वॉल्टर स्पिंक हे अमेरिकेच्या मिशिगन विद्यापीठातील कलाइतिहासाचे प्राध्यापक. त्यांनी अजिंठा लेण्यांच्या संशोधनाचा ध्यास घेतला होता. त्यासाठी ते जवळ जवळ पन्नास वर्षे, दरवर्षी दोनदा याप्रमाणे भारतात येत असत.
अजिंठा लेण्यांची सर्वाधिक ख्याती तेथील गुहांमधील रंगीत भित्तिचित्रांसाठी आहे. त्या लेणीसमूहात तीसपैकी फक्त पाच लेणी पूर्णपणे चित्रांकित आहेत. तीन लेण्यांमधील रंगचित्रे अर्धवट राहिलेली आहेत...