Tag: व्यक्ती
विनोद करकरे यांचा जीवनोत्सव (Vinod Karkare: Celebration of his Life)
आमचे चेंबूरचे डॉ.विनोद करकरे हे जास्त प्रसिद्ध कशासाठी आहेत? अस्थिरोगांवरील उपचारांसाठी की त्यांच्या जुन्या फिल्म्सच्या गाण्यांसाठी? ते जनरल सर्जन आहेत व ऑर्थोपेडिक्स विशेषज्ञही आहेत. ते सर्व तऱ्हांच्या शस्त्रक्रियांत निष्णात आहेत आणि दोन्ही प्रकारच्या शस्त्रक्रियांतील त्यांचे विक्रम नोंदले गेले आहेत.
कोरोना: अमेरिकेत वातावरण संभ्रमाचे (Corona – People Confused in US)
अमेरिका दोन आघाड्यांवर लढाई लढत आहे. एक कोरोनाविरुद्ध आणि दुसरी लढाई म्हणता येणार नाही, परंतु नोव्हेंबरमध्ये होणारी अध्यक्षीय निवडणूक. ह्या दोन्ही गोष्टी एकमेकांत इतक्या गुंतल्या आहेत, की मास्क वापरायचे की नाही याबद्दलची साधी सूचना वैद्यकीय अधिकारी आणि राजकारणी लोक या दोघांकडून दिली जात आहे!
कोरोनाची काळजी न्यूझीलंडमध्ये मिटली! (New Zealand Corona Free)
भारतातून दक्षिण आफ्रिकेत आणि तेथे बारा वर्षे राहिल्यानंतर, दोन लहान मुलांना घेऊन न्यूझीलंडला येण्याचा निर्णय म्हणजे भलतेच धाडस होते, आमच्यासाठी! पण न्यूझीलंडसारख्या सुरक्षित देशात स्थायिक व्हावे असे आम्हाला वाटले आणि त्या दृष्टीने नोकरी, व्हिसा असे सगळे सोपस्कार करून न्यूझीलंडमध्ये ऑकलंड या गावी आलो; बघता बघता, त्याला तीन वर्षेही झाली...
लॉकडाऊन काळातील आगळेवेगळे शिक्षण!
राज्यातील ग्रामीण भागांत शाळा बंद, पण शिक्षण सुरू आहे! कोरोनामुळे सर्वत्र शाळांना सुट्ट्या आहेत. परंतु दीक्षा अॅपच्या माध्यमातून विद्यार्थ्यांपर्यंत शिक्षण पोचत आहे. दीक्षा अॅपमध्ये पहिली ते दहावीपर्यंतचे नऊ हजार सातशेहून अधिक व्हिडिओज व स्वाध्याय उपलब्ध आहेत.
बडोद्यातील विनाशकारी प्लेग, 1896 (KILLER PLAGUE 1896 IN VADODARA)
'थिंक महाराष्ट्र डॉट कॉम' या वेबपोर्टलवर महाराष्ट्र व मराठी माणूस यांबाबतची विविध तऱ्हांची माहिती आपल्याला संकलित करायची आहे. काही ऐतिहासिक महत्त्वाचा डेटादेखील गावोगावाहून, स्थानिक पातळीवरील प्रयत्नांतून उपलब्ध होऊ शकतो.
दुबईतील ईद झाली व्हर्च्युअल (Dubai, EId Goes Virtual)
जगभर कोरोना व्हायरसने धुमाकूळ घातला आहे. लोकांना त्याच्या बातम्या, हकिकती वर्तमानपत्रे, टीव्ही आणि समाजमाध्यमे यांवरून कळतात. पण त्या सर्वांवर वाचक/प्रेक्षकांचा विश्वास बसतो असे नव्हे. भारतातील हकिकती आपल्याला अन्य विविध मार्गांनीही कळत असतात.
देवाघरची बाळे (Gifted Children)
ठाण्याचे रंजन जोशी यांचे घरच चित्रकलेचे आहे. ते स्वतः, त्यांच्या पत्नी विद्या, दोघेही जे.जे. इंस्टिट्यूट ऑफ अप्लाईड आर्टमध्ये प्राध्यापक होते. त्यांचा मुलगा आदित्य, सून गौरी; ती दोघेही चित्रकलेचे शिक्षण घेऊन जाहिरातक्षेत्रात कामे करतात. आदित्य-गौरी यांची आठ वर्षांची छोटी मुलगी इरा हिला तिच्या खोलीत चित्रे काढण्यास एक भिंतच्या भिंत आहे
लंडन खूप दूर आहे… (Corona Experience in Britain)
कोरोनासंबंधात लंडन येथे राहत असलेल्या वेल्हाणकर व दळवी कुटुंबीयांशी संपर्क साधला. अमेय आणि तेजश्री वेल्हाणकर या पतिपत्नींनी तेथील माहिती दिली. पहिला रुग्ण ब्रिटनमध्ये 29 जानेवारी 2020 रोजी आढळला. बरेच लोक डिसेंबरच्या शेवटी व जानेवारीच्या पहिल्या दोन आठवड्यांत इटाली, ऑस्ट्रिया अशा युरोपीयन देशांत सहलीसाठी जातात.
वर्क फ्रॉम होम: एक कल्पनाविस्तार! (Work from Home Advantages)
कोरोना व्हायरस हे जगावर फार मोठे संकट ओढवले आहे; तितकेच ते मोठे आश्चर्य आहे आणि त्यातून भयानक अनुभव मिळत आहेत. घरामध्ये बंद राहणे ही कल्पना देशात आणीबाणी लावली गेली तेव्हाही एवढी कोणी अनुभवली नसावी. आख्खा देश असा बंद कोणी ना कधी पहिला ना अनुभवला! खेड्यापाड्यांत शहरांच्या एवढी भयानक परिस्थिती नाही.
संविदानंदांची संजीवन चिकित्सा आजही प्रचलित (Sanvidananda’s Sanjivan Chikitsa)
वैद्य यशवंत काशिनाथ परांजपे हे योगी संन्यासी व जीवन्मुक्त असे संतमहात्मा होते. त्यांचे वैशिष्ट्य असे, की त्यांनी ‘संजीवन चिकित्सा’ ही भारतीय वैद्यक पद्धत शोधून काढली. त्यांचे दुसरे वैशिष्ट्य म्हणजे त्यांनी त्यांच्या राहत्या घरी समाधी घेतली! ती समाधी त्यांच्या मावळंगे येथील घराच्या आवारात पाहण्यास मिळते.