Tag: वारकरी
आधुनिक विज्ञानयुगात वारीचे औचित्य
पंढरीची वारी ही भागवत धर्माची जगातील एकमेवाद्वितीय परंपरा. ती आठशे वर्षांपासून नुसती टिकूनच राहिलेली नाही तर वृद्धिंगत होत आहे. वारी सर्वसमावेशक असल्याने तिचे औचित्य आधुनिक विज्ञानयुगातही आहे. कर्म, ज्ञान, भक्ती यांचा यथायोग्य मेळ आणि व्यवस्थापन कौशल्याचा उत्कृष्ट नमुना म्हणजे पंढरीची वारी. परम संगणककार विजय भटकर यांनी विज्ञान व आध्यात्म यांचा पायाच मुळात श्रद्धा आहे, ती अंध असू शकत नाही असे सांगून, त्यांची परस्पर पूरकता लेखाद्वारे उलगडून दाखवली आहे...
गाडगेबाबा – जिणे गंगौघाचे पाणी ! (Saint Gadgebaba’s Life of Service and Sacrifice)
गाडगेबाबा जिथं जिथं न्यून जाणवलं, तिथं तिथं ते भरून काढण्यासाठी नेटानं प्रयत्न करत राहिले. अनेकांची आयुष्यं त्यांच्या सहवासाच्या लेपानं सुगंधित झाली. गाडगेबाबा सभोवती माणसांचा समुद्र पसरलेला असतानाही आतून नि:संग राहिले...
दत्त देवतेचे विविधांगी दर्शन
भगवान दत्तात्रेय ही भारतीय संस्कृतीतील अद्भुत निर्मिती आहे ! ते अत्री व अनसूया यांचे पुत्र आणि विष्णूचे अंश होत. दत्तात्रेयांचा प्रभाव शैव, वैष्णव, शाक्त या तिन्ही प्रमुख उपासना प्रवाहांना व्यापून उरणारा आहे. दत्तात्रेयांविषयीचा उत्कट श्रद्धाभाव महानुभाव, नाथ, वारकरी, समर्थ अशा वेगवेगळ्या संप्रदायांतही आहे...
अनंत भालेराव – लोकनेता संपादक
‘मराठवाडा’ वृत्तपत्र आणि संपादक अनंतराव यांची भाषा या दोन्हींचे ‘मराठवाडा’ या भूप्रदेशाच्या संस्कृतीशी अजोड नाते आहे. मराठवाड्यात सर्वसामान्य माणसे जी भाषा बोलत, जे वाक्प्रचार...
ज्ञानेश्वरी (Dnyaneshwari)
‘ज्ञानेश्वरी’ हा संत ज्ञानेश्वरांचा प्रसिद्ध ग्रंथ होय. ज्ञानेश्वरांनी ‘ज्ञानेश्वरी’ असे नाव त्या ग्रंथाला दिलेले नाही. ‘भावार्थदीपिका’ हे ज्ञानेश्वरीचे मूळ नाव होय. ज्ञानेश्वरांच्या ग्रंथाला ‘देशीकार लेणे’ असे संबोधतात. ‘ज्ञानेश्वरी’ ही भगवदगीतेवर लिहिलेली टीका होय. त्या टीकाग्रंथात सुमारे नऊ हजार ओव्या आहेत. भगवदगीतेतील तत्त्वज्ञान त्यात उपमादृष्टांताच्या आधारे सुलभतेने सांगितले आहे. आध्यात्मिक विषयाचे काव्यमय विवेचन या दृष्टीने तो ग्रंथ लोकोत्तर मानावा लागेल...
वारकरी शिक्षण संस्था आळंदी : कीर्तनकारांचे विद्यापीठ!
महाराष्ट्रातीलच नव्हे तर भारतातील पहिल्या वारकरी शिक्षण संस्थेची गुढी 24 मार्च 1917 रोजी (चैत्र शुद्ध प्रतिपदा (गुढीपाडवा) शके 1839) आळंदी येथे उभारली गेली. महाराष्ट्र...
विनोदिनी पिटके-काळगी – आनंददायी शिक्षणाच्या वारकरी
मुलांना इंग्रजी शाळेतच घालणे याकडे अधिकाधिक पालकांचा कल दिसत असताना नाशिकमध्ये एका मराठी शाळेसमोर प्रवेशासाठी रांगा दरवर्षी लागतात! शाळेच्या ‘प्रत्येक वर्गात फक्त चाळीस विद्यार्थी’...
देवपूरला बाबा भागवत आणि राणेखान यांचा अजब इतिहास
देवपूर हे नाशिक जिल्ह्यात सिन्नर शहरापासून बावीस किलोमीटर अंतरावर आहे. देवपूरचा संदर्भ पुराणात येतो. त्याची नोंद इतिहासातही आहे. देवपूर वारकरी परंपरेशीही जोडले गेलेले आहे....
वावीचे वारकरी संत – रामगिरी महाराज
भक्तिमार्गाचा अधिकार त्रैवर्णीकांना वारकरी संप्रदायाने दिला. सिन्नर तालुक्यात हरिनाम सप्ताह गावागावांत होत असतो. गुरुवर्य मामासाहेब दांडेकर, भारदेबुवा यांच्यासारखे श्रेष्ठ प्रवचनकार, कीर्तनकार तेथे पोचत असत....
डॉ. संपतराव काळे – सायकलवारीतील प्राचार्य
सायकल हे वाहन एकेकाळी शहरांतील सर्वसामान्य माणसाच्या दैनंदिन उपयोगात होते. स्वयंचलित दुचाकी, चारचाकी वाहने आल्यावर सायकलकडे दुर्लक्ष होऊ लागले. स्वयंचलित वाहनांना ऐट आहे -...