उषा तांबे या खरोखरच अष्टपैलू व्यक्तिमत्त्वाच्या व्यक्ती आहेत. प्राध्यापक, मुलाखतकार, समीक्षक, लेखक, इंग्रजी-मराठी - मराठी-इंग्रजी अशा दुहेरी अनुवादक आणि पुन्हा त्या दोन्ही भाषांत मूळलेखन करणाऱ्या, संपादक, साहित्य संघ पदाधिकारी,
स्वतंत्र पक्ष नावाचा एक पक्ष भारतात होता. तो जून 1959 साली स्थापन झाला आणि 1974 साली विसर्जितही झाला. तरी त्याचा प्रभाव जाणवतो, कारण त्या पक्षात तशीच मोठी प्रभावशाली माणसे गुंतली गेली होती. त्या विस्मृतीत गेलेल्या पक्षाची आठवण जागी झाली,
विजय कुलकर्णी अजिंठा लेण्यांतील चित्रे (कॉपी)गेली चाळीस वर्षें काढत आहेत. ती विविध कलादालनांमध्ये प्रदर्शित केली जात असतात. त्यांनी काढलेल्या त्या चित्रांना मोठी मागणी असते.
अजिंठा लेणी जगाला 1819 मध्ये माहीत झाली. ती खोदली गेली इसवी सनपूर्व दुसरे शतक ते इसवी सन चौथे शतक अशा सहाशे वर्षांत. म्हणजे त्यांचा शोध जवळ जवळ तेराशे वर्षांनी लागला! शोध लागूनही दोनशे वर्षें होऊन गेली आहेत.
लेखिका अनुपमा उजगरे या मूळच्या अहमदनगरच्या. त्यांची शैक्षणिक प्रगती लग्नानंतर पती निरंजन उजगरे व सासरे हरिश्चन्द्र उजगरे यांच्या प्रोत्साहनामुळे घडून आली. त्यामुळे त्यांना सामाजिक जीवनात गती लाभली आणि त्यांची साहित्यविश्वात प्रतिष्ठा निर्माण झाली.
ठाण्याचे अभय ओक कर्नाटक उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती म्हणून बंगलोरला गेले आहेत. ओक यांचे शिक्षण ठाण्याच्याच मो.ह. हायस्कूल या मराठी माध्यमाच्या शाळेत झाले. त्या शाळेने ओक यांचा हृद्य सत्कार 2020 सालच्या आरंभी घडवून आणला.
रामकृष्ण गोपाळ भांडारकर हे संस्कृतचे प्रकांड पंडित, भाषाशास्त्रज्ञ, प्राचीन इतिहासाचे संशोधक आणि कर्ते धर्म व समाजसुधारक होते. त्यांचे मूळ आडनाव पत्की होते. त्यांचे पूर्वज खजिन्यावर अधिकारी होते. म्हणून त्यांना ‘भांडारकर’ हे नाव पडले. त्यांचे आजोबा लाडो विठ्ठल हे शिरस्तेदार म्हणून इंग्रजीत पुढे आले. त्यांचे वडील महसूल खात्यात होते...
ठाण्याचेअनंत देशमुख यांचा साहित्य संशोधन, समीक्षा आणि चरित्रात्मक लेखन या प्रकारांत लेखक-संशोधक-समीक्षक म्हणून नावलौकीक गेल्या दशकभरात वाढला आहे; किंबहुना, देशमुख यांना सरोजिनी वैद्य, विजया राजाध्यक्ष यांच्यासारख्या नामवंत लेखक-समीक्षकांच्या पिढीनंतर त्या क्षेत्रात अग्रगण्य स्थान लाभले आहे...
भारतीय चित्रपटाचे जनक कोण? दादासाहेब फाळके, की दादासाहेब तोरणे असा छोटासा वाद महाराष्ट्रात एकेकाळी होऊन गेला. तो मान मात्र दादासाहेब फाळके यांना दिला गेला. भारताचा पहिला चित्रपट दादासाहेब फाळके यांचा 1913 मधील ‘राजा हरिश्चंद्र’ हा मानला जातो.
भारतात लॉकडाऊन 24 मार्च 2020 रोजी सुरू झाला. लॉकडाऊनला 24 जुलैला चार महिने पूर्ण झाले. त्या चारपैकी एप्रिल आणि मे या दोन महिन्यांत नियमांची फार कडक अंमलबजावणी होती. पोलिसांच्या लाठ्यांचा प्रसाद व्हॉटसअॅपवर व्हायरल होत होता. लोक घराबाहेर पडत नव्हते.