'सरोवर संवर्धिनी' हा नवा, अजून फारसा न रुळलेला उपक्रम आहे. त्याचे स्वरूप ठिकठिकाणच्या लोकांनी त्या-त्या ठिकाणी एकत्र येऊन, तेथील जलस्रोतांची काळजी घेऊन जलसंवर्धनाच्या दृष्टीने आखलेला कृती आराखडा असे आहे...
तेरगावातील त्रिविक्रम मंदिराची वास्तू विटांनी बांधलेली आहे. ती गावाच्या मध्यभागी आहे. ती वास्तू म्हणजे बौद्धधर्मीयांचा चैत्य असावा असे एक मत आहे. विटांनी बांधलेल्या चैत्याच्या ज्या दोन वास्तू ज्ञात आहेत त्यांपैकी एक तेरची मानली जाते...
उस्मानाबाद जिल्ह्याची ओळख दोन नावांत सामावलेली आहे. एक म्हणजे महाराष्ट्राची कुलस्वामिनी जगदंबा तुळजाभवानी आणि दुसरे नाव म्हणजे तेर गावचे ‘वैराग्यमहामेरु संत गोरोबाकाका'. गोरोबांच्या अभंगाशिवाय संतवाङ्मय पूर्ण होत नाही...
‘ख्रिस्त पुराण’ महाकाव्याचे कवी फादर थॉमस स्टीफन्स हे मूळचे इंग्लंडमधील. ते वयाच्या तिसाव्या वर्षी रोम व लिस्बन मार्गे 24 ऑक्टोबर 1579 रोजी गोव्यात आले. थॉमस स्टीफन्स यांचे नाव मराठी वाङ्मयात प्रामुख्याने घेतले जाते ते त्यांच्या ‘क्रिस्त पुराण’ महाकाव्याबद्दल.
आदिमानवाने अग्नी निर्माण केला तेव्हा तो इतर प्राण्यांपासून वेगळा आणि श्रेष्ठ ठरला. त्याच वेळी,अग्नीमुळे मानव निसर्गापासून दूरही झाला. त्याने हळुहळू निसर्गव्यवहारात हस्तक्षेप सुरू केला. मानवाने प्रगती शिकार केलेले मांस अग्नीवर भाजण्यापासून ते अग्नीचा प्रकाशासाठी उपयोग करण्यापर्यंत साधली.
काम हमखास पार पाडण्याचे कौशल्य अंगी असणे म्हणजे हातखंडा. तर हातखंड म्हणजे मधून मधून सोडवणूक करणारा, मदतनीस (मूल, मित्र, शेजारी); तसेच अडल्यावेळी उपयोगी पडेल अशी व्यक्ती.
हळदिवा किंवा हळदिवी याचा शब्दकोशातील अर्थ हळदीच्या रंगाचा, पिवळा असा आहे. शब्द आरती प्रभू यांच्या कवितांमध्ये अनेकदा दिसतो. प्रामुख्याने ‘जोगवा’ या काव्यसंग्रहातील कवितांमध्ये. हळदिवी हा शब्द किती वेगवेगळ्या संदर्भात आणि तरीही चपखलपणे त्या कवितांमध्ये आला आहे.
‘ख’ हे वर्णमालेतील एक अक्षर असले तरी ‘ख’ हा एकाक्षरी शब्दही आहे. ख म्हणजे आकाश. त्यावरून आकाशातील ग्रहांना खगोल आणि त्यांच्या अभ्यासाला खगोलशास्त्र असे म्हटले जाते. ‘ख’ म्हणजे आकाशात, ‘ग’म्हणजे गमन करणारा असा तो खग (पक्षी).
रुद्राचा उल्लेख ऋग्वेदात आहे, पण शिवाचा नाही. शिव हा शब्द ऋग्वेदात विशेषण म्हणून आलेला आहे, देवतावाचक म्हणून आलेला नाही. वेदांतील रुद्र कसा आहे? अग्नीसारखा तांबूस, लाल आहे. माथी जटाभार असलेला,
गुरव जातीची निर्मिती भारतीय समाजात विशिष्ट परिस्थितीत झाली. गुरवकीचा व्यवसाय ग्रामदेवतांची पूजाअर्चा रोज व्हावी, नंदादीप लावला जावा,मंदिराची स्वच्छता राखली जावी या गरजेतून निर्माण झाला व त्यासाठी देण्याच्या सेवामूल्याची तरतूद बलुता पद्धतीत करण्यात आली...