आबासाहेब काकडे हे नगर जिल्ह्याच्या शेवगाव तालुक्यातील मोठे व्यक्तिमत्त्व. त्यांच्या जीवनात गेल्या शतकातील सर्व प्रभाव यथार्थ जाणवून जातात हे विशेष होय. त्यांच्या घराण्याचा इतिहास शिवकाळापर्यंत मागे जातो. त्या मंडळींना परिस्थितीवश बीड जिल्ह्यातून स्थलांतर करावे लागले. ब्रिटिश काळातील घराण्याचा आब, त्याबरोबर देश स्वातंत्र्याची आस, शिक्षणाची ओढ आणि घरातून व आधुनिक शिक्षणातून लाभलेले संस्कार - त्यातून उभी राहिलेली आंदोलने व घडलेले शिक्षण प्रसारासारखे विधायक काम... आबासाहेबांचे आयुष्य अनेकविध घटनांनी भरलेले आहे...