar)
सुरेश लोटलीकर हा हौशी व्यंगचित्रकार आहे. त्याचे विचार प्रगल्भ असतात आणि टिप्पणी मार्मिक. त्यामुळे तो अचूक वर्म पकडून व्यक्तीचे वा घटनेचे मर्म सूक्ष्मतेने चितारून टाकतो. त्या दृष्टीने त्याची राजकीय व्यंगचित्रे व अर्कचित्रे पाहण्यासारखी आहेत.
महेंद्र प्रताप हीदेखील हाथरसचीच ओळख (Freedom Fighter Mahendra Pratap Also Hails From Hathras)
काय योगायोग आहे, पाहा! काही योगायोग आवडू नये, असे असतात तशातीलच हा. पण त्यामधूनही दिलासा मिळतो! हाथरस नावाच्या जिल्ह्याचे मुख्य ठिकाण गेला महिनाभर गाजत आहे.
कलाविष्कार, मुक्ततेच्या दिशेने… (Art Individuality InTechnology World)
कलाया माणसाच्या जीवनाचा अविभाज्य भाग होत्या व असण्यास हव्यात. आदिमानवाचा प्रत्येक आविष्कार ही कलाकृती होती – मग ती माती, दगड, लाकूड, हाडे इत्यादींपासून बनवलेले भांडे असो किंवा मातृदेवतेचे शिल्प! पण माणूस
ज्ञानव्रती गीता गोरेगावकर-गोडबोले (Geeta Goregaonkar-Godbole – The Researcher)
गीता गोरेगावकर-गोडबोले या ज्ञानव्रती आहेत. त्यांचा ध्यास वैद्यकीय क्षेत्रातील अभ्यास व संशोधन हा आहे. गीता यांनी नॅशनल इन्स्टिट्यूट फॉर रिसर्च इन रिप्रॉडक्टिव्ह हेल्थमधून डॉ. दीपक मोदी यांच्या मार्गदर्शनाखाली Ph.D. केली.
देशातील पहिले अशोकचक्र विजेते सैनिक बचित्तर सिंह (Memorial Needed For Marathwada War Hero)
बचित्तर सिंह हे देशातील पहिले अशोकचक्र विजेते सैनिक. निजामाच्या जोखडातून मराठवाडा मुक्त करण्यासाठी कामी आलेल्या शीख रेजिमेंटच्या हवालदार बचित्तर सिंह यांना अशोकचक्र देऊन सन्मानित करण्यात आले.