बाराव्या आणि तेराव्या शतकांच्या काठावर तेरा वर्षे महाराष्ट्रात सतत दुष्काळ होता. त्या दुष्काळात लाखा वंजारींमधील दुर्गादेवी या कर्तबगार महिलेने त्या काळच्या बिहार या गंगेच्या काठच्या प्रदेशातून धान्य आणून महाराष्ट्रातील समाज तेरा वर्षे अखंड वाहतूक करून जगवला! ती लाखा बैलांची वाहतूक इकडून तिकडे उत्तरेत नेऊन करत असे. महाराष्ट्रात तिचा सर्वत्र उल्लेख त्या काळापासून ‘दुर्गादेवी’ असा होऊ लागला. त्या काळाच्या इतिहासात तो ‘दुर्गादेवीचा दुष्काळ’ असे म्हटले जाऊ लागले...